इलेक्ट्रीक गिझर कुठला घ्यावा?

Submitted by स्वरुप on 27 June, 2015 - 02:53

Riquirement:

तीन ते चार माणसांच्या कुटुंबासाठी हवा आहे
ऑलरेडी सोलर आहे पण या पावसाळ्याच्या दिवसात बॅकअप म्हणून हवा आहे
शॉवरचा वापर आहे
पाण्याचा फोर्स बरा असतो

वेबवर बघून "A O smith" आणि "Recold" हे ब्रॅन्ड्स आणि १० किंवा १५ लीटर्स ही कपॅसिटी शॉर्टलिस्ट केली आहे

पण ऑनलाईन घ्यायचा की दुकानातुन हे अजुन ठरलेले नाही

मायबोलीकरांचे "Users Reviews and advice" नक्कीच मदत करतील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यामते रॅकोल्ड चा इंस्टंट गीझर घ्या, ३,६,९ लि. अश्या कपॅसिटीत उपलब्ध आहेत.
मी ३ जणांच्या कुटुंबाला ३ लि. वाला इंस्टंट वापरतोय.

शॉवरचा वापर असेल तर इन्संट चा उपयोग नाही.. त्याचे पाणी बादलीत काढुन वापरावे लागते..
गीझर घेताना तो बसविण्याच्या जागेचा पण अंदाज घ्या.. काही उभे तर काही आडवे गीझर असतात.. तेव्हा जागा अन पाण्याचे कनेक्शन कुठे आहे त्यावर कुठला घ्यायचा ते ठरेल..
१५ ली चा पुरावा तुम्हाला.. साधारण १० मिन मध्ये पाणी तापते..
रच्याकने आमच्याकडचा CG आहे.. नो कंप्लेंट ..३ वर्ष झाली..रोजचा वापर आहे..

मी पण नुकताच AO Smith चा ३लिटर चा इन्स्टंट गिझर घेतला. आम्ही दोघेच असतो आणि माझ्याकडे पण सोलर आहे एका बाथरुम मध्ये. ३-४ मिनिटात गरम करतो पाणी , पण पूर्ण बादली भरण्यास १२-१५ मिनिटे लागतात कारण पाण्याचा प्रवाह हा अगदी बारीक करावा लागतो. अर्धी बादली ७-८ मिनिटात भरावी.
पण एकदम मस्त कडक पाणी मिळते.

मी दुकानातून घेतला, गिझर युनिट, AO Smith चे पाइप्स (सप्लायला जोडण्यासाठी) आणि मजुरी मिळून ४ हजार लागले. ऑनलाइन घेतला तर ३१०० पर्यंत फक्त युनिट मिळेल. (पाइप्स नाही देत ते, आपल्याला वेगळे विकत घ्यावे लागतात दुकानातून) ओळखीच्या प्लंबरला सांगून पाइप्स आणल्या तर ४००-५०० वाचतील सहज.

शॉवर घेणे आवडत असल्यास १५ अथवा जास्त क्षमतेचा गिझर उत्तम. त्यात पण AO Smith मध्ये रिमोट कंट्रोल वाले मॉडेल्स आहेत आणि एकदम कॉम्पॅक्ट आहेत.
-----------------------------------------------------

बाँड, इन्स्टंट गिझर शॉवरसाठी कसा वापरावा?

बाँड, इन्स्टंट गिझर शॉवरसाठी कसा वापरावा?

मी, तुमच्या बाथरुम मधे टु इन वन नळ आणी दोन वेगवेगळे गरम+थंड नॉब आहेत हे गृहित धरतो.
नळ्/शॉवर वाला नॉब शॉवर कडे करुन थंड व गरम वाले दोन्ही नॉब अर्धे अर्धे उघडायचे.
जे जास्त हवे तो नॉब जास्त उघडायचा.

DSC_0030.JPG

अक्षराला हसु ने !