कायदा

Submitted by जयदीप. on 28 June, 2015 - 01:36

कायदा इथला कुणाला कळत नाही
पण गुन्हा कुठलाच येथे घडत नाही

फार पूर्वी फार थोडे खूप होते
आणि आता खूप सुद्धा पुरत नाही

सर्व रस्ते मोकळे झालेत आता
जायचे नक्की कुठे ते कळत नाही

नाव लिहिले सर्व दगडांवर तुझे मी
कोणताही दगड आता बुडत नाही

ती तुझे जिंकेल मन एका क्षणातच
ओळ एखादी अशी का सुचत नाही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users