चल, पुन्हा पावसाळा आलेला आहे

Submitted by बेफ़िकीर on 21 June, 2015 - 15:14

IMG_2731_0.JPG

चल, पुन्हा पावसाळा आलेला आहे

ते रस्ते, ती नाही नाही ती गावे
ते दूर दूर जाणारे नित्य दुरावे

कालवे, देवळे, उधाणते आडोसे
स्वागतास अपुल्या तयार ते पारोसे

आपला प्रणय लाजून पाहत्या पोरी
भेदली जायला सज्ज तुझी चाकोरी

ते विस्मरणे की कुठून आलो आपण
जाणीवच नसणे कुठे निघालो आपण

घाटात थांबणे अजरामर मोहाचे
तू स्वतः जाणणे घाट तुझ्या देहाचे

जर घाम जुईच्या वेलीलाही फुटता
तर निसर्गासही गंध तुझा सापडता

शहरामध्ये कोणीच कुणाचे नसणे
रस्त्यात एकमेकांचे केवळ असणे

कर माफ मला पण वाद मिटव तू आता
त्या तुझ्यातल्या माझ्यास कळव तू आता

की अधेमधे मी फक्त तुझी असते रे
पावसात कोणा दुसर्‍याची नसते रे

बघ किती मस्त मोसम झालेला आहे
चल, पुन्हा पावसाळा आलेला आहे

चल, पुन्हा पावसाळा आलेला आहे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर माफ मला पण वाद मिटव तू आता
त्या तुझ्यातल्या माझ्यास कळव तू आता

की अधेमधे मी फक्त तुझी असते रे
पावसात कोणा दुसर्‍याची नसते रे

बघ किती मस्त मोसम झालेला आहे
चल, पुन्हा पावसाळा आलेला आहे

चल, पुन्हा पावसाळा आलेला आहे..................व्वा ..आवडली कविता.

छान