लाडका - याक व कवयित्री उर्फ याकवयित्री

Submitted by मीन्वा on 12 July, 2015 - 02:22

साती यांच्या सुंदर फोटोवरुन केलेली ही कविता त्यांना अर्पण..

तो पहा! तो पहा !
या मनालीतला, तो पहा याक
या याकवरी या या-कवयित्री

रुप मनोहर ध्यानही सुंदर
मुकुट जणु ती टोपी सुंदर (हे कव्यित्री चे वर्णन अहे)

(चालः ये पत्तीयों की सरसराहट है....)

ते कान आहेत टोपीचे की शिंगे याकची की शिंगे आहेत याकची की कान टोपीचे
शिंगे असतील शिंगेच असतील ती ... लावली आहेत घुंगरे ज्यांना...

(कट तु ओरीजीनल चाल)

नाक पुसाया रुमाल हिरवा (कवयित्रीचा रुमाल हं)
नक्षी त्यावर पिनही सुंदर
केस मुलायम चेहरा हसरा (याकचा बरं का...)
शिंगावरती फुलमाळा अन हिरवी पत्री

पहा पहा हे दॄष्य सुखद अन या-कवयित्री

(साती आजचं तू माझं काम करुन टाकलंस त्यामुळे मला भडभडून आलं ... तरी पण मी आज भडका न लिहीता लाडका लिहीला. फक्त तुझ्यासाठी.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या वहीत लिहून ठेवलंय तुम्हाला पुढल्या आठवड्यातली तारीख मिळालीये... कवितांंं चं काम इतकं वाढलंय ना काय सांगू तुम्हाला
मी ऑटोकवी घेतलाय आता डेव्हलप करायला
म्ह णजे पोलोराईड फोटोसारखं .. फक्त यात आपण इकडून फोटो घालायचा कि तिक डून कविता बाहेर.. एकच पॅरॅमिटर सिलेक्ट करायचा मित्र आहे का शत्रू आहे तो.. मग त्याप्रमाणॅ चांगली वाईट कविता येते पुटकन बाहेर.