मुकुंद वडी प्रकार २ ( राजस्थानी चक्की कि सब्जी )

Submitted by दिनेश. on 8 June, 2015 - 09:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
नेट आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, साष्टांग दंडवत आहे तुम्हाला!
मला स्वैपाकाची भयंकर नावड आहे त्यामुळे तुमचं हे नित्यनियमानं नवनवीन पदार्थ रांधणं बघून दर वेळेस माझी पाची बोटं तोंडात जातात! पण कूकबुक्स, कूकरी शोज बघणे हाही तितकाच आवडता विरंगुळा असल्यामुळे तुमचे धागे न चुकता उघडून वाचलेही जातात Happy आता या नवीन पदार्थात काय शब्दशः वाढून ठेवलंय ते बघायची जाम उत्सुकता असते, ती बहुतेकदा पूर्णही होते Lol
ते असो, माय हॅट्स ऑफ टू यू!!

दिनेशदा ___/\___.

दिनेशदा मुंबईला हॉटेल काढाच आणि तुमचे हे एक्स्क्लुझिव पदार्थ ठेवा. हे करणं कठीण वाटतं मला. तिथे येऊन खाईन.

माय हॅट्स ऑफ टू यू!! > माझ्याकडुनपण.
दिनेशदा एव्हढी मेहनत तुम्हीच करु शकता. ___/\___

वडी शिजविण्याआधी त्यात मीठ वैगरे घालायची गरज नाही का? कारण तळलेल्या वडीत रस्सा मुरतो का व्यवस्थित?
हे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे श्रावणात एखाद्या रविवारी मटणाला पर्याय म्हणुन करुन पाहण्यात येईल. Wink

शिर साष्टांग नम......................................... तुमचे (अभ्यासपूर्ण) पाककौशल्य आणि त्यावरील निस्सिम प्रेम आणि त्याकरता सर्व काही कष्ट करायची तयारी - या सगळ्यांनाच .... शिर साष्टांग नम.....

"अन्न हे पूर्णब्रह्म" हे अनुभवणारे बहुतेक तुम्हीच एकमेव असावेत... >>>> हे सारे आधीच्या मुकुंदवडीवर लिहिले होते तेच इथेही लिहित आहे ...

गव्हामधे ग्लुटेन असते हे फक्त पुस्तकात शिकलो होतो - मात्र प्रत्यक्षात ते गव्हातून कसे वेगळे करायचे याचे प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलेत - _________/\_________

फोटो छान दिसतोय.
अश्या चिवट केलेल्या कणकेच्या वड्या उकडून तळून खुसखुशीत होतात का?

मी पुरणपोळीच्या एका पाककृतीत वाचले होते की पारीसाठी कणीक+मैदा नेहमीच्या पोळीच्या कणकेसारखी भिजवून तो गोळा बुडेल इतक्या पाण्यात घालून ठेवा. अर्ध्या तासाने ते पाणी ओतून देऊन कणीक चांगली रग्गड मळून घेऊन तेलात बुडवून नेहमीप्रमाणे पुरणपोळ्या करा. तर अश्याप्रकारे भिजवलेल्या कणकेमध्ये काय रासायनिक प्रक्रिया होत असेल? ही प्रक्रिया पुरणपोळी मऊ व्हायला खरंच मदत करत असेल का?
मऊ पुरणपोळी करणं हे अजूनही चॅलेंज आहे माझ्यासाठी. त्यासाठीच्या युक्त्या शोधताना सापडलेली एक प्रक्रिया तुमच्या ह्या पाकृत आढळली, त्यानिमित्ताने चर्चा होईल म्हणून इथे असा अवांतर प्रश्न विचारतेय.

छान आहे,रेसीपी.

आम्ही साबुदाण्याच्या चिक्वड्या करताना आणि पुरण्पोळी करताना अशी पाण्यात बुडवून ठेवायची पद्धत वापरतो.

पाण्यात पीठाचा गोळा भिजवल्याने स्टार्च निघून्न जावून, ग्लूटेन ज्यास्त क्रियाशील होते व लवचिकपणा वाढतो.

म्हणून पीठ तलम होते.

धन्यवाद सर्वांना ( लाजवू नका रे. हा एक पारंपरीक पदार्थ आहे. )

मटनाचे तूकडे त्यातील स्नायूमूळे ( खरे तर ते टांगून ठेवल्यामूळे ) ज्या टेक्श्चरचे होतात तसेच याचे टेक्श्चर असते. कच्चे असताना हाताळणे कठीण जाते, पण ( भरड मिसळून ) शिजवल्यावर मात्र कापता येते.

पण अश्या सर्व स्टार्च काढून टाकलेल्या ग्लुटेनच्या पोळ्या लाटणे अवघड आहे. ते रबरासारखेच असते. लाटले तरी परत आक्रसेल.

आणि गोळा नुसता पाण्यात बुडवून सर्व स्टार्च जात नाही. तो हाताने कुस्करावा लागतो. त्यावेळी तो अगदी मुलायम लागतो हाताला. पण तश्याही पिठाच्या पोळ्या लाटायच्या झाल्या तर पुरण अगदी घट्ट हवे, मैद्याची पारी पातळ पाहिजे आणि लाटायला भरपूर तेल वा पिठी घ्यावी लागेल.

मन्जुडी!
(मउ पुरणपोळि साठि मागे कुणीतरी जुन्या मायबोलित ही पद्द्धत लिहली होती ...मी याच टिप्सने करते आता पुरण्पोळ्या)

कणकेत जरा जास्त मोहन घालुन जरा आधी नेहमीच्या पोळिच्या कन्स्तिटन्सि सारखच भिज्वायच ...तासाभराने एका वाटित पाणि,एका वाटित तेल आणि पोलपाट अस घेवुन मस्त मान्डि घालुन खालि बसायच.. तेल पाणि लावुन
कणिक मळयला सुरवात करायची... पाण्याने कणिक सैल होते,तेल लावल्याने चिकटत नाही..मग पोलपाटावर कणीक घेवुन ऊडदाच्या पापडाला जस पिठ आपटतो तस आपटायची.. कणिक लवचिक होवुन मस्त स्मुथ टेक्क्ष्चरची झाली की एका डब्यात खाली वर तेल घालुन झाकुन ठेवाय्ची ...अस केल्याने पोळ्या सुरेख मौ होतात ..

(कनीक पाण्यात बुडवायची माझी हिन्मत होणार नाही...म्हणुन च पारंपरीक असली तरी वरची क्रुती मला अपिल झाली नाही..कदाचित कुणि आयती खायला दिली तर चव घेता येइल)

दिनेश _______/\_______
इतक्या मेहनती चे प्रकार तूच इतक्या मन लावून करू शकतोस!!!!

सई. + शशांक +१०,०००!!!!