"मनाला भरकटू द्यावेत हे उत्तम "

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 24 June, 2015 - 00:03

जरा चुकलीच जर का जीवनाची सम
मनाला मारणे सोडू नको बेदम

जगावे हीच ठरते जर खरी घुसमट
मनाला भरकटू द्यावेत हे उत्तम

निराशा वेदना हळहळ जमा झाली
पुरा झाला सभेचा जीवना कोरम

विधात्यानेच आरक्षण बनवलेले
कुणा धोंडा कुणाला पसरले जाजम

असे भौतीक की कैलास आध्यात्मिक
कधी सोहम म्हणे म्हणतो कधी कोहम

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विधात्यानेच आरक्षण बनवलेले
कुणा धोंडा कुणाला पसरले जाजम>>>>>>सुरेख! आवडली.