जगाचा आदर ठेवा

Submitted by जयदीप. on 16 June, 2015 - 23:50

जगाचा आदर ठेवा
सुरक्षित अंतर ठेवा

रिकामे ठेवा घर पण
स्वतःचा वावर ठेवा

विचारा प्रश्न स्वतःला
स्वतःचे उत्तर ठेवा

नको ती कामे सोडा
हवे तर नोकर ठेवा

करा स्वागत सगळ्यांचे
पुरेसे अत्तर ठेवा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users