लटका - टाचणी

Submitted by झगड्या on 12 July, 2015 - 01:43

अस्ताव्यस्त पसरु नये म्हणून
कागदाला टाचणी लावली जाते
घोटाळे पकडले जाउ नये म्हणून
कार्यालयी आग लावली जाते

जातीवंत राजनेत्याची मात्र
तिजोरी सतत भरत असते
सामान्य जनतेत मात्र सदैव
खेचाखेची चालत असते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान छान!
मस्तच हो लटका!

(एकाच वार्डातल्या सगळ्या सहप्रसवा एकमेकींच्या बाळाची स्तुती करतात.तशी मी तुमच्या लटक्याची केलीय तर तुम्ही माझ्या भडक्याची करायला या. Wink )

पहिलीच कविता होती हो ही आयुष्यातली.
आपल्यासारख्यांचे कौतुकाचे शब्दच प्रेरणा देतात आणि लिहायला उद्युक्त करतात. (उद्युक्त शब्द बरोबरेना ?)
असाच लोभ असु द्या. धन्यवाद.

छान