'हायवे - एक Selfie आरपार...!' - ट्रेलर व ओळख

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 July, 2015 - 05:00

खूप हव्याहव्याशा वाटणार्‍या आणि आपल्याला आपलं आजचं प्रतिबिंब दाखवणार्‍या प्रवासाची गोष्ट म्हणजे 'हायवे - एक selfie आरपार...!' हा चित्रपट.

'वळू', 'विहीर', 'देऊळ' या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत झळकलेल्या व पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी आणि लेखक गिरीश पांडुरंग कुलकर्णी सादर करत आहेत, अरभाट निर्मिती व खरपूस फिल्म्स कृत 'हायवे - एक selfie आरपार...!'

Highway.jpg

दिग्दर्शन - उमेश विनायक कुलकर्णी
लेखन - गिरीश पांडुरंग कुलकर्णी
संगीत - अमित त्रिवेदी
पार्श्वसंगीत - मंगेश धाकडे
गीतरचना - वैभव जोशी
छायालेखन - सुधाकर रेड्डी
संकलन - परेश कामदार
निर्मिती - अरभाट निर्मिती आणि खरपूस फिल्म्स

कलाकार - गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे राणा, किशोर कदम, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, सतीश आळेकर, विद्याधर जोशी, शकुंतलाबाई नगरकर, श्रीकांत यादव, निपुण धर्माधिकारी, मयुर खांडगे, किशोर चौगुले, वृषाली कुलकर्णी, पूर्वा पवार, नागराज मंजुळे आणि मराठीत प्रथमच हुमा कुरेशी व टिस्का चोप्रा.

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

२८ ऑगस्ट, २०१५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार्‍या 'हायवे - एक Selfie आरपार...! या चित्रपटाची ही झलक - https://www.youtube.com/watch?v=ki-uU_syUY4&feature=youtu.be

***
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

अमानविय विषय असावा चित्रपटाचा!

कलाकार मस्त Happy

(सईपूई नसल्याने आचरटपणा कमी असावा ह्यात अशी आशा आहे Wink )

अरे वा! काहीतरी वेगळीच संकल्पना दिसतेय. बघायला पाहिजे असं वाटायला लावणारं पोस्टर आणि उत्सुकता चाळवणारी कलाकारांची यादी.

'हायवे - एक सेल्फी आरपार' या चित्रपटाची निवड यंदाच्या न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये झाली आहे.

'सेंटरपीस' या विभागात हा चित्रपट दाखवला जाईल.

वेळ - १० मे, २०१६. संध्याकाळी ६.३० वाजता

स्थळ - Theater 2, Village East Cinemas, 2nd Ave @ 12th Street, NYC.