" पुरता भिजून सूरकुतलेला "

Submitted by Charudutt Ramti... on 22 June, 2015 - 09:18

" पुरता भिजून सूरकुतलेला "

पहायची, पुन्हा एकदा वाट,
त्या कोरड्या क्षितीजा काठी...
तो चिंब ओला पक्षी,
पुन्हा तारेवर दिसण्यासाठी...

मिटून जाण्या आधी,
ते नभानभातील अंतर…
झरझर वाहण्या निर्झर,
ते आतूर पाषाण-प्रस्तर…

रंगहीन छत्री कुत्र्याची जपते,
ओलेत्यानेच तिचे अस्तित्व…
तिकडे इंद्रधनू चे जरासे,
ते मुजोर व्यक्तिमत्व…

मी नक्षत्रान्चा बन्दी
उभा वार्याची पाहत वाट…
भवतालि विस्तीर्ण ढगाळ किनारा
तितकेच ढगाळ, मनाचे बेट…

शेताच्या बांधा वरती उभा मी
असा चिखलात पुरा रूतलेला…
स्वत्वाचा अंगरखा माझा
पुरता भिजून सूरकुतलेला…

चारुद्त्त रामतिर्थकर.
२२ जून २०१५ ( पुणे )

Group content visibility: 
Public - accessible to all site users