भडका - तुमच्यासाठी

Submitted by मीन्वा on 11 July, 2015 - 09:42

मनात येईल ते कधीच
कविता ना मानायला पाहिजे
वाचकांची काळजी कधीतरी
तुम्ही पण ही करायला पाहिजे

किमान तुमच्या प्रतिमेकरता
कविता नाही लिहायला पाहिजे
लोकांसाठी नव्हे तुमच्याचसाठी
चाळिस पानी वही वापरायला पाहिजे

(लेखन प्रकार: विनोदी कविता
प्रेरणा स्त्रोत : इथेच मायबोलीवर इतरत्र - मूळ लेखकाची क्षमा मागून
वि. सू. १ - कविता वाचून झाल्यानंतर न आवडल्याची तक्रार चालणार नाही
वि. सू. २ - आपण मला ओळखत नसल्यास हे लिखाण वाचल्यानंतर प्रोफाइल वाचून मला ओळखून दाखवण्याचा नैतिक अनैतिक ठरवण्याचा खेळ खेळत बसू नये. मला खेळायला वेळ नाहीये.
वि. सू. ३ - कॉपिराइट कवितेचा आणि विशेष सूचनांचा - आपली विनम्र - नवकवयित्री
वि. सू. ४ - कृपया माझ्या लेखन स्वातंत्र्याचा आदर राखावा. जसा मी तुमच्या लेखन स्वातंत्र्याचा आदर करते आणि तिथे मुळीच बोलत नाही
वि. सू. ५ - कविता वाचून झाल्यावर इतर चर्चा करायची असल्यास जादा आकार पडेल. वेळ जातो ना उत्तर देण्यात..
वि. सू. ६ - कवितेच्या रतिबासाठी संपर्कातून पत्ता फोन नंबर पाठवावा
वि. सू. ७ - तुमच्यावर कविता करुन हवी असल्यास पोस्टाने स्वताचा योग्य... म्हणजे घोड्यावर बसलेला, सूर्य हातात घेतलेला .. थोडक्यात ज्याचं वर्णन कवितेत हवं असा फोटो पाठवावा.
वि. सू. ८ - कवितेचा आकार, फोटोचा आकार व त्यातील व्यक्तीचा आकार दोन्ही विचारात घेऊन ठरविण्यात येईल. पैसे मिळाल्यावर कविता इथेच मायबोलीवर प्रसिद्ध करण्यात येईल.
वि. सू. ९ - ८ वि. सू लिहून कवयितरी दमली असल्याने तातडीने तुम्हाला इथे उत्तर देऊ शकणार नाही. उत्तर आलं नाही तर भलभलत्या शंका मनात आणू नयेत.
कविता अंमळ लहानच झाली वाट्टं ! :फिदी:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कवियत्रि असुन पैशनचि भश करने तुमच्य प्रतिमेला शोभत नहि.
मि कव्यसुमने उधलेते.
अम्ह घरि धन शब्दचिच रत्ने

किति रत्ने अकर पदेल ते क्रुपय कलवने.

साती तुमच्या प्रेमळ आग्रहाखातर तुमचा याकवरचा फोटो पाहीला याक फार मस्तंय... केवढा मोठा याक तो ... वा वा छान कविता होईल तुमच्या टोपीचे कान आणि याक ची शिंग अगदी सुरेख...

आता तुम्ही पण नवकव्यत्रई म्हणून शब्दरत्ना च मानधन मान्य करायलाच लागणार ..

छान कविता लिहीते हं...! नाव सुद्धा सुचलं लग्गेच कवितेचं ..."याकवयित्री"

मयुरेश कसचं कसचं रे बाळा! तुझं आपलं उगीच कायतरी.. Blush

तुम्च्या पयल्या कवितेला नावे तेव्ली तर मला माप्फ करा. ंई त्य्म्च्या पायाशी लोलन घेऊन कविता शिआय्ला येनार आज्ज्ज्ज्ज्ज्जीईए

नीधप मी तुम्हाला मोठ्या मना ने माफ केलंय काळजी करु नका. मी तुम्हाला नक्की कविता करायला शिकवणारे.
तुमची माफी मागण्याची आणि मी माफ केल्याची अशा दोन कविता होतील लगेच. Proud

हिम्सकुल तुम्ही कोणत्या स्कूल मधे जाता?

छान