भडका - कवितेचा खातमा

Submitted by मीन्वा on 9 July, 2015 - 03:57

कवितेचा खातमा

कविता वाचताना
तड-तडतेय तडतडी (डोक्यातली शीर!)
गुलमोहरात कवी बनण्या
आज कवी पडला कमी (खरंतर जास्तच झालंय!)

कवी कसं म्हणावं याला
हा सुटला बेबंद आहे
साक्षरातल्या साक्षराकडून
कवितेचा खातमा आहे (वा ! वा ! वा ! वा ! क्या बात है !)

(वाचकांची जाहीर माफी मागून...)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली. डोळ्यात झणझणीत अंजन.
साक्षरातल्या साक्षराकडून >>सुरेख रचना. मला वाटतं इथे जोडाक्षरं लिहीता वाचता येणारा असा गर्भितार्थ अपेक्षित अाहे. जाणकारांनी खुलासा करावा.

हे हे बरं नाहीये बरंका.
तड-तडतेय याचा अर्थ तडतडीशी लागत नाही.
तड म्हणजे पोटाला लागते ती.. येव्डंपण्कळत्नै!

धन्यवाद मी नवकवयित्री (कायतरीच!) आहे तुम्हाला सग्ळ्यंना माजी कविता आव्डली हे वाचून माझ्या तर बाई डोळ्यातच पाणीच आलं.

नीर्जाताई कदी कदी माझे बाबा तुज्या कविता वाचून माझ्या डोक्यातली शीर तडतडायला लागली म्ह्णतात मला ती तडतडी आहे ही

विशाल तुमाला नाई आवडली का माजी कविता....? Sad मला कित्ति कित्ती वाईट वाटतंय. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर आवडॅल मला

कविता आवडली. नवकवयत्रीने मायबोलीकरान्च्या मनातला प्रक्षोभ ( आक्रोश) नेमक्या शब्दात व्यक्त केलाय.

कॉलेज
नियतकालीक
लेखनसुविधा
वृत्तपत्र
शाळा
साहित्य
हितगुज ग्रूप
मुक्तस्रोत(Open Source)
तत्त्वज्ञान
प्रसारमाध्यम
भाषा
मायबोली
शिक्षण
समाज
अवांतर

ह्या शब्दखुणा नाही दिल्यात त्याचेच ९ मार्क होतात. ते कट...:दिवा:

ऑ साती, माजे बाबा म्ह्ण्तात की ऑसप वर गेलीस तर खबरदार. मग मी ना माज्या कविता पोश्टानेच पाठवते तुमच्या सारख्या रसिकांना. बाबा म्हणले कागदाचा रद्दीचं वजन वाढवायला तरी उप्योग होतो. त्यांना म्माझ्या कविता प्रक्षोभक आणि सडॅतोड असल्याने आवडत नैत बओतेक

तुमी तुमचा पत्ता द्याल का ? मी तुमा ला रोज एक कविता लिउन पाठवेल का मी स्वताच येउ रोज कवितेचा रतिब घालायला

आय्या कित्ति मस्त कल्पनाय नै...! मी रोज येऊन तुमा ला कविता म्ह्णीन तुमी म्हणलात तर तुमच्यावर पण कविता करीन

रोज कवितेचा रतिब >>>>> येर्‍यागबाळ्यांच काम नाही ते...
आज १० जुलै अजून नवीन कविता आली नाही.

Wink

भारीच एकदम!
मोठठाल्या किटलीतून भडक्यांचा रतीब घालायला येणार्‍या मीन्वा दिसल्या.
Wink

मिन्वा कविता आवडण्याचा प्रश्न नाही,पण मायबोली वर भडका खुपंच कमी वाटतोय,त्यामध्ये थोडीशी वाढ करावी,पण वाढ करत असताना आपण का लिहीतोय याचा थोडासा विचार करून,सामाजिक बांधिलकी जोपासुन लिहायला सुरूवात करा,तुमच्यासारख्या इतर सदस्यांना तुमचा भडका आवडणारही नाही,कदाचित तुम्हाला अनपेक्षित रिप्लाय सुध्दा येतील,परंतु काळजी करू नये,आणि आपली नैतिकता भंग पावणार नाही याची दक्षता घ्यावी,कारण तसे जर झाले तर,तुमच्या बरोबर तुमच्या प्रोफाईलकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलु शकतो,तुमच्या प्रोफईल मधील माहीतीची जाणीव ठेऊन,तुमच्या बद्दल इतरांच्यामध्ये आदर निर्माण होईल असे वर्तन तुमच्याकडून अपेक्षीत आहे,त्यामुळे आशा आहे आपणही आपला भडका डोक्यातील तडतडी मुळे नव्हे तर सामाजिक तळमळीमुळे लिहाल,...

बापरे तुम्ही लिहीलेलं कळायला जरा अवघड आहे पण प्रयत्न करीन खरं तर मायबोलीकर वाचकांबद्दल वाटाणार्‍या कळकळीतूनच ही कविता उमटली आहे. इथे सगळ्यांना लिहायला अलाउड आहे ना?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्हाला नाही आवडली कविता तर नका वाचू. माझं काही म्हणणं नाहीये.

माझ्या प्रोफाईलचा माझ्या लिखाणाशी संबंध जोडू नका कारण मी विनोदी लेखिका पण आहे. विनोदी लेखनातच तर माझा हातखंडा आहे.

आणि आपल्याला जसे इंटरनेट स्वातंत्र्य आहे तसेच ते वापरताना काही बंधनंही आहेत, याची माहीती असावी

आणि आपल्याला जसे इंटरनेट स्वातंत्र्य आहे तसेच ते वापरताना काही बंधनंही आहेत, याची माहीती असावी

मिन्वा तेवढ माझ्या व्होडक्याचं काय कर्नारेस ते सांग......व्होडक्यासाठी तुझी मदद लागेल्.......चिऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ....चिउ...

Pages