आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मला सायलीने पाठवल्या होत्या
मला सायलीने पाठवल्या होत्या पण नाही रुजल्या. तू कुठे राहतेस? मी रोपच नेते
मी ठाण्याला रहाते. ३/४ रोपं
मी ठाण्याला रहाते. ३/४ रोपं कालच एका छोट्या मड्कुल्यात काढुन ठेवलीत. बहुतेक ती तग धरतील असं वाटतय. दोन्/चार दिवसात कळेलच. मग तु ती घेऊन जाऊ शकतेस. नाहीच झाली ती तर नविन रोपं करुन देईन.
मागच्या पोस्ट्मधे मी जांभळाची रोपं तयार करण्याबद्दल सुचवलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा.
माझ्याकडे एक वडाचे रोप आहे ते कुणाला हवेय का? माझ्या झाडाच्या मागच्या वर्षीच्या कटिंग वरुन रुजले आहे. माझे वडाचे रोप आता ३ वर्षाचे झाले आणि चांगले छान झालेय. कुंडीत ठेवायचे तर सतत छाटणी करत रहावे लागते.
सावली तुझा उपक्रम चांगला आहे.
सावली तुझा उपक्रम चांगला आहे. माझ्याकडे पण खुप अशी पिंपळ, उंबर ची झाडे आहेत. फक्त ही रोपे कुठे नेऊन लावायची हा प्रश्न पडतो ग. आपले नि.ग. कर्स बिया थेट रानात-डोंगरात टाकतात. म्हणजे त्या जागच्याजागी रुजून पावसाच्या पाण्यावर रुजूशकतात अशा.
मला हवी आहे ती लिली. काहीतरी व्यवस्था करूया नेण्याची.
वड, उंबर, पिंपळ मुद्दाम
वड, उंबर, पिंपळ मुद्दाम लावायला जागा सापडणे थोडे कठीण होईल. पण फळझाडे सोसायटीच्या आवारात लावता येतील. नुसत्या बिया जंगलात टाकून त्या रुजून मोठ्या होण्याचे प्रमाण अगदी कमी असेल कारण त्या बीया वरच्यावर रहातात. शिवाय पाऊस गेला की त्यांना पाणी मिळणे कठीण. तरिही बीया टाकून अगदी ४/५ टक्के नविन झाडं लागली तरी चांगलंच आहे म्हणा. त्या जांभळाबद्दल मला वाटतंय कारण आणखी काही वर्षांनी ती जात दुर्मिळ झाली किंवा मिळायची बंद झाली तर फार वाईट वाटेल. त्यामुळे आतापासुनच रोपे बनवुन सोसायटींमधे लावुयात, जास्त रोपे झाली तर आजुबाजूच्या सोसायटीमधेही देता येतील. किमान त्या जातीचे संवर्धन होईल.
गावाला अनेक गावठी आंबे , काजू असेच नामशेष झालेले आहेत
बरं, कोणाकडे 'करेल' नावाच्या आंब्याचे रोप किंवा पिकलेल्या आंब्याची बाठी असेल तर प्लिज मला द्या. हा आंबा खुप मोठा असतो आणि लोणच्यासाठी वापरला जातो. मात्र याचे रोप आता नर्सरित कुठेच मिळत नाहीये.
सावली.. मस्तच गं.. जांभळा ची
सावली.. मस्तच गं.. जांभळा ची झाडं दर सोसायटीत.. वॉव.. सुपर्ब आयडिया..
आमच्या सोसायटीत आहेत, मागे पुढे अशी दोन झाडं..अगदी टोकावरची जांभळं पक्ष्यांच्या चोचीत पडतात.पण दरवर्षी पुढच्या झाडा वरची बहुतेक सगळी जांभळं खाली पडून नष्ट होतात्,कुणीच लक्ष देत नाही.. मागील भागात राहणारे ग्राउंड फ्लोअर वरचे मात्र झाडाला साड्या, चादरी बांधून बहुतेक जांभळं लुटून घेतात.
त्याचं पुढे काय करतात माहित नाही.. आमच्यासारखे जांभळांपर्यन्त न पोचू शकणारे बाजारातून अव्वाच्या सव्वा किमतीत विकत घेतात..
सावली, जांभळाची आयडीया बेस्ट.
सावली, जांभळाची आयडीया बेस्ट. आमच्या सोसायटीत असे झाड अगदी जोमाने वाढलेय. सोसायटीच्या बाळगोपाळांपुरती जांभळे मिळतातच. जेष्ठ नागरीक पण झाडाखाली शोधत असतात. साधेसे जांभूळ पण महिनाभर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होते.
वा ! नवीन भागाबद्द्ल सर्वांचे
वा ! नवीन भागाबद्द्ल सर्वांचे अभिनंदन !
नांगरणीचे फोटो पाहून एकदम लहानपणची आठवण झाली.
मानुषी मस्त लिहिलंस .
फार पसारा न करणारी पण तरीही
फार पसारा न करणारी पण तरीही भरपूर फळे देणारी पेरु, जाम, डाळिंब, सिताफळ, रामफळ, बिमली, आवळा, करमळ, कवठ हि झाडे पण अवश्य लावावीत. यातली बहुतेक बिया रुजवून तयार करता येतात.
पसारा न करणारी मुद्दाम लिहिलय कारण मूळे इमारतीचे नुकसान करतील अशी भिती ( जी सोसायटीला वाटत असते ) या झाडांबाबत नाही आणि मुंबईत ही झाडे सहज वाढतात,
नविन भागाबद्दल सर्वान्च
नविन भागाबद्दल सर्वान्च अभिनन्दन!
मानुषीताईन्ची प्रस्तावना अतिशय सुर्रेख!!
नवीन भागाबद्दल
नवीन भागाबद्दल अभिनंदन...
साधारण 7 वर्षापुर्वी माझ्या आईने, खाल्लेल्या जांभळाच्या बिया घरच्या कुंडीत रुजवल्या होत्या. पावसाळ्यात त्यातली 4 रोपटी बागेत रुजवली.
चारही रोपट्यांची आता झाडे झाली असून त्यातल्या सर्वात लहान झाडाला आता थोडीशी जांभळे आली आहेत..
नविन भागाची सुरुवात मस्त!
नविन भागाची सुरुवात मस्त! मानुषी, मनोगत सुंदर!
पावसाळ्याची चाहूल लागताच
पावसाळ्याची चाहूल लागताच बाहेर पडणारे इंद्रगोप....
(Velvet Mite.... Trombidium Holosericeum )
जराही संकटाची चाहुल लागताच
जराही संकटाची चाहुल लागताच घेतलेला संरक्षक पवित्रा..
मानुषी, छान मनोगत! खेकडा,
मानुषी, छान मनोगत! खेकडा, कासव दोन्ही मस्त! मला शेतातले मुठे आठवले.
ममो, तुमचे शेत काय मस्त दिसतय!
इन्द्रगोप.. किती सुंदर
इन्द्रगोप.. किती सुंदर नाव.
आमच्या कॉलनीत आणि इतरत्र मोठ्या जांभळाची खुप झाडे आहेत. लोक झाडे झोडपुन जांभळे पाडतात. या वर्षी २०० रुपये किलो होती मोठी जांभळे.
अरे वा .....पळायला लागला
अरे वा .....पळायला लागला धागा!
सर्व निगकर्स धन्यवाद!
इथे येऊनच शिकले निसर्ग वाचायला.
आणि फोटो...........३ फोटो चालत्या गाडीतून काढलेले आहेत........एडेनियमचे फूल आणि कढिलिंबाचं फळ वगळता.
पण निसर्ग एवढा सुंदर आहे की क्लिक केल्यावर जे काही मिळाले ते हेच.
इन्द्रगोप.. किती सुंदर नाव.
इन्द्रगोप.. किती सुंदर नाव. >>+१
मी पहिल्यांदा दर्शन घेतेय याच..
इंद्रगोप - छान नाव!
इंद्रगोप - छान नाव! इंद्रगोप म्हणजेच मृगाचे किडे का? की ते वेगळे?
हो. तेच...
हो. तेच...
आमच्या सोसायटीतलं जांभळाच झाड
आमच्या सोसायटीतलं जांभळाच झाड वार्यामुळे मधुनच तुट्लं.. तरी बाकीच खोड व्यवस्थित आहे..
आम्ही पानशेतला जाताना जांभळ घेतली होती... त्याच्या बिया रुजल्या नि रोप येत आहेत ४-५ .. पण नंतर लावणार कुठे?
सोसायटीत मागच्या बाजुला बदाम, आंबा, नारळ , जांभुळ आहेत.. पुण्यात कोणाला पाहिजेत तर सांगा....
आधी ज्यांनी लावली त्यांची आठवण करुन आम्ही आंबे खाल्ले .. प्ण आता आम्ही कुठे झाड लावणार नि अस्चं पुढच्या पिढीला मिळ्णार..? कारण जागाच नाही!!
जमिनीला पडलेल्या छिद्रावरती
जमिनीला पडलेल्या छिद्रावरती जाळे विणलेला कोळी...
नांवही समर्पक... : Funnel Web Spider..
Close Up....
Close Up....
नवा भाग मस्त पळतोय. मजा आली
नवा भाग मस्त पळतोय. मजा आली वाचताना.
मानुषी चालत्या गाडीतुन ही मस्त काढले आहेस फोटो.
एकदा आमच्या गावाला नक्की जाऊ या. अंजू तु जाशील कोकणात तेव्हा मी नसले तरी जा आमच्या घरी.
आमच्याकडे शेतीसाठी रेड्यांचाच वापर होतो. नांगरणी, लावणी असेल तेव्हा आम्ही बायका ही जातो थोडा वेळ बघायला. लहान मुलं तर दिवस भर तिकडेच असतात आणि संध्या़काळी घरी येतात ती चिखलानी अक्ष्ररशः माखुन. मस्त वातावरण असत. पाऊस वरुन ओतत असतो. त्यातच गडीमाणसांची कामं आणि थट्टा विनोद सुरु असतात. पोरं चिखल उडवत असत्तात एकमेकांच्या अंगावर. पावसामुळे वातावरण थंड झालेल्या वातावरणातला तो लाल लाल गरम गरम चहा आणि फरसाण !!! आठवुन सुदधा आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे असं झालयं
ही जी पायर्या पायर्यांची शेती आहे ना ती फोटोतल्या पेक्षा प्रत्यक्षात याहुन अनेक पटीनी अधिक सुंदर दिसते. करडं आकाश. चहु बाजुला दिसणार्या आंब्याच्या हिरव्यागार बागा, मधुनच येणार्या पावसाच्या सरी, दोन टेकड्यांच्या मधुन झुळु झुळु वाहणारा वहाळ ( ओढा ) आणि त्यामध्ये दिसणारा हा हिरवा गालिचा !! अप्रतिम सुंदर दिसतं सगळं. आमच्या घरातल्या यच्चयावत सगळ्यांच अगदी एकमत आहे की याहून अधिक सुंदर सर्व जगात काही नाही.
गावावरचं प्रेम प्रेम म्हण्तात ते हेच असेल काय रे भाऊ ? ( स्मित) .
मानुषी प्रस्तावना व फोटो
मानुषी प्रस्तावना व फोटो सुंदर. >>> +1
वाह.. मामाचं गाव नाहीये.. पण ममो च्या गावाला जाऊ या..जा ऊ या.. स्मित>>> +1
खुप दिवसांपासुन लिहायचे होते की यावर्षी कावळ्यांनी लवकर आणि भरपुर घरटी बांधली आहेत. पाऊस जास्त पडेल का? >>> asa asata ka?? wah!! bandhlit khari jasta gharati!
yellow lily, funnel spider photos cute...
एकदा आमच्या गावाला नक्की जाऊ
एकदा आमच्या गावाला नक्की जाऊ या (घेतलं बरं आमंत्रण लावून).+१००.
ममो.... शेताचे काय सुंदर हिरवे फोटो आहेत !
निरु ...कोळ्याचे फोटो फॅन्टास्टिक!
कावळ्यांच्या घरट्यावरुन
कावळ्यांच्या घरट्यावरुन पावसाचा अंदाज पूर्वापार असा बांधला जातो...
कावळ्यांनी लवकर घरटे बांधले तर पाऊस लवकर येणार.
झाडाच्या शेंड्याजवळ बांधले तर पावसाचे प्रमाण कमी रहाणार... मधे बांधले तर मध्यम आणि शेंड्यापासून खाली बांधले तर प्रमाण जास्त रहाणार.....
असे ऐकून आहे.....
नि ग च्या सव्वीसाव्या
नि ग च्या सव्वीसाव्या भागाबद्दल अभिनंदन! सगळेच फोटो सुंदर आहेत! सद्ध्या मला इथे लिहायला जमत नाहीये, पण गप्पा वाचते नक्की!
वरच्या सावलीच्या पिवळ्या लिलीसारखी ही गुलाबी लिली:
आणि ही टेकडीवर भेटलेली फुलं:
अभिनन्दन !!! खुप झक्कास
अभिनन्दन !!! खुप झक्कास प्रस्तावना!!!
सुप्रभात
सुप्रभात
गौरी, ती टेकडीवरची पिवळी
गौरी, ती टेकडीवरची पिवळी फुले फालसांची. त्याची फळे चवीला खुप छान लागतात. त्यांचे सरबत करतात.
आज सकाळी, आमच्या कॉलनीत दिसलेला कांचन / कचनार ( फोटो मोबाईलवरून काढलेत )
Pages