आशा

Submitted by vilasrao on 19 June, 2015 - 06:29

दूर आहे आज गंगा पाहून आलो
अर्घ्य माझे चंद्रभागे देवून आलो !

येत नाही आठवांना तो गंध आता
काय मी हा श्वास तेथे ठेवून आलो ?

ओलते संदर्भ आभाळी वेदनेला
दूर ओझे मी ढगांचे वाहून आलो !

थांबले आता धुमारे या माझ्या व्यथेचे
धुमसतांना एकदा मी पेटून आलो !

थांबवावे गोंधळाला कंटाळलो मी
आज एकांतास माझ्या विनवून आलो !!

वाहली श्रद्धांजली ती केव्हाच मनाला
आज आशा कोणती मी लावून आलो !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. सर्वच ओळी आवडल्या.
तुम्ही म्हणाल की तरीही कोणत्या स्पेशल वाटल्या ?

ओलते संदर्भ आभाळी वेदनेला
दूर ओझे मी ढगांचे वाहून आलो

खासच.

-दिलीप बिरुटे