एक अनोळखी झालेली भेट

Submitted by आनंद राजगोळे on 22 January, 2009 - 09:33

झालेली भेट

( एका एस.टी. स्टॅडव र दोन अनोळखी माणसाची झालेली भेठ आहे. त्यामध्ये ६०-६५ वर्षाची आजी आहे, ती कदाचित आठवड्याच्या बाजाराला कंरज्या [एक प्रकारचं तेल बीचं झाड] घेऊन आली असावी. तर ह्यामधील २०-२२ वर्षाचा एक मुलगा {त्याच नाव रमेश आहे} त्याच शिक्षण चालू आहे पण तो कामासाठी कोणत्यातरी शहरात राहतो. तो शहरातून आपल्या गावी आला असावा! दोघेही एकाच गावाकडचे असावेत आता त्यांची झालेली भेट )

पुढे......

(आजी काखेत करंज्या विकून रीकामी झालेली पिशवी अन् ५ रुपयाच्या चिरमुर्‍या घेऊन एस.टी.स्टॅड वर गाडी विचारत रमेश जवळ येते)

आजी : काय रं आप्पा मडकुरला जायाच्या गाडीचा येळ झालाया न्हव ?

रमेश : होय आजीबाई, पण ती गाडी आताच गेली. आता तुम्हाला दुपारशिवाय गाडी नाही.

आजी : (मनातल्या मनातं पुटपुठत, 'गेलीस बाई, आता बस म्हातारी कोकलत उन्हात.') आप्पा किती वाजलं र?

रमेश : आता तर १२ वाजले आहेत. गाडी १.३० ला आहे.

आजी : तुला कुट जायाचं हाय लेका?

रमेश : मला शेतगावला जायचं आहे. माझी पण गाडी थोड्या वेळासाठी चुकली आता मला सुद्धा २.०० पर्यन्त बसावं लागणार आहे.

आजी : (मायाळू स्वभावात) कुठनं आलास र, बाबा तू ? डोळ-बिळ सुजलेल दीसाल्यात. जागरण झालीया कायकी..?

रमेश : मुंबईहून येतोय. रात्रभर गाडीमध्ये झोप कुठे लागते? तसा थोडा झोपलो आहे. पण झोप पुर्ण झाली नाही.

आजी : (आश्चर्याने) म्हंमईसन आलास तू ..! काय काम करतासाय म्हंमईत...?

रमेश : मी एका कंपनी मध्ये आहे. फिटर म्हणून काम करतो आणि कॉलेज पण चालू आहे.

आजी : (शंकेच्या स्वरात) काम बी करतूसाय, आणि साळा बी? कस व्हंदतय (झेपणे) र लेका तुला हे संमद?

रमेश : आजी थोडाफार त्रास होतो. पण काहीतरी करायच म्हणजे थोडा त्रास सहन करायला नको का?

आजी : व्हय लेका, ते हाय रं. हे शेतात बी काय धड पिकत न्हाई. खर तुज रूप लईच ठकलेलं दीसतय. त्यावयन तूला तरास व्हताय त्यो साप दीसतय की!

रमेश : (हसत) होय आजी मला थोडा त्रास होतोच. फक्त झोप पुरी होत नाही, दीवसभर काम आणि रात्रभर अभ्यास ह्यामुळे झोप कमी होते.

आजी : व्हय लेका सगळ बी कराय पाजे. पर येवढा बी तरास घिऊ नगस.

रमेश : (परत हसत) हो आजी आता थोडा वेळ जास्त झोपेन.

आजी : (विषय बदलत) बाबा र तू म्हंमईत ठाण कुठसरं आल?

रमेश : (आजीकडे आश्चर्यान बघतं) ते तर माझ्यापासून थोड दुर आहे. एक-दीड तास लागेल कदाचित. पण आजी तुम्ही कस काय विचारलं?

आजी : (नरवस चेहरा करत) कस काय कुठं बाबा माझा ल्योक र्‍हातोया तिथ.

रमेश : होय ....! मग तुम्ही का राहत नाही त्यांच्याकडे.

आजी : व्हय बाबा. लगीन व्हई पतोर आई-बा मग. ती कैदाशिन पदरात पडली म्हंजे 'आई-बा'सनी कोण ईच्चारतय. तू बी उद्या तेच करशिल कुणावर इसवास ठेवायचा.

रमेश : (गोंधळुन) म्हणजे मी समजलो नाही.

आजी : कस समजल लेका. तू अजन नकळता हाईस. कळता झाल्यावर समजलं समद.

रमेश : (काकुळीने) आजी तुमचा मुलगा ........

आजी : (मध्येच बोलण तोडत) व्हय बाबा अंगाला लुगड नेसायला नव्हत दंडाला-दंड काडून तेचं-तेचं वरिसभर
नेसून साळा शिकीवली आणि म्हातरंपणी हे भोग आल मला.

रमेश : तुमचे मालक?

आजी : हाईत न्हव, तेनी तर काय लेकासाटन थोड केलय? ध्याडबर देसायाकड च्याकरी करून रा'सारी पोती शिवून हेच्या साळला भर्ती केलती.

रमेश : (रडवट चेहर्‍याने आजीकडे बघत) पण तो कुठे आहे. तुम्हाला एकच मुलगा आहे का?

आजी : तेला आता चांगली नोकरी लागलीया. त्यो तेच्या बिराडासंग म्हंमईला र्‍हातोय. (रमेश आलेला गोठ घोठतच आजीच एकत आहे) आमाला लगीनं झाल्यावर पा-सा वरस मुल नव्हती. लगनाच्या सातव्या वरसी ह्यो जलमला. लाड-लाड केल एकचं पॉर म्हणून. पर "आमच्याच खांद्यावर ..... आमच्याचं कानात मुतल्यागत" केल्यान तेनं.

रमेश : आजी कितवी पर्यन्त शाळा झाली आहे त्याची.

आजी : कायकी लेका, आम्ही आडाणी आमासनी काय कळतय. १० वीच्या वर शिकलाय हिंग्लजला ईत व्हता चार वरस. आम्ही दोघा नवरा-बायकोनी एकदी पोटाला चुकीवल आसल खर हेच्या शाळला काय कमी पडू दिलाव नाही. हेच्या साळचा खरचं परवडणा झाल्यावर हेच्या 'बा'न देसायाकड चार वरस चाकरी केली. दीवसबर त्येच्या शेतात गुरासरख राब-राब राबायचा आणि रातीला 'आठ आण्याला' एक पोत शिवायला मिळायचं, म्हणतान रातभर पोती शिवत बसायचा. म्या म्हारनीसरख गावल तेच्याकड ईच्चारून कुलीला जायाची. तबा राबतान वाटायच पोरग माझ शिकल. आमासनी चार ध्याड सुख बघायला तर हे सुख आमच्या पदरात पडलय (आजी सांगत रडू लागली)

रमेश : (पाण्यावलेल्या डोळ्यांनी) आजी रडू नका. तो गावी कधी येत नाही का?

आजी : (पदरानं आलेली दु:ख पुसत) इना तर येतोया. दोन दिस घरात र्‍हातोय. उरलेलं सार दीस सासू-सासर्‍याकडं घालून जातोया.

रमेश : (रागाने) ही तुम्ही लाडावून मोठी चुकी केली.

आजी : व्हय लेका सातानवसान एक पॉर झालेल मग काय करावं. आस व्हईल म्हणून आमासनी काय माईत व्हत (आजी परत रडू लागते)

रमेश : (डोळ्यात आलेली दु:ख पुसत) आजी रडू नका. तुमची शेती वगैरे आहे की नाही.

आजी : कसली शेती हाय लेका वराबर. त्यात आम्हा म्हाता-म्हातारीच पॉट पाणी पिकतय. ह्या वयात बी देवान आम्हाला राबायला लावलय. आमचा म्हातारा आजन कामाला जाताय कुणा-बणाच्यात. म्या करंवद, करंज्या, बिब्या गोळा करून इकतूया. व्हतया ह्यात संमद आमचं.

रमेश : (खिशातून पाकीट काढत) हे घ्या आजी काही पैसे खर्चासाठी राहू द्या.

आजी : नको र बाबा, नको नको.

रमेश : आई, घे असू दे. मला तुमचा मुलगा समजा.

आजी : व्हय रे लेका पोटची आशी गत आणि ......

रमेश : (मध्येच बोलण तोडत) असायचंच थोडी फार श्रीमंती आली की अशा लोकाना गरीबीचा विसर पडतोय. येईल हा कधीतरी पाया पडत तुमच्या.

आजी : (डोळ्यातून दु:ख काढत) किती शाणा हाईस र लेका. माझ्या पोटाला आसा ल्योक आला आसता तर ....!

रमेश : (हसत) हो आज पासून तुमचा पण मुलगा.

आजी : (मायेन गालावर हात फिरवून कडाकडा बोटे मोडत) माझा ल्योक गं बाई, देवा ..... हेच्या रूपान भेटलास काय र तू.

रमेश : (हसत) अहो....! आजी देव हा शोधायचा नसतो.

आजी : (प्रेमळ स्वभावात हसत) गप्प र्‍हा तिकडं.

रमेश : आजी तुम्ही मला तुमच्या मुलग्याचा पत्ता किंवा फोन नंबर देऊ शकाल?

आजी : हाय की. खर घरात हाय. खर लेका घेऊन काय करशिल काय जावून तेला बारक्या पोरासरख, फडाडा चार मारशील .....

रमेश :(मध्येच बोलण तोडत) नाही तस काही करणार नाही.

आजी : लेका तू किती दीवस हाइस र?

रमेश : आहे आजी मी एक महीना आहे आजून.

आजी : मग ये र लेका मढकूरला एगदी.

रमेश : हो नक्की येईन मी, त्यावेळी पत्ता द्या तुमच्या मुलाचा.

आजी : व्हय, देतो की. गावात आलास की 'सावताच्या आक्कूबाईचं' घर कोनचं ईच्चारलास की, सांगत्यात कोण बी.

रमेश : हो ठीक आहे. पण हे पैसे राहू द्या तुमच्याकडे. जास्त नाही आहेत २०० रुपये आहेत. आणि मी हे पैसे ह्यासाठी देतोय की तुम्ही येवढे वय होऊन ही राबताय. घ्या नको म्हणू नका.

आजी : नको, नको हाइत की पैस. म्या उगी सांगीतलो तुला समद. नको , नको ..... पैस नको.

रमेश : अहो आजी असं सांगितल्यामुळे तर मन मोकळ होतं. आता घ्या हे पैसे.

(आजी डोळ्यातून दु:ख काढते)

रमेश : परत का रडताय आता?

आजी : काय न्हाई, रडू आल लेका.

रमेश : जाऊ द्या जास्त लक्ष घालू नका तिकडे, जो पर्यन्त हात पाय आहेत तो पर्यन्त चालवाय ....

(मध्येच एक गाडी प्लट-फ्रॉमवर येते)

थांबा आजी गाडी कोणती आहे बघून येतो.

आजी : (दिलेल पैसे नरवसपणे घेत) हूं .... बघ ... बघ.

रमेश : आजी चला मी येतो. आमच्याचं गावची गाडी आहे.

आजी : (परत गालावरून हात फिरवतं) ये रं बाबा गावाकड.

रमेश : हो नक्की, आणि तुम्ही व्यवस्थित रहा. ठिक आहे चला (तो बैग घेऊन पुढे होतो) चला टा..... टा

(आजी पाण्यान तुडुंब भरलेल्या डोळ्यानी हात वर करून टा ... टा करत निरोप घेतं होती)

आनंद राजगोळे

गुलमोहर: 

जीवनात अशा आजींसारख्या भेटणार्‍या खास व्यक्ती कायमस्वरूपी मनांत घर करून रहातात...... खूपच छान लिहलं आहे...... जीवनके सफरमे मिल जाते है लोग....... कल्पना

कल्पना,

धन्यवाद .....

मी आपला खुप खुप अभारी आहे...

अर्थात श्रीमंती मुळे आपल्या जन्मदात्या आई-बाबाना विसरनारी मुले ह्या समाजात राहतात हेच सांगायच होत मला ...

फार सुंदर...
ह्याचा पुढचा भाग पण लवकरच वाचायला आवडेल..
रमेश आजींक्डे जातो का ??
त्यांच्या मुलाचा पत्ता घेऊन काय करतो???
..............
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही Wink Happy

वैदही,
धन्यवाद मी ह्या संवादाचा दुसरा भाग लिहीन्याचा प्रयन्त करेन ...

प्रोत्साहनाबद्दल आपला बनापासून अभारी आहे ...

आनंद,
तुमची लिहीण्याची शैली आवडली.

रुपाली धन्यवाद ,

मी आपला मनापासून अभारी ....

आजीची भाषा आवडली.. Happy
पण संवाद म्हणून असंच ठीक आहे. 'पुढचे भाग' वगैरे लिहून यातली मजा जाईल.

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

दीपक सर,

धन्यवाद मी आपला मनापासून अभारी आहे ...

thankuuu very much

आनंद आ.राजगोळे

छान

छाया,

धन्यवाद मी आपला अभारी आहे ....

न म स्का र ..
तुमचे कथानक खरे आहे की नाही माहीत नाहे पण वाचून
डोळ्यातून दु:ख आली हे नक्की.
ध न्य वा द.....ध न्य वा द...........ध न्य वा द..................ध न्य वा द.
ध न्य वा द.....ध न्य वा द...........ध न्य वा द..................ध न्य वा द.

रामदास,

आपला मनपूर्वक अभारी आहे मी.

धन्यवाद !

फार सुंदर...
ह्याचा पुढचा भाग पण लवकरच वाचायला नक्किच आवडेल..

मधुरा,

आपला मनपूर्वक अभारी आहे ....! नक्कीच मी प्रयत्न करेन पुढचा भाग लिहीण्याचा.

धन्यवाद !