असे नाही

Submitted by जयदीप. on 22 June, 2015 - 23:13

जिंकू किंवा मरू असे नाही
आपण शेवट बघू असे नाही

कोणावरती हसू असे नाही
कोणासाठी रडू असे नाही

साधे सोपे लिहून ठेऊया
पण कोणाला कळू असे नाही

आपण त्यांच्या पुढे उभे राहू
आपण मागे पडू असे नाही

मित्र म्हणाले जुने चला भेटू
भेटू तेव्हा बसू असे नाही

झालो आपण चुकून आरोपी
आपण दोषी ठरू असे नाही

चल एकांता कुठे तरी जाऊ
आपण तिकडे रमू असे नाही

त्या रस्त्याने पुन्हा पुन्हा जाऊ
त्या वळणावर वळू असे नाही

हे जग आता बुडेल केव्हाही
तोवर आपण असू असे नाही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधे सोपे लिहून ठेऊया
पण कोणाला कळू असे नाही>>>वाह् !!! किती खरय हे.

त्या रस्त्याने पुन्हा पुन्हा जाऊ
त्या वळणावर वळू असे नाही>>>मस्तच.....