सप्तशृंगीगडाला प्रदक्षिणा !

Submitted by Yo.Rocks on 21 January, 2009 - 12:47

डोंगराच्या कुशीत असलेल्या मंदिराचे पहाटे टिपलेले छायाचित्र
2.jpg

देवींचे दर्शन घेतले नि बर्‍याचजणांना ठाउक नसणारी प्रदक्षिणेची वाट धरली..
32.jpg
अप्रतिम वाट आहे.. बराचसा रस्ता कड्यांनी बांधुन काढला आहे तर काही ठिकाणी पाउलवाट आहे..
ही प्रदक्षिणा अनवाणीच करायची असते त्यामुळे अधुन मधुन खांदे उडवत चालावे लागते.. Happy पण संपुर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालताना आजुबाजुचा परिसर पाहुन थकवा निघुन जातो.. संपूर्ण प्रदक्षिणा पुर्ण करण्यास जवळपास फक्त दोन तास लागतात..!!

11.jpg
ही वाट अशी वेडीवाकडी जाते..
15.jpg16.jpg21_0.jpg7_0.jpg

हा समोरच मार्कंडेश्वराचे मंदीर असलेला डोंगर..
IMG_0081.jpg

गुलमोहर: 

वाव. छान. देवीचं आणि मंदिराचं दर्शन घर बसल्या करवलस. देवीचा फोटो काढायची परवानगी देतात का?

देवीचा फोटो काढायची परवानगी नाहीये ना.......??? Happy
पण बाकी फोटो मस्त!!!!!!!

मस्तच योग्या Happy

छानच

योगी, एकदम मस्त फोटु Happy पहाटेच्या फोटुतील वातावरण छान वाटले.. अन असं सकाळीच देव-दर्शन मन फार उल्हासित करतं...संपुर्ण दिवसासाठी.

सुरेख आहे!

आपल्या भारतात देवीची मंदीरं अशी उंचावरच का आहेत ह नेहमे मला प्रश्न पडतो. माहुरची देवी देखील किती उंचावर विराजमान झालेली आहे!!!!

तो चौरस तलाव वगैरे दिसतो आहे.

योग्या, केव्हा गेला होतास? मी मागल्या वर्षी जाऊन आलो. तिथे रहायला फारच छान वाटतं. पहाटे उठून मंदिरात गेलं की खरंच खूप प्रसन्न वाटतं. मी गेलो होतो तेव्हा तिथे रोपवेचं काम चालू होतं. ते झालं का पुर्ण?

-योगेश

धन्यवाद मित्रांनो..

देवीचा फोटो काढायची परवानगी नाहीये ना.......??? >>
ते मलाही न उलगलडलेलं कोडं आहे.. फलक आहेत गाभार्‍याबाहेर तशे(तिथे म्हणा कोण बघतं).. पण आम्ही दर्शनाला गेलो तेव्हा जरादेखील गर्दी नव्हती.. आधी वाटले बंदी आहे ! नि खरच एकाचा मोबाईल जप्त देखील केला गेला.. पण काही मिनिटातच दुसरी सेक्युरिटीची माणसे आली तेव्हा एकजण बिनधास्तपणे चक्क हॅन्डिकॅममध्ये शुटिंग करत होता पण कोणीच आक्षेप घेतला नाही... ही सेक्युरिटीची माणसे खुप दयाळु असतील कदाचित !! वरील फोटोदेखील चोरुन न काढता त्यांच्या बाजुलाच उभे राहुन काढलेला आहे !!!

तो चौरस तलाव वगैरे दिसतो आहे. >> या गडाला पुर्ण प्रदक्षिणा घालताना आपण गाडीने इथे किती वरपर्यंत नि कसे आलो ते ही कळते.. नि थक्क व्हायला होते.. Happy

तिथे रोपवेचं काम चालू होतं. ते झालं का पुर्ण? >> पुर्णावस्थेत आहे.. चौकशी केली असता सरकारने परवानगी नाही दिली अजुन (म्हणे जिवदानी देवीचे मंदीर(विरार्,मुंबई) इथे अपघात झाला होता म्हणुन इथे उशीर.) सध्या फक्त मालवाहतुकसाठीच वापर केला जातोय..

अहाहा! सुंदर फोटोज आहेत सगळे...! Happy

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

धन्यवाद देवीचे दर्शन दिल्या बद्दल.....................

तो तलाव बहुतेक सतीचा कडा (? अश्विनी चुकत असेल तर बरोबर कर गं) आहे तिथला असावा. खरच खुप प्रसन्न वाटत तिथे गेल्यावर. पण जुनं मंदिर अजुनहि छान होत एकदम भव्य आणि शरिर आणि मन दोन्हिला एक प्रकारचा प्रसन्न थंडावा आल्यासारखं वाटायचं. अगदि १२-१५ वर्षांपुर्वी पर्यंत नांदोरी गावापासुन मंदिरापर्यंत लोक पायी चढुन जायचे.

योग्या मस्तच रे...
दोन तिन वेळा जाण्याचा योग आला... मोठ्या बसेसना अजुनही बंदी आहे का?
रोप वे होतोय खरा... पण माकडांसोबत चढाई करण्यात जी मजा आहे ती रोप वे मधे नसणार...

फोटो छानच योग्या Happy

व्वा! Happy प्रदक्षीणेच माहित होत पण कधी प्रयत्न केला नाही, आता कराव म्हणतो!
हा बघ एक जुना ब्लॅक &व्हाईट फोटो! (मी काढलेला नाही! असाच सन्ग्रहात हे, कुणाकडून मिळाला माहित नाही)
Devi_vani.jpg
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अरे वा! हा फोटोही सुरेख आलाय!

इंद्रा.. माहित नाही.. बहुतेक अजुनही बंदी असावी.. कारण फक्त एसटी नि छोट्याच गाड्या दिसल्या तिथे...

लिंबुदा.. खुप खुप धन्यवाद या दुर्मिळ फोटुबद्दल.. आत्ताच सेव करुन ठेवला.. Happy