पुण्यातील Psychiatrist बद्दल माहिती हवी आहे

Submitted by रीया on 9 June, 2015 - 04:54

एका मित्राची आई सध्या मानसिक आजाराने त्रस्त आहे.
वरचे वर आत्महत्येचा प्रयत्न करणे, जगण्याबद्दलची अनेच्छा इत्यादी प्रकारांनी ग्रासलेली आहे.
गूगल केल्यास काही नावे व पत्ते मिळाले पण मला स्वतःला वा माझ्या ओळखीत कोणालाही याबद्दल योग्य डॉक्टर माहीत नसल्याने इथे धागा काढला. कोणी प्रत्यक्ष अशा कोणत्या डॉक्टरला ओळखत असल्यास वा तुमच्या ओळखीत कोणी उपचार घेतल्याने खात्रीशीर रित्या त्या डॉक्टरांबद्दल माहीती देऊ शकत असल्यास मदत केली तर फार बरे होईल. कारण ऑनलाईन माहीती मिळालेल्या कोणत्याही डॉक्तरकडे जाण्यापेक्षा माहीतीतल्या डॉक्टर कडे गेलेले केंव्हाही चांगलेच

हा मित्र पुढच्या आठवड्यात ऑनसाईटला जात असल्याने हा इतकाच आठवडा वेळ त्याच्याकडे आहे.पुढची ट्रिटमेंट बाकीचे घरचे सांभाळून घेतील पण चांगले डॉक्टर मिळाल्यास त्यालाही निश्चिंतपणे जाता येईल त्यामुळे शक्य असल्यास प्लिज लवकरात लवकर मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. अर्चना जावडेकर.

मोबाईल नंबर लगेच देतो. मला मेसेज कर. माझ्या नव्या हँडसेटमध्ये तुझा नंबर नाही आहे.

Thanks Happy
financially strong nahiye hi family faar tyamule kharch atokyat asel tar better rahil

ठाणे >>>
??????????????????

Need doc in Pune

ठाणे >>>
??????????????????

Need doc in Pune

ते वाच्ल वाचले मी रीया,
पण तातडी ने जर सल्ला हवा असेल तर माझे फक्त सजेशन आहे ते, शिवाय ते नंतर ची ट्रीट्मेंट साठी पुण्याला कोणी डॉ. सुचवतील ना

तो शनिवारी रात्री चाललाय बाहेर. त्यामुळे तो गेल्यावर (किंवा असतानाही) ठाण्याला न्यायला आणायला जमणं मुश्किल आहे Sad

आनंद नाडकर्णी- आय.पी.एच. ठाणे >>>>>>> माझ्या ओळखीतल्या २ जणांना यांचा अनुभव आहे. बेस्ट आहेत. पुणे-मुंबई जमु शकेल रीया..

डॉ. हेमंत चांदोरकर अतिशय सिनिअर असून चांगले आहेत.
२५४४५८२६, ९४२२०००४११ नळ स्टॉप जवळ क्लिनिक आहे
डॉ. मंजिरी दीक्षित या एक आहेत
९८२२२६४८६३ यांचे क्लिनिक बाजीराव रोडला असून त्या सकाळी दिनानाथ हॉस्पिटल येथे असतात.
माझ्या अगदी जवळच्या नातेवाइकाने या दोघानची ट्रिटमेन्ट घेतली आहे.

मो, चनस थँक्स

चनस, मला तो धागा आठवत होता पण फक्त सामुपदेशकांचा आहे असं वाटल्याने शोधला नाही. Happy

सगळ्यांनाच धन्यवाद Happy

ठीकै.. तु शोधला असशीलच म्ह्णुन मी पण दोन वेळा चेक केला बरोबर लिंक आहे का.. मग दिला.. Happy

रीया - डॉ उल्हास लुकतुके, विजय टोकीज जवळ क्लिनिक आहे, संध्यकाळी ५-८.
फोन : २४४५७७९८

अतिशय सिनियर, वय ७५ तरी आहे. प्रचंड अनुभव आहे. स्पष्ट्वक्ते आहेत. पैश्यासाठी नाडणार नाहीत.