तुझा स्पर्श अ‍ॅडव्हान्स होता (हझल)

Submitted by किरण कुमार on 18 June, 2015 - 06:35

तुझा स्पर्श लाघवी अ‍ॅडव्हान्स होता
गुंतलोच नव्हतो तरी रोमान्स होता

आड आला तो जमाना तुझ्या माझ्या मध्ये
सुखाने झोपताना माझा प्रान्स होता

काढला तूच नकाशा भारताचा एकदा
रंग भरता कळाले तो जणू फ्रान्स होता

स्मरुनी पहा तूही काय जखमा जाहल्या
चिरताना ह्रदय असाही लान्स होता

पाऊस वादळाची ना वाटे भिती मला
जीवघेणा हळवा तो तुझा ग्लान्स होता

सांग खरेच कि भास आहे,प्यादे पटावरी
घोड्याचा पहावा तेवढा डान्स होता

कोण आले कोण गेले विसरावे लागले
आठवते एवढेच कि मलाही चान्स होता.

किकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users