निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी Wink .. थँक्यु..

कसला मोठ्ठा दिसतोय पण तो गुलाब .. लाईट Biggrin
साधना धन्यवाद इथेही Happy

पहिले तडकास्वामी आणि आता प.प्पु. पत्की महाराजांच्या कृपेने ह्या धाग्याला शोधायला पार ४थ्या पानावर जावं लागल मला Sad .. दिवसेंदिवस डोक उठायला लागलय माझ..
उघडल्या उघडल्या पहिल्या पानावर हव ते न सापडता त्यासाठी शेवट्च्या पानावरुन सुरुवात करावी लागत असेल तर कस व्हायच यार.. छे.. एक काय कमी होता कि अजुन एक..
कुणाच्या भावना दुखत असेल तर माफी..तसा हेतु नै माझा पण यामुळे मी अख्खीच्या अख्खी दुखायला लागलीय..
एखाद उगाच विनोदाच धागा असल तर ठिक आहे पण एवढे भारंभार धागे काढायला लागले लोक तर इतर काही वाचायची सुद्धा इच्छा मरुन जाते.. इथ एक धागा काढायचा म्हटल की मी पुर्रा माबोचा डेटाबेस शोधुन काढते जेणेकरुन परत परत तेच धागे निघु नये आणि हे लोक मिन्टाला एक ह्या वेगाने अपडेट करत असतात Angry .

तुम्ही मित्रमंडळी माझी म्हणुन दुखण सांगतेय..

त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असु शकतो गं. नाहीतर ते असे गृहस्थ नाहीयेत. कदाचित व्यक्तिगत काही विषयावरुन ते सैरभैर झाले असावेत आणि म्हणुन चित्त विचलित करण्यासाठी हे करत असतील. इतक्या वेगात कॉपी पेस्ट का करत असावेत हे फक्त तेच जाणो, त्यांना काय त्रास आहे हे फक्त तेच जाणो. आपण फक्त टीका करतोय, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांनाच माहिती. देव करो आणि हे सगळे लवकर थांबो.

तेच..देव करो आणि हे सगळ लवकर थांबो..
त्रास हा पब्लिक फोरम वर असा काढताना मी पहिल्यांदाच बघतेय..अश्यान माझी पण खुप चिडचिड होते अग..
गुगलवर भात अस टाकल्यावर चार पान फक्त Alia Bhat च्या नावान वाहिले तर कस होईल तसला प्रकार..
खरच जर काही मानसिक इश्यु असेल तर त्या त्रासातुन त्यांची लवकर मुक्तता व्हावी...

जोरदार धावू लागलाय की हा धागा. मजा येतेय सुंदर फोटो पहायला आणि माहिती वाचायला.
vt220, तो दुसरा धोतरा असावा बहुतेक>> हो साधना, तो धोतराच. औषधी म्हणून एका वैद्द्यांकडून हा आमच्याकडे वास्तव्याला आला होता. आमच्या शेतावरचा गडी मात्र त्याच्या बियांचा खास कारणासाठी वापर करू लागलाय हे समजल्यानंतर त्याचा आमच्या इथला मुक्काम संपला.
ह्याच गड्याने आमच्या ऊसाच्या शेतात मध्यभागी गांजा लावला होता.

वाह काश्मीर.. कित्येक वर्षांपासून प्लॅन करतेय.. ८० मधे एंजॉय केलेली सगळी दृष्यं अजून ताजी आहेत डोक्यात..

पण आता दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चाललीये असं बातम्यांमधून समजतंय.. कब जाना होगा अब!! Sad

मस्त फुलं आणी माहिती..
टीना या धाग्याला तुझ्या आवडत्या दहात टाकून ठेव म्हंजे सापडायला सोपं जाईल..

गूगल प्लस ने अचानक माझ्या लॅपटॉप वर येऊन वेब अल्बम्स वर कब्जा केलाय .. सो अँग्री विथ धिस आगाऊपणा ऑफ गूगल Angry Angry

कोई सोलूशन है?? परत नॉर्मल वेब अल्बम कडे परत जायला???

अगं तु तो अल्बम उघडतेस तेव्हा तिथे मध्येच एक लाईन येते "गो बॅक तो पिकासाबेव" म्हणुन. ती निट बघ आणि त्यावर क्लिक कर. मग तु तुझ्या आवडत्या पिकासात परत जाशील. मलाही सुरवातीला हा प्रोब्लेम येत होता.

ह्याच्यावर बघ क्लिक करुन. https://picasaweb.google.com/home

पण क्रोम असेल तर त्रास होतो तु म्हणतेस तसा. मला घरुन पिकासा उघडले की मी वर लिहिले तसे क्लिक करुन पिकासावर जावे लागते. ऑफिसात क्रोम नाही त्यामुळे थेट उघडते. पण ऑफिसात अपलोड फॅसिलिटी बंद आहे Happy

अजुन एक फुल, काश्मिरहुन भेट - >>>> साधना, हे malva जिनसमधले आहे का Hibiscus जिनसमधले ??
Malvaceae family तलेच वाटते आहे, पण नेमके नाव कळत नाहीये !!!!

शशांक ते तुम्ही सांगायचे. दोन्ही फॅमिलीतली फुले सारखीच दिसतात. पाने वेगळी आहेत पण वरची पाने दोन्ही फॅमिलीत बसत नाहीत. हे फुल आमच्या हाऊसबोटीच्या बागेत होते. नावगावातले गाव माहित असले तरी नाव माहित नाही. पण इतके नाजुक सुंदर फुल, रंग बघाना कसा चमकतोय. देवाने कसले कुंचले वापरले असावेत तोच जाणे.

शशांक ते तुम्ही सांगायचे. >>>> वा, वा मास्तरीणबाई - कुठल्या पोरास्नी (विद्यार्थ्याला) इचारताय ??? Happy

पाने नीट दिसत नाहीयेत व पूर्ण रोप व फुलांची रचनाही फोटोतून कळत नाहीये - तरीही हा माझा एक अल्प प्रयत्न -
alcea hollyhock - बघ बरं गुगलून किंवा तुझ्या आठवणींना ताण देऊन आणि सांग ......

नाही. हॉलिहॉक आहे माझ्याकडे. उद्या टाकते.

तुम्ही जर हॉहिहॉक नीट पाहिले तर लक्षात येईल की ते बहुतेक वेळा एका उभ्या दांडीला चहुबाजुने लगडलेली फुले अशा अवतारात प्रगटते. हे वरचे फुल तसे नाहीय. आपली जास्वंदे जशी स्वतंत्र येतात तसे ते स्वतंत्र होते. जास्वंदे कधीच गुच्छात नसतात ना? मी माझी करत एकटीच मिरवतात.

मी आज रात्री फोटो माझे लडाखचे फोटो टाकते पिकासावर. मग मला ते शेअर करता येतील.

तोवर हा एक नमुना. लडाखला गेल्यावर मला कळले की मानवाची औकात खसखशीच्या दाण्याइतकीही नाही. पण त्याच्या घमेंडीपुढे एवरेस्टही खुजा ठरेल. निसर्ग बघुन घेत राहतो आणि एके दिवशी दाखवतो जागा मानवाला.

लडाखला गेल्यावर मला कळले की मानवाची औकात खसखशीच्या दाण्याइतकीही नाही. पण त्याच्या घमेंडीपुढे एवरेस्टही खुजा ठरेल. >>>>> सत्यवचन ......

लडाखला गेल्यावर मला कळले की मानवाची औकात खसखशीच्या दाण्याइतकीही नाही. पण त्याच्या घमेंडीपुढे एवरेस्टही खुजा ठरेल. >>>>> अगदी गं.

ते फूल माल्वेसी फॅमिलीतलेच वाटतेय. हिबिस्कस रोझासायनेसिस हे माल्वेसीतच येतं ना?

आज गुलाबी लीली, सई ने बैठक खोलीत आणुन ठेवली आहे.. खुप फ्रेश वाटत होतं
एक तर ती एका छोट्याश्या मडक्यात लावली आहे.. त्यामुळे एखाद्या पेन्टींग सारखी दिसते आहे..
lily_1.jpglily_1.jpg

साधना..दोन्ही फोटो सुपर्ब...
पहिला प्रचि मी माग हॉस्टेल मधली फुल म्हणुन टाकला त्याचा भाऊ वाटतोय मला पानांवरुन..आणि हो ते फुल सुद्धा गुच्छात लागत नाही .. एकला चोलो रे असा कारभार असतो.. नाव काढावच लागेल आता..

सायली, मडक्यातली गुलाबी लिली छानच.

मला पन लिलीच्या बिया इथ तिथ लावायला आवडत.. माझ्या कडे घरी एक अख्खा वाफारा फक्त लिली आणि मे फ्लॉवर ने भरुन टाकलाय मी.. फुलांचा काळ पण एक्मेकांना पुरक असतो. एकमेकात लुडबुड करत नाही अजिबात. जागा न मिळाल्यामुळ मी लिलीच्या बिया लॉन मधे टाकल्या होत्या Lol
उगल्यावर त्याचे कंद साफ करता करता भरपुर शिव्या खाल्ल्या मी आईच्या..पर हम बाज आने वालो मे से नही..
आता तर घरी जायला पण वेळ नाही मला Sad

साधना, सापडलं मला ते फूल.. Pavonia lasiopetala हे बघ, बर्‍यापैकी तसंच दिसतंय.. शशांक Malvaceae पैकीच आहे..
सायली, मडक्याची आयडिया मस्तंच.. गोड आहे लिली..

ए काय पिकासा पिकासा खेळून मला जळवताय????????????

सगळे फोटो सुंदर आहेत.

सायली ही लिलि माझ्याकडे खुप फुललेय.

मला पिवळी लिली कधी मिळेल????????????????

जोरदार धावू लागलाय की हा धागा. मजा येतेय सुंदर फोटो पहायला आणि माहिती वाचायला. >>+१
साधना काय कमाल नाजुक,सुंदर फुल आहे. मस्त.

हो आत्मधुन, ब-यापैकी साधर्म्य आहे. धन्यवाद.

जागु पिवळ्या लिलीच्या बिया मी आणलेल्या गावाहुन तुझ्यासाठी. कुठे ठेवल्या पाहाव्या लागतील.

http://www.maayboli.com/node/42141 - एक अवचित पक्षीभेट - नवीन नि ग प्रेमींसाठी Happy

http://www.maayboli.com/node/24654 - एक दिवसाचा पाहुणा - सनबर्ड पक्ष्याचे पिल्लू - नवीन नि ग प्रेमींसाठी Happy

घरच्या पारिजातकाच्या झाडावर नेहमी येणारा हा सनबर्ड च आहे ना ?
मला जरा शंका आहे माझ्या ओळखण्यावर .. संध्याकाळच्या वेळी येतो म्हणुन फोटो स्पष्ट नै आला एवढा..

याच नाव दिल होत ना मागे..मला सापडतच नाही आहे आता..परत सांगा न कुणीतरी..
Grassland Yellow Finch का ?

Grassland Yellow Finch >>>> नाही, धोबी किंवा वॅगटेल असावा हा ...

Pages