पाऊस असा कोसळता

Submitted by धनुर्धर on 21 June, 2015 - 10:23

थेंब बोलके झाले
कोसळत्या पावसाचे
आठव मनात ओले
सरलेल्या दिवसाचे

भिजल्या डोंगर वेली
माखून रंग हिरवा
झाडा झुडपा मधुनी
मातीत दाटे गारवा

भिजून रात्र ओली
अंधार पांघरून घेते
आभाळाचे चांदण्यांशी
तुटून जाते नाते

पाऊस असा कोसळता
कधी वाटतो उदास
कधी असतो ओथंबलेला
कधी नुसताच भास

. . . . . धनंजय . . . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान