"मदिरा"

Submitted by poojas on 11 June, 2015 - 02:53

This poem is dedicated to reckless people who DRINK & DRIVE !!!

भरून प्याला लावून ओठी
मदिरा मिश्रित ग्लास..
रसिका कसली विझते प्यास ??

अमाप पैसा .. ऐसा वैसा ..
रिचवत घुटके.. अगस्ती जैसा
घशास कोरड पडता तुझिया
तुझाच सत्यानास ..
रसिका कसली विझते प्यास ??

Status वा Symbol म्हणावे .. Occasion ना कधी सरावे ..
रस्त्यावरचा रंक उपाशी पायदळी तुडविण्यास ..
रसिका कसली विझते प्यास ??

ती तर मदिरा नशा कशाची.. तमा जगाची तिला ..
असंख्य संसारांचा संगम रुचला नाही जिला ..
तिचा उपासक होऊन तीर्थी आचमन करता ऱ्हास ..
रसिका कसली विझते प्यास ??

शहाणा हो तू... नको पिऊ तू ..अमृत समजून जहर..
ठरेल शेवट आयुष्याचा भले तुझी ती लहर..
घटका घटका मोजत घुटका,
तुझाच घेईल घास
रसिका विझेल का मग प्यास ??

poojaS..

Group content visibility: 
Public - accessible to all site users