'प्रकरण' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आपल्याला वाटत असतं की, आपण रोजचं जगणं अगदी आरामात जगतोय. खातोय. पितोय. हिंडतोय. काम करतोय. एकटे किंवा कुणासोबत. आणि वरती आकाशामध्ये तो ढग येऊन थांबलेला कळतही नाही आपल्याला.

असंच वाटत असतं की, आकाश तर अगदी निरभ्र आहे वरती. कारण खरं म्हणजे गेले अनेक दिवस आपण वर पाहिलेलंच नसतं. पण एकदा कधीतरी नजर वर जाते आणि सगळा मामला लक्षात येतो. आपण प्रेमात पडलो आहोत. पहिल्यांदाच किंवा पुन्हा एकदा.

आता तो ढग दिसल्यानं आपल्याला बरं वाटतं. आपण जाऊ तिथे तो आपल्यासोबत येतोच. सगळी छतं पारदर्शी होतात. रात्री गच्चीवर जावं, गावाबाहेर हायवेवर जावं, कामामध्ये अगदी स्वतःला बुडवून घ्यावं तरी आता नजर सतत वर जायची थांबवता येत नाही. आपल्याला हलकं वाटू लागलं, आपली सवयच बदलते आणि आपण नकळत एकटे असताना हसत बसलेलो असतो. ते आता आपल्या हातात उरलेलं नसतंच. आता प्यायला घेतलेल्या प्रत्येक पाण्यात तो ढग दिसू लागतो. तो असा मोठा मोठा का होत चाललाय, याबद्दल धास्ती वाटू लागते.

आयुष्यात हे वारंवार होण्याचा मोहक, तापदायक आणि लोभस अनुभव मी घेत आलो आहे. काही वेळा आधी गोंडस छोट्या शुभ्र असणार्‍या निरभ्र आकाशाची स्वप्नं पाहिली आहेत. ती खरी झाली आहेत. पण अगदी सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो, त्याआधी आकाशाचा जो निळा रंग होता, तसाच चमकदार निळा रंग आजही प्रत्येक ढगाच्या आगमनापूर्वी कसा काय तयार होतो, याचं आश्चर्य मला वाटायचं थांबलेलं नाही.

सध्या माझ्या डोक्यावरच्या विस्तीर्ण स्वच्छ निळ्या आभाळात एक हसरा छोटा ढग येऊन थांबलेला आहेच. पण तो बेटा आपलं आकारमान आळोखेपिळोखे देऊन विस्तृत करणार याबद्दल मला तीळमात्र शंका नाही.

प्रेम करणं ही माणसाच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशी इच्छा होणं, ही याच प्रवृत्तीची दुसरी सहज अशी बाजू. आपण प्रेमात पडण्याचं थांबवू शकत नाही. आपलं वय काहीही असो. आपण एकटे असू वा दुकटे. प्रेमाला शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आयाम असतात. काही व्यक्ती हे दोन्ही हात पसरून आपल्याला जवळ घेतात, तर काही एका हातानंच आपल्याला कुरवाळत राहतात.

शारीरिक प्रेम करण्याची इच्छा प्रबळ होणं पण ते करू शकण्याची परिस्थिती नसणं, या नितांतसुंदर अवस्थेत त्या प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना काही वेगळ्या जाणिवांची तेजस्वी करत असतात. ही प्रेमाची अवस्था सगळ्या आसमंतात नवी अस्वस्थता तयार करणारी आणि मनाला नवी ऊर्जा देणारी असते. मी ह्या अवस्थेमध्ये पूर्वी तडफडत असे. तो आता या अवस्थेत रेंगाळायला उत्सुक आणि सक्षम झाला आहे.

सुरुवातीला आपल्या मनाच्या मागण्याच फार कमी असतात. आपोआप काही वेळा झालेल्या भेटी, डोळे, आपलं समोरच्या व्यक्तीनं केलेलं कौतुक, एकमेकांसोबत चालताना कमी जास्त करावा लागणारा वेग, जुळलेल्या आवडीनिवडी; आणि मग जर व्हायचंच असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. त्या व्यक्तीचं नाव जरी उच्चारलं गेलं तरी श्वास वेगळे पदन्यास करू लागतो. सोपेपणा आणि सहजतेवर कसलातरी आश्वासक दाब पडायला लागतो. लाल सिग्नलला उभं असताना, लिफ्टमधून वरखाली प्रवास करत असताना, पोहण्याच्या तलावात तरंगताना किंवा बीअरचा दुसरा ग्लास रिचवताना मन फार जड व्हायला लागतं आणि आठवण नावाची गोष्ट आपलं पाऊल मनात रोवते. आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणीसोबत एक उष्मा मनात तयार होतो. पुढील काही दिवसांत त्याचं एक उष्णतेत रुपांतर होणार असतं. त्या उष्णतेचा निचरा करताना मनाची घालमेल उडते आणि आपण वाचत असलेली पुस्तकं, ऐकत असलेलं संगीत पाहत असलेला पाऊस, वावरत असतो ते रस्ते त्या सगळ्याचा ताबा नकळत ती व्यक्ती घेऊन टाकते. माझ्या बाबतीत तर ती व्यक्ती ज्या शहरामध्ये राहत असते, त्या संपूर्ण शहरावरतीच तो ढग पसरलेला असतो. शहराच्या आधी येणारा डोंगर चढताना मला तो खालूनच हल्ली दिसू लागतोय. माझ्याआधीच पहाटे निघून तिथे जाऊन पोहोचलेला.

हे सगळं प्रत्येकाच्याच आयुष्यात वारंवार होत असतं. टाळता येत नाही. ज्या व्यक्तींच्या आईवडलांचं लग्न झालेलं असतं आणि ज्यांना स्वतः ते करायचं असतं, शिवाय आपल्या मुलांचं आणि त्यांच्या मुलांचंही लावून द्यायचं असतं, त्या व्यक्तींना मात्र आयुष्यात हे सगळं एकदाच व्हावं असं वाटत असतं. नव्हे ते एकदाच होतं असं ते मानूनही चालत असतात. त्यामुळे लग्नाच्या प्रेमाला ते प्रेम म्हणतात आणि त्याव्यतिरिक्त इतर प्रेमांना ते ’अफेअर्स’ म्हणतात. जुन्या बोली भाषेत त्याला ’प्रकरण’ असं म्हणतात.

प्रेमात एकदाच पडावं किंवा पडता येतं हे म्हणणं बाळबोध आहे. त्याचप्रमाणे लग्न नावाच्या दोन फुटी कुंपणात एकदा उभं राहिलं की, आभाळातल्या त्या ढगांपासून आपली सुटका होईल असं म्हणणं हे बालीशपणाचं आहे. लग्नानंतर जी माणसं पुन्हा कुणाच्या प्रेमात पडत नाहीत ती किती ओंगळ, कोरडी आणि कंटाळवाणी असावीत याची कल्पनाच न केलेली बरी.

त्यांच्यावर फक्त एक आणि एकच व्यक्ती प्रेमाचे थर लावीत बसलेली असते आणि तेसुद्धा त्याच डब्यात ब्रश बुचकळून समोरच्या व्यक्तीवर तसेच ओघळ आणत बसलेले असतात. आधी खूप वेळा, मग वर्षातून एक-दोन वेळा वाढदिवसाला वगैरे. बाकी वेळ सुकलेले रंग घेऊन इकडेतिकडे बघत बसून राहायचं. असे ओघळ आणून एकमेकांना चिणून टाकण्यातच त्यांचं आयुष्य संपून जातं.

मी वाढलोच मुळी प्रकरणांच्या शेतात. माझ्या नशिबानं माझ्या आजूबाजूला, कुटुंबात आणि शेजारात लग्नांइतकीच प्रकरणं घडत होती आणि फार लहान वयापासून मला त्या शब्दाबद्दल अतीव उत्सुकता होती. तशीच दुसरी उत्सुकता मला ’ठेवलेली बाई’ या या शब्दाबद्दल होती. मला कितीतरी दिवस त्या ठेवलेल्या बाया कशा दिसतात ते पाहायचं होतं. आमच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे आणि माझ्या आईच्या मनाच्या मोकळेपणामुळे माझी फार लहान वयात अनेक प्रकरणांशी आणि ठेवलेल्या बायांशी गाठ पडली. त्यानंतरच्या आयुष्यात कुटुंबाच्या परिघाबाहेर पडून माझा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला अनेक मोकळ्या मनाचे, आनंदी ठेवलेले पुरुषही भेटले. यामुळे माझ्या सगळ्या उत्सुकता अगदी आळस दिल्यावर हाडं मोकळी होतात तशा मोकळ्या होत विरल्या.

प्रकरणं करणारी माणसं, ठेवलेल्या बाया आणि ठेवलेले पुरुष हे नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या आजूबाजूची माणसं मात्र सतत चिंतेत आणि खंगलेली असतात, असं मला दिसलं. शिवाय सतत आपण दुसर्‍याला ठेवू शकत नाही. आपल्या नकळत दुसर्‍या कुणीतरी आपल्याला ठेवलेलं असतं आणि आपल्याला ते लक्षातच आलेलं नसतं. त्यात फारच मजा येते. एकदा आमच्या नात्यातल्या एक बाई दुःखी होऊन अल्कोहोलच्या आहारी गेल्या, तेव्हा मी आईला त्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली की, त्यांच्या नवर्‍याचं दु्सर्‍यापण एका बाईवर प्रेम आहे म्हणून त्यांचं असं झालं. अनेकांवर प्रेम करत राहता येतं. पण दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात. आईला त्या ठेवलेल्या बाईबद्दल जास्त सहानुभूती होती असं मला दिसलं. (मी लवकरच त्या बाईंना भेटलो, त्या फार गोड आणि सुंदर होत्या. त्या माझ्या कुणीच नव्हत्या. त्यांनी मला पिस्ते खायला दिले होते आणि पुढे काय करणार असं विचारलं होतं. तेव्हा मला माझ्या आजोबांप्रमाणे एसटीचा कंडक्टर व्हायचं होतं ते मी त्यांना सांगितलं होतं.)

मी स्वतः पहिल्यांदा प्रेमात पडलो तेव्हा मला हे उमगलं की, प्रेमासोबत माणसावर एक प्रकारचा हक्क सांगण्याची ऊर्मी उत्पन्न होते. ती व्यक्ती संपूर्णपणे आपली असावी असं वाटू लागतं, मनानं आणि शरीरानंसुद्धा. एवढंच नाही तर त्या व्यक्तीचा दिवसभराचा आणि त्यानंतरचा वेळ, तिच्या आवडीनिवडी ह्या सगळ्यांच्या बरोब्बर केंद्रस्थानी आपण असलो तरच त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे अशी अट आपण नकळत घालतो. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक शाखा प्रशाखा असतात आणि आपण त्या वृक्षासारख्या व्यक्तीमत्त्वाशी जोडला गेलेला एक भाग असतो, हे मला कधीही लक्षातच येत नसे. माझा जो कॅमेरामन आहे अमलिंदू, त्यानं मला एकदा सेटवर फार पूर्वी स्टिंग या गायकाची गाणी ऐकवली. त्यात ’If you love someone, set them free’ असं त्याचं एक गाणं आहे. ते गाणं ऐकायला आवडत असूनही मला वर्षानुवर्षं खरं म्हणजे कळलेलंच नव्हतं. माणूस आवडत असला तरी वर्षानुवर्षं कळलेलाच नसतो, तसंच गाण्याचं होतं.

हे होण्याचं कारण, स्त्री-पुरुषांची प्रेम जमताच ताबडतोब होणारी लग्नं, भावाबहिणींची भाऊबीजछाप प्रेमं, शोलेतल्या जयवीरूछापाची मैत्रीची गाणी एवढ्या तीनच कप्प्यांत माझ्या समाजानं मानवी नाती बसवली होती. सगळ्यांनी त्या तीन कुंपणांतच राहायचं. त्या कुंपणाबाहेर सगळं दुःख, बेजबाबदारपणा, अविचार आणि अश्लीलता आहे, असं मानून निमूट जगायचं.

थोडे दिवसांनी हे लक्षात आलं की, आकर्षण ही गोष्ट अपरीमीत आहे. ती थांबत नाही. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. कारण सोळासतराव्या वर्षी सुरू झालेली ही प्रेमात पडण्याची आणि आकर्षित होण्याची प्रक्रिया अजूनही मलातरी थांबवता आलेली नाही. एक मन, एक शरीर, एक भावनिक ओलावा माणसाला पुरा पडणं शक्यच नाही. निसर्गाचं असं काही म्हणणंच नाही. मग त्या सगळ्या ऊर्मींच्या विरुद्ध माणसाला कसं जाता येईल?

आयुष्याचा काही दीर्घ वा छोटा काळ एखादी व्यक्ती व्यापून टाकते. तो संपूर्ण काळ हा त्या व्यक्तीच्या नावाचा आणि रंगाचा असतो. तो काळ काही दिवसांचा वा अनेक दशकांचा असू शकतो. पण मग माणूस बदलतो. त्याला नवे अनुभव खुणावतात. त्याच्या बुद्धीची, शरीराची भूक विस्तारते. त्याच्या आवडीनिवडी बदलतात आणि तो माणूस नव्या आयुष्यासाठी ऊर्जा शोधायला लागतो. काहीवेळा सोबती असूनही तो एकटा पडतो, ज्याची कारणं स्पष्ट करता येत नाहीत. हे सगळं होण्यात आधीच्या व्यक्तीशी प्रतारणा अपेक्षित नसते, पण अनेक वेळा नात्यातली सरप्राईझेस्‌ संपलेली असतात. अशावेळी ज्याला आपण ’प्रकरण’ म्हणतो ती गोष्ट तयार होत असावी.

बहुतांश माणसांची प्रवृत्ती ही नातं जगासमोर मिरवण्याची असते. बहुतेक लग्नं ही त्याचसाठी केली जातात. जगाच्या साक्षीची गरज त्या माणसांचं नातं तयार होताना का लागत असावी? लग्न करण्याचा आणि दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असण्याचा अर्थाअर्थी संबंध आजच्या काळात राहिलेला नाही. पूर्वीही नसावा. सिनेमांचे ज्याप्रमाणे प्रीमिअर्स होतात त्याप्रमाणे माणसांची आयुष्यात लग्नं होतात. कुटुंबाच्या संपत्तीचं, गोतावळ्याचं, लागेबांध्यांचं आणि समाजातल्या त्या कुटुंबाच्या स्थानाचं ते आपापल्या परीनं केलेलं प्रदर्शन आहे. प्रेमाचा लग्नाशी संबंध नसतो. ते आपोआप तयार होतं आणि ते होणारच नसेल तर ते कितीही वेळा एकमेकांशीच लग्नं करत बसलं तरी होणार नसतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातले ते एकदाच घडणारे सोहळे असतात. अनेकजणांच्या आयुष्यात लग्न सोडल्यास पुढे काहीही भव्यदिव्य घडणारच नसतं, म्हणून ती माणसं फार हौसेनं सर्वांसमोर एका दिवसाच्या केंद्रस्थानी उभं राहून लग्न करून घेतात. फार तर फार बारशी आणि मुलांच्या मुंजी होतात. त्यानंतर थेट आपल्या मुलांची लग्नं. म्हणजे पुन्हा दुसर्‍या प्रीमिअर शोची संधी. आणि मग ते (कर्कश्श आणिे खर्चिक) चक्र अव्याहत पुढे चालू राहतं.

प्रेमाची खरी मजा ते होताना कुणालाही न कळण्यामध्ये असते. आपल्यालाही ते होताना कळत नसेल तर त्या अनुभवासारखा दुसरा विलक्षण अनुभव नसतो. जी माणसं चारचौघांत मोकळं वावरत, आपापलं आयुष्य जगत कुणालाही न कळवता एकमेकांवर प्रेम करत राहतात त्या माणसांनी फार दुर्मिळ असा आनंद आपल्या आणि दुसर्‍या व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला दिलेला असतो. त्यासाठी सतत सर्वांसमोर एकत्र राहण्याची, एकमेकांना भेटवस्तू द्यायची, एवढंच काय तर ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे एकमेकांना म्हणायचीही गरज नसते. असं प्रेम फार कमी वेळा आयुष्यात नशिबी येतं. ते ज्यांना ओळखता येतं, ओळखून रुजवता येतं, आणि रुजवून मान्य करता येतं ती माणसं फार ग्रेट असतात. आपल्या दोघांचं नातं काय आहे याची या गर्दीत कुणालाच कल्पना नाही. याच्याइतका सुंदर रोमान्स जगात दुसरा कोणताही नाही. मग त्या प्रेमात वय, राहणार्‍या शहरातलं अंतर, लग्न झालं की नाही, आपण यापुढे कधी भेटणार आहोत की नाही असे प्रश्न हळूहळू शांत होत जातात. ते व्हायला फार वेदना होतात, कष्ट करावे लागतात. पण होणार असेल तर ते सगळं आपोआप होतं. थोडं सहन करावं लागतं. यासाठी नशिबवान असावं लागतं आणि मोकळ्या मनाची स्वतंत्र ताकद घेऊनच जन्माला यावं लागतं. त्यात सुरक्षितता आणि हक्काचे एकमेकांवरचे हिशोब असून चालत नाही. ती तसली कामं नवराबायकोंची असतात. काही भेटी वेळ ठरवून अलेल्या मिनिटासेकंदाच्या असतात, तर काही भेटी संपूर्ण रात्री व्यापून उरतात. एकमेकांच्या शरीराचे गंध आठवण आली की मनाभोवती रुंजी घालू लागतात. अतिशय दुःखाच्या आणि वेदनेच्या क्षणांना त्या व्यक्तीचा नुसता चेहरा आठवला तरी मनावर फुंकर येते. आपल्याकडे त्या व्यक्तीनं दिलेली कोणतीही भेटवस्तू नसते, ना आपण दिलेली तिच्याकडे असते. एक खूण असते कसलीतरी. एखादा संकेत असतो. हस्ताक्षर असतं. इतर कुणालाही माहीत नसेल असं हाक मारायचं नाव असतं. ते पुरेसं असतं. त्या पलीकडे सतत आश्वासनं देण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे भीती नसते. असुरक्षितता नसते. महिन्यामहिन्यांची शांतता मान्य असते. कुणाला काही सांगायचं नसतं. नावं जोडून घ्यायची नसतात. प्रत्येक भेट शेवटची असू शकते. कारण हक्क नसतो. पुढची भेट झाली तर मन फार मऊ आणि आनंदी होऊन जातं. जिकडेतिकडे सगळं बरं वाटू लागतं आणि ऊर भरून येतो.

असं सगळं होण्याला इंग्रजीमध्ये ‘अफेअर’ का म्हणतात? हे जर फेअर नसेल तर मग दुसरं काय फेअर असू शकतं?

प्रेमामधून तयार झालेल्या शारीरिक ताण्याबाण्यांना समजून घेण्याची उमज आजही आपल्या परिसरात तयार झालेली नाही. शारीरिकता हा बहुतांशी प्रेमाच्या संबंधाचा पाया असतो. ती एकतर्फीही असू शकते. असली तरी ती ओळखून एका अंतरावरून झेलायला शिकायला हवं. पावसाळा आनंदात जाणार असेल तर त्याला ती भेट देण्याचा मोठेपणा मनात हवा. शारीरिक संबंध आले नाहीत, होऊ शकले नाहीत या कारणानं अनेक नाती अतिशय गूढ आणि दाट होत जाण्याची शक्यता असताना आपण फार पटकन शारीरिकतेचा ठोस आग्रह धरत नात्यांची मजा संपवून टाकतो. याचं कारण त्याविषयी आपल्या मनात सतत असलेलं दडपण.

शारीरिक संबंध ही प्रेमाची पावती असू शकत नाही. तो प्रेम करण्याचा एक मोठा उद्देश असतो. काही वेळा तो उद्देश आपोआप आणि शांतपणे सफल होतो तर काही वेळा त्याच्या कोमटपणावर, उष्णतेवर आणि धगीवर अबोलपणे वर्षानुवर्षं दोन माणसांमधलं नातं फार मस्त आकार घेतं. याची मजा घेण्याची प्रवृत्ती जोपासायलाच हवी. शरीर सापडत जायला हवं. ते स्वप्नांमध्ये रंगवता यायला हवं. त्यासाठी ते न ठरवता अचानक कधी इकडून कधी तिकडून दिसायला हवं. त्यासाठी पाऊस असतो, मोठ्या गळ्यांचे सुंदर कपडे असतात, दरवाज्यांच्या फटी असतात. पहिल्या काही तीव्र शारीरिक संबंधांनंतर, शरीराची सरप्राईझेस्‌ जर संपली तर त्या दोन व्यक्तींना नात्याचा बाज टिकवून ठेवायला पुन्हा नव्यानं एकमेकांना काहीतरी सादर करावं लागतं. त्यापेक्षा ते होईल तेव्हा होऊ द्यावं. आपोआप.

प्रेमाप्रमाणेच शारीरिकता ही काही एका व्यक्तीशी बांधली गेलेली नसतेच. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला अनेक शरीरं आवडतात. काही जुन्या शरीरांमधला रस उडतो आणि नवी खुणावतात. ते सगळं होणं फार सुंदर आहे. शिवाय ते अपेक्षितही आहे. त्यामुळेच तर आपल्याला जाणिवांची वृद्धी होते. हे जर मान्य केलं नाही आणि आपल्याच दोघांच्या एकमेकांच्या शरीराची अट कुणी कुणावर घातली तर कालांतरानं कोणीतरी एक न सांगता त्याच्या सहजप्रवृत्तीनं जे करायचं ते करतोच. आपल्या आयुष्याचं अत्यंत पारंपरिक स्वरूप जगाला दाखवत बसणारे लोकही ते टाळू शकत नाहीत. मग त्यातून लपवणूक आणि त्रास होतो. भावनिक हिंसा तयार होत जाते आणि आपल्यापाशी असलेला सगळा आत्मसन्मान माणसं या कारणी घालवून फार बिचारी होऊ शकतात. त्यापेक्षा रात्री दोघांपैकी कुणी घरी आलं नाही तर दार लोटून घेऊन शांत झोपावं. काही दिवस आजमवावं, गप्पा मारून मोकळेपणा ठेवावा. माणसं नेहमी सगळीकडे फिरून परत घरी येतातच. ती आपलीच असतात.

शारीरिक संबंध आले म्हणजे आपण दुसर्‍या व्यक्तीला आपले सर्वस्व दिले असं वाटणं म्हणजे एक सिनेमाकादंबर्‍यांमधून आलेला बावळटपणा आहे. आपला ‘स्व’ हा इतका स्वस्त असतो का, की तो या अनुभवानं लगेच गमावल्या जाऊ शकतो? हे सर्वस्व देण्याच्या भावनेचं खूळ इतकं प्रगाढ आहे की शारीरिक संबंध एकदा आला की लगेगच त्यापुढे प्रेम करण्याची सक्ती केली जाते. अनेक वेळा ते अव्यवहार्य असतं कारण पुन्हा लग्नाप्रमाणे शारीरिकतेचा प्रेमाशी संबंध असेलच असं नाही. आजच्या काळात जेव्हा मोकळेपणानं शारीरिक संबंध पहिल्या काही भेटींमध्ये होतात तेव्हा त्याचं स्वरूप आकर्षणाची धग शांत करण्याचं असतं. एकमेकांचा स्पर्श ओळखण्याचं आणि संवाद साधण्याचं असतं. कोणत्याही स्वरूपात ते सर्वस्व देण्याचं कधीही असू शकत नाही. अगदी लग्नाच्या नात्यातही नाही. नशिबानं आपण आता अशा काळात आहोत जिथे शारीरिकतेचा पुनरुत्पादनाशी कोणताही अपघाती संबंध नाही. असं असताना एकमेकांना दिल्या घेतलेल्या आनंदाची पुनरावृत्ती करण्याची सक्ती कुणीही कुणाला का करावी? तसं झालं तर वारंवार होणार्‍या किंवा न होऊ शकणार्‍या शारीरिकतेतून किती चांगलं प्रेम फुलत जाऊ शकतं! ते करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवं. ही निसर्गाची प्रेरणा आहे.

जर कुणावर कसलाही हक्कच सांगायचा नसेल तर मग प्रेम करणं ह्या गोष्टीला काय अर्थ उरला, अशी बर्‍याच जणांची समजूत असते. पण वर्षानुवर्षं टक्केटोणपे खाऊन, मनाला खोट्या समजुतीत पाडून, हक्काचं वजन तयार करून आपण प्रेमात असल्याचा देखावा जगापुढे साजरा करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये. आपल्या मनातलं एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम संपलं आहे हे ओळखायला आपण घाबरतो. ओळखलं तरी ते कबूल करणं आणि पुन्हा प्रेमात पडायला मनाला सक्षम करणं हे धाडसच आपण करत नाही.

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडून ते निभावणार्‍या व्यक्ती धाडसी असतात. खर्‍या असतात. पण आपल्या मनातले न्यूनगंड, परस्परांची झापडं आणि आपल्यातल्या भावनिक समृद्धीच्या अनुभवामुळे आपण लगेचच त्या व्यक्तींची ‘व्याभिचारी’ म्हणून हेटाळणी करून टाकतो. पण मनातल्या मनात प्रत्येकजण आपण तसं करू शकत नाही म्हणून कुढत असतो.

अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्रीपुरुष किती तेजःपुंज असतात. त्यांच्या मनाला आणि शरीराला सतत एक झळाळी असते. मला अशी अनेक माणसं माहिती असण्याचं आणि त्यांच्याशी दोस्ती असण्याचं सुदैव लाभलेलं आहे. त्या व्यक्ती सतत कात टाकत असतात. होत्याच्या नव्हत्या होतात. स्वरूपं पालटतात. ताण सहन करतात आणि बंद झालेल्या गुहांचे दगड फोडून वारंवार मोकळ्या प्रदेशात जात राहतात. त्या व्यक्तींना मनं आणि शरीरं हाताळण्याची सुंदर लकब गवसलेली असते. मध्ये येणार्‍या अंधार्‍या खोल्यांची, थरकाप उडवणार्‍या एकटेपणाची त्यांची भीती गेलेली असते. ते सगळं प्रेमासोबत येणार हे ते उमजून असतात. आपण बसलेलं विमान आपल्याला हवं तिथे कधीच उतरणार नसतं.

गरजेपेक्षा जास्त वर्षं फक्त एकमेकांसोबतच राहिलेल्या दोन माणसांना शेजारी-शेजारी उभं करून त्यांचा फोटो काढून पाहिला तर त्यांचे चेहरे बघून त्यांच्या नात्याविषयी सर्व कल्पना येते. बहुतेक वेळा खिन्न-हसते चेहरे असतात ते. त्यांच्या दारंखिडक्या नसलेल्या घराची गोष्ट सांगत असतात. आम्ही चाळीस वर्षं एकत्र काढली. पण कशी? एकटं पडण्याच्या भीतीनं एकमेकांना गच्च आवळून? की मोकळेपणानं-समजुतीनं अंतर कमीजास्त ठेवून? त्याउलट कोणत्यातरी प्रवासात महिनाभर भेटलेल्या आणि परत कधीच न सापडलेल्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे फोटो पाहिले तर त्यांच्या चेहऱयावरचे भाव, ओसंडून सांडणारा आनंद पाहून मला तरी ते आयुष्य नक्की जगावंसं वाटेल.

माणसं आयुष्यात येणं जितकं साहजिक असतं तितकंच ती सोडून जाणंसुद्धा साहजिक असतं आणि त्या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. पण माणूस सोडून जाताना मनावर आणि अंगावर काही हलकी खूण सोडून गेला तर मात्र त्या ताटातुटीसारखा दुसरा एकमेवाद्वितीय अनुभव नाही.

आपण जागं व्हावं तेव्हा ती व्यक्ती शेजारी नसावी. बाहेर पाऊस पडत असावा. चिठ्ठीबिठ्ठी काही नसावी. पण आपण रात्री उतरवून ठेवलेलं काहीतरी ती व्यक्ती गुपचूप घेऊन गेली असावी. आपल्याला आनंदी थकव्यानं पुन्हा ग्लानी यावी हा आनंद सकाळी त्या व्यक्तीला दात घासताना बघण्याच्या आनंदापेक्षा किती चांगला आहे. तो प्रत्येकाला मिळो.

नात्यात नेहमी येऊन जाता आलं पाहिजे. येता यायला हवं आणि जाताही यायला हवं. केव्हा जायचं आहे हे जेव्हा एकमेकांना कळतं त्या माणसांची प्रकरणं सतत ताजी आणि मोहक राहतात. पण ते सगळं सापडायला थोडा वेळ लागतो. मधली वाट बघण्याची वेळ पण आवडायला लागते. परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणार्‍या व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं. असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.

सतत कुणाचीतरी सोबत असण्याचा अलिखित नियम हे भारतीय समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. त्यातली सोबत महत्त्वाची न राहता ‘सतत’ हा शब्द फार मोठा करून ठेवला आहे आपण. टोळ्यांनी आणि जोडीनं सतत जागायला आपण आता रानावनातली किंवा कृषिसंस्कृतीतली माणसं उरलेलो नाही. आपल्यापैकी अनेकांना सोबत असण्याच्या पलीकडे, फक्त एकट्यानं शोधण्याचे, अनुभवण्याचे आयाम सापडते आहेत. पण तसं जगणं समृद्ध होऊ शकेल अशा आयुष्याच्या नव्या रचना, नवी-मोकळी नाती लेबल न लावता तयार करायला आपल्याला दुर्दैवानं घरात शिकवलं जात नाही. फोनच्या डिरेक्टर्‍यांप्रमाणे आपली नात्यांची लेबलांची डिरेक्टरी फार आऊटडेटेड झाली आहे. त्यात अनेक नवी माणसं नाहीत. अ‍ॅड करायची सोय नाही.

अनुभव घेणं ही नेहमीच एकट्यानं करायची गोष्ट असते. ती जोडीनं करत बसता येत नाही. तुम्ही कितीही आकंठ प्रेमात बुडाले असलात तरीही. अनुभव जेव्हा मनात मावत नाही तेव्हा तो सांगितला जातो आणि यावेळी तो नक्की समजणार्‍या माणसासोबत गाढ होत जाते. त्याला समजुतीचं आणि ओळखीचं अंगण आणि कुंपण येतं. मग दिवाणखाना येतो आणि समजुतीचंच शय्यागृह येतं. त्यात इतरांना प्रवेश नसतो.

सगळ्यांना सगळं कधीच समजत नसतं हे यामागचं कारण आहे. एकाच माणसाला आपण म्हणत असलेलं सगळं समजावं असं वाटणं हीतर जवळजवळ हिंसा आहे. यातच आपल्या आयुष्यात एकापेक्षा जास्त जोड्या तयार होण्याचं सोपं आणि साधं कारण आहे.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१३)


***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सचिन कुंडलकर व सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.


***
विषय: 
प्रकार: 

Prastavana naahee, lekhanantar naahee vaakye hotee, te aapalyaach terms var jagataahet vagaire ullekh asalelee.

>>
जर हा लेख युरपमधे किंवा अमेरिकेमधे लोकल भाषांंमधे जर अनुवादीत करुन प्रकाशित केला तर ती लोक म्हणतील हा लेख लिहायची तशी गरज नाही. आमच्या कल्चर मधे हे सगळे उघडपणे चालत.
>>
बाब्बो! मग आमच्या इथे फॅमिली वॅल्यूज म्हणतात ते सगळं काय असते? आमच्या इथे कॅज्युअल डेटिंग सामान्य आहे. मात्र एस्क्लूझिव डेटिंग सुरु झाले की लग्नाइतकीच एकनिष्ठता अपेक्षित असते. लिव-इन ही त्याची पुढली पायरी. प्रोपोझलची अपेक्षा असते. ठराविक काळात असे प्रपोझल आले नाही की कुरबुर, ब्रेकअप वगैरे होते. नो फॉल्ट डोवोर्स स्टेट असूनही लोकं लग्न टिकवायच्या प्रयत्नात असतात. अगदी पहिले नाही तरी दुसरे लग्न २५-३० वर्षे टिकलेली भरपूर जनता आजूबाजूला आहे. जोडीला कुटुंब हवे म्हणून सेमसेक्स मॅरेजसाठी कोर्टात जाणारी लोकं वेगळी. इथेही व्यभिचारला व्यभिचारच म्हणतात. उगाच काहीतरी चुकीचे समज नकोत!

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडणे घडू शकते. काही लोकांची ती मानसिक्/शारीरिक गरज असू शकते हे मान्यच! पण तरी एकावेळी एकाशी निष्ठा हे अपेक्षित. आधीच्या नात्याचा गुंता सोडवा, त्या नात्यातील जबाबदार्‍यांची योग्य ती तजविज करा आणि पुढे जा. पुन्हा कुटंबकबिल्यात परतण्यासाठी दार उघडे असावे ही अपेक्षा का? आधीच्या नात्यातील मंडळी वाट बघत तिथेच थांबलेली असतील का? ती पण मुक्त प्रेम शोधत पुढे गेलेली असणार ना? हे गृहित धरणे मुक्त प्रेमाच्या कौतुकाशी विसंगत नाही का?

>>नात्यात नेहमी येऊन जाता आलं पाहिजे. येता यायला हवं आणि जाताही यायला हवं. केव्हा जायचं आहे हे जेव्हा एकमेकांना कळतं त्या माणसांची प्रकरणं सतत ताजी आणि मोहक राहतात. पण ते सगळं सापडायला थोडा वेळ लागतो. मधली वाट बघण्याची वेळ पण आवडायला लागते. परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणार्‍या व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं. असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.
>>
हे वाचून लईच हसू आले. प्रकरणातून मिळणारी 'हाय' संपली की परत सेफ हार्बर म्हणून कुटुंब्,पुन्हा 'हाय' मिळवायला प्रकरण हे चक्र सुरु रहावे अशी अपेक्षा करताना जोडीदाराच्या सुखाचे काय? तुमच्या अनुपस्थितीत जोडीदाराने जे नवे कुटुंब तयार केले असेल त्यात तुमच्या मर्जीनुसार ये जा करायचा अधिकार का गृहित धरावा? दात घासणार्‍या जोडीदाराकडे बघून साळसूद हसायची स्वप्ने कशाला? तुमचा जुना जोडीदार मस्त पैक त्याच्या नव्या जोडीदारा बरोबर ब्रेकफास्ट करत असेल ही शक्यता आहेच ना?

>>रात्री दोघांपैकी कुणी घरी आलं नाही तर दार लोटून घेऊन शांत झोपावं. काही दिवस आजमवावं, गप्पा मारून मोकळेपणा ठेवावा. माणसं नेहमी सगळीकडे फिरून परत घरी येतातच. ती आपलीच असतात.
>>
रात्र कशाला हवी? दुपारी ३ ते ५ प्राइम टाइम! बाकी फिरुन परत घरी आले की सगळे अ‍ॅक्सेप्टेबल? दार लोटून शांत झोपावे म्हणतानाही दुसर्‍याने घरी रहायची अपेक्षा आहे. गप्पा कसल्या मारायच्या? एसटीडी टेस्टिंगसाठी कधीची अपॉइंटमेंट घ्यायची याच्या? की उद्या घरी येणार आहेस का? आल्यास दार लोटून झोप कारण मी 'फिरायला' जाणार आहे याच्या?

वन नाईट स्टॅन्ड ठीक, प्री मरायटल सेक्स ठीक, अनेक प्रेमं ठीक पण ऑन द साईड अधुनमधून घरी जाण्यासाठी लग्नाचा जोडीदार आणि इतर कुटुंब नाही झेपले! बाकी या प्रेमाच्या कौतुकात रिलेशनशिप्समधे अपघाताने मुले झाल्यास काय? की त्या मुलांच्या अयुष्यातही मर्जीनुसार ये-जा करणार? मला माहितेय
>>दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात.>>
असे लिहिणार्‍या व्यक्तीकडून मी जरा जास्तच अपेक्षा करतेय!

मला लेखाचे पहिले काही पॅरा चांगले वटले, रोमॅन्टिक न ऑल. शेवटचा बराच भाग - ते अनेक प्रेमं , तेजःपुंज वगैरे इथले पालथे घडे मुद्दाम उचकवणारं लिखाण करतात तसं जाणून बुजून प्रक्षोभक, किंवा फॉर सम रीझन सार्कॅस्टिकली लिहिलं असावं असे वाटले.
बी ने युरप अमेरिकेबद्दल पाजळलेले ज्ञान महान आहे. अन वर इथे अनेक वर्षे राहिलेले लोक सांगत आहेत ते चूक अन तात्पुरती बिझिनेस किंवा टूरिस्ट व्हिजिट देऊन जगाबद्दल सर्व ज्ञान मिळवलंय तेच कसं खरं आहे हा टोन संतापजनक वाटला. असो.

दिनेश आणि स्वाती २, अ‍ॅज यूझ्वल प्रतिसाद आवडले. दिनेश, तुमची आणि चिनूक्सची जी काही लहानशी अर्ग्यूमेन्ट झाली ती सोडून, कारण ती मला समजलीच नाही. असो.

ह्या लेखावर उत्तमोत्तम भाषिक शैलींमधून अती-वैचारीक प्रतिसाद आलेले पाहून हसू आले. म्हणजे एखादी तद्दन हास्यास्पद गोष्ट (प्रकरणे करणारे तेजस्वी दिसतात, बाकीचे ओंगळवाणे दिसतात वगैरे) मोठा वैचारिकतेचा आव आणून लिहिली की मायबोलीकरांना लगेच भुरळ पडते का?

लेखापेक्षा काही प्रतिसादांनीच थक्क व्हायला झाले.

काल रात्री परत वाचला लेख. काही विचार मनात रेंगाळत होते म्हणून परत वाचावासा वाटला.
एखाद्या नात्यात बांधलं गेलेलं असताना कोणी दुसर्‍यावर प्रेम केलं की आधीच्या व्यक्तीचं काय? हा प्रश्न अगदी सहज पडतोच. मला वाटतं कुंडलकर ज्या नात्यांबाबत बोलत आहेत ती नाती प्रॅक्टिकल टर्म्स वर कधीही परिपुर्ण अशी होउच शकत नाहीत. ती का होऊ शकत नाहीत हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे. काही नाती कधी कधी परिपुर्ण होऊच शकत नाहीत हा बेस आर्ग्युमेंट लक्षात घेतला पाहिजे.
एकदा नातं परिपुर्ण नाही म्हंटल्यावर अर्थातच मानसिक शारिरिक अपेक्षांच्या पुर्ततेमध्ये कुठे तरी "गॅप" असते. पुढे आपापल्या वैचारिक उत्क्रांती (एवॉल्युशन ह्या अर्थानी) मुळे १) तशा अपेक्षा कमी होतात किंवा राहत नाहीत किंवा २) त्या गॅप तशाच रहातात आणि माणूस त्या गॅप न भरल्या गेल्यामुळे आयुष्यभर कुढत राहतो किंवा त्या भरल्या जाव्यात म्हणून प्रयत्न करत राहतो. ह्या दुसर्‍या कॅटेगरीमधल्या लोकांच्या एकंदरित विचारसरणीचा फार सुदंर असा आढावा घेतलाय कुंडलकरांनी माझ्यामते. ह्या लेखात मला कुठेही सो कॉल्ड प्रकरणांचे उदात्तीकरण (मराठी शब्द सुचेना नेमका) जाणवलं नाही पण ही कुढत असलेली मंडळी नेमका विचार कसा करते, स्वतःची आणि इतर लोकांची दिशाभूल कशी आणि का करायला बघते हे खुप अचूक आणि नेमकं शब्दात मांडलय त्यांनी. उदाहरण म्हणून काही काही लोकांची "लग्नं" म्हणजे कशी फक्त प्रिमियर असतात तो मजकूर, पुढे लग्न झाल्यावर एक मेकांना एकाच रंगात रंगवून कसं पार चिणून टाकण्यात येतं तो मजकूर.
ज्या ठिकाणी त्यांनी ह्या प्रकरणं करणार्‍या मंडळींना तेजःपुंज म्हंटलय किंवा इतर कुढत आपलं आयुष्य रटाळपणे जगणार्‍यांना ओंगळवाणं वगैरे म्हणून त्यांना कमी लेखलय तो मी त्यांचा "कैफ" आहे असं म्हणेन. तो एखाद्या त्यांचे विचार न पटणार्‍या व्यक्तीनं पर्सनली घेऊ नये. घेऊन उपयोग नाही.

सरतेशेवटी परत एकदा मी वर लिहिलय त्याच आशयाचं पण थोड्या वेगळ्या अँगलनी असं सांगावंसं वाटतं की असाच लेख उलट बाजूनी एखाद्या परिपुर्ण नातं असलेल्या जोडीमधल्या जोडीदाराविषयी सुद्धा लिहिता येऊ शकतो. तुम्ही आम्ही ,त्यांच्या एकदाच जोडलं गेलेल्या नात्यात खरच अत्यंत आनंदी अशी लोकं नक्की पाहिली असतील पण ती किती दुर्मिळ आहेत ह्याबाबत सुद्धा शंका नसावी. ज्यांच्या लग्नाला ५ वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत त्यांना नक्की कल्पना असेल की त्याच जोडीदाराबरोबर सुरवातीला होती अगदी त्याच उमेदीनी, ओढीनी, प्रेमानी एकत्र राहणं आणि आपण निर्माण केलेल्या त्या भोवतीच्या रामरगाड्यात ते नातं पुढे नेत परिपक्व करत राहणं किती अवघड आहे! सगळ्यांनाच ते जमत नाही. ज्यांना जमत नाही किंवा जमणं शक्यच नसतं त्या लोकांच्या मेंटल प्रोसेस नेमकी काय असते आणि त्या लोकांनी कधी पारंपरिक नात्यांबाहेर जर कुठून प्रेम मिळालं तर ते कसं हँडल/एन्जॉय करावं ह्याबाबतचा त्यांचा दृष्टिकोन कुंडलकरांनी मांडलेला आहे.

स्वाती२, +१

बुवा, समहाऊ तुम्ही म्हणताय तेवढाच अर्थ नाही लागला मला लेखाचा. पण असो. तुमचा दृष्टीकोन चांगल्या रितीने मांडला आहे तुम्ही.

केदार,
हे माझं रंगीबेरंगी पान आहे. चिनूक्स हा माझा आयडी आहे, मायबोली प्रशासनाचा नव्हे. हा लेख प्रसिद्ध करून कोणी कुठली माहिती गोळा केली आहे, हे समजेल का?
कुठलाही लेख जेव्हा सार्वजनिक होतो, तेव्हा चर्चा होतेच. विशेषतः सचिन कुंडलकरसारख्या लेखकांच्या लेखनावर तर होतेच. यात न सांगता माहिती गोळा करण्याचा प्रश्न येतो कुठे?

चिनूक्स तुझा आणि माझा प्रतिसाद कोलाईड झाला.

मी तेंव्हाच नेव्हरमाईंड लिहिले. रंगीबेरंगीवर लक्ष नव्हते.

>>ज्यांना जमत नाही किंवा जमणं शक्यच नसतं त्या लोकांच्या मेंटल प्रोसेस नेमकी काय असते आणि त्या लोकांनी कधी पारंपरिक नात्यांबाहेर जर कुठून प्रेम मिळालं तर ते कसं हँडल/एन्जॉय करावं ह्याबाबतचा त्यांचा दृष्टिकोन कुंडलकरांनी मांडलेला आहे.>>
म्हणजे लग्नाच्या जोडीदाराला गृहित धरुन अधून मधून कुटुंबकबिल्यात हक्काने जावे , पारंपारिक पद्धतीने जमल्यास वसुली करावी पण प्रकरणांच्या बाबत मुक्त प्रेमाचा उदार दृष्टीकोन ठेवावा असे म्हणयचे आहे का? मग त्यासाठी एवढे पाल्हाळ कशाला? ते तसेच असणार ना! म्हणूनच अति झालं की 'हक्क गाजवायला आपण काही नवरा-बायको नाही ' वगैरे डायलॉग येतात.

प्रकरण या शब्दाचा एक अर्थ, किंवा या नावाचा एक (संस्कृत) नाट्यप्रकार देखील असतो. उच्चकुलीन नायक आणि नीचकुलीन स्त्री.. असे काहीसे असते त्यात. मृच्छकटीकम हे त्या प्रकारातले नाटक आहे. हाच प्रयोग मातीच्या गाड्याचे प्रकरण म्हणूनही सादर झाला होता.... हे आपले असेच लिहिले. मूळ लेखाला आणि कुठल्याच प्रतिसादाला उद्देशून नाही Happy

म्हणजे लग्नाच्या जोडीदाराला गृहित धरुन अधून मधून कुटुंबकबिल्यात हक्काने जावे , पारंपारिक पद्धतीने जमल्यास वसुली करावी पण प्रकरणांच्या बाबत मुक्त प्रेमाचा उदार दृष्टीकोन ठेवावा असे म्हणयचे आहे का? मग त्यासाठी एवढे पाल्हाळ कशाला? ते तसेच असणार ना! म्हणूनच अति झालं की 'हक्क गाजवायला आपण काही नवरा-बायको नाही ' वगैरे डायलॉग येतात.>>>>>>>> इथे परत तुम्ही एग्झिस्टिंग नात्यात असलेल्या व्यक्तीची बाजू मांडायला लागलात. त्या व्यक्तीनी उदार दृष्टिकोन ठेवावा की नाही ठेवावा हा प्रश्नच नाहीये. समजा त्या दुसृया व्यक्तीनी उदार दृष्टिकोन नाही ठेवला आणि वेगळं व्हायचा निर्णय घेतला तर तो समोरच्याला अ‍ॅक्सेप्ट करावा लागेल. आपण (म्हणजे तुम्ही किंवा मी) इथे बसून कितीही बडबड केली तरीही धड सोडता येत नाहीत किंवा पुर्णपणे जोडूनही राहता येत नाहीअशी हाफ अ‍ॅस रिलेशन्शीप्स हे एक अगदी कॉमन वास्तव आहे त्याबाबत ते लिहित आहेत. You are talking about what is right and what is wrong whereas the writer is more talking about the reality of what goes on in the minds of the people who are in such unfulfilled relationships and how some people deal with it.

समजा त्या दुसृया व्यक्तीनी उदार दृष्टिकोन नाही ठेवला आणि वेगळं व्हायचा निर्णय घेतला तर तो समोरच्याला अ‍ॅक्सेप्ट करावा लागेल.
<<

पहिलं नातं तयार करताना ज्या आणाभाका घेतलेल्या आहेत, त्या बिनदिक्कीत तोडून दुसरं नातं तयार करायचं, शक्यतो पहिल्या व्यक्तीपासून लपवून / फसवून, अन वरतून 'त्या व्यक्तीने वेगळं व्हायचा' निर्णय घेतला तर "अ‍ॅक्सेप्ट" करण्याचा मानभावी मोठेपणा दाखवायचा?

बाय व्हॉट लॉजिक अँड रूल?

त्या 'दुसृया' व्यक्तीने तुमचे कपडे काढून तुम्हाला चौकात चाबकाने बडवायचा निर्णय घेतला, तर तोही अ‍ॅक्सेप्ट करणार का? Wink

स्वाती२ आणि टण्या च्या पाश्चात्य जीवनशैली अनुभव पोस्ट सारखीच लोकं मी पाहिल्येत. ओपन म्यारेज इ. गोष्टी सर्वमान्य नक्कीच नाहीत. अपवाद आपल्याकडे ही असतीलच, पण तो रूल व्हावा (कमीटमेंट मध्ये पर्करण म्हणजे व्यभिचार नाही) असं वाटणारी बहुसंख्य लोक नक्कीच नाहीत.
बुवांचं पर्स्पेक्टीव्ह घेऊन लेख परत वाचतो. (मला समजलेलं बुवाच लॉजिक: हा लेख समर्थनार्थ नसून ती मानसिकता/ परिस्थिती जगणाऱ्या लोकांची विचार करण्याची पद्धत इ.) अर्थात कुंडल्कारांना असं वाटून त्यानी लेख लिहिला आहे का नाही माहित नाही.

अहो आणाभाकांच्या फोलपणा बद्दलपण लिहिलच आहे की. इथे जर कुंडलकर तुम्हाला अनेकवेळा प्रेम करुन बघा त्यात काय मजा आहे असा संदेश देत आहेत असं वाटत असेल तर यु मिस्ड द पॉईंट. मी वर बर्‍याच वेळा लिहिलय की नातं जोडलं गेल्यावर पुढे ते फुलत राहणं, त्याचे नवनवीन पैलू समोर येऊन ते परिप्क्व होत जाणं हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. ह्याचा अर्थ प्रयत्न करायलाच नको आणि इकडे तिकडे प्रेम हुंगत फिरा असा नाही, काही नाती फुलतात तर काही अनेक कारणांकरता जीर्ण होत जातात त्याला पर्याय नसतो, ही रियॅलिटी आहे. त्याला चूक चूक म्हणून आपण आपलीच दिशाभूल करतो.

राहिला प्रश्न कपडे काढून फोडण्याचा तर हो, तो अ‍ॅक्सेप्ट करावाच लागेल. आपल्या जोडीदाराला ओळखून ही वेळ कधी तरी आपल्यावर येइल ह्याचा अजिबातच विचार केला नसेल तर मग तो मुर्खपणाच आहे. आणि अ‍ॅक्सेप्ट करणे म्हणजे परिणामांना सामोरे जाणं ह्या अर्थानी म्हणत होतो, त्यात मोठेपणाचा काय संबंध?
परत प्रॅक्टिकली विचार करता, असा क्लायमॅक्टिट एंड किती रिलेशन्शीप्स मध्ये होतो? वास्तव काय आहे? ह्या गोष्टी कधी (फार क्वचित) उघडपणे तर कधी लपून सुरुच राहतात, करणारा त्याच्या गरजांकरता करतो, सहन करणारा (एका लिमिट पर्यंत किंवा आयुष्यभर) त्याच्या स्वतःच्या गरजांनुसार ते सहन करत किंवा अ‍ॅक्सेप्ट करुन पुढे चालत असतो.

अर्थात कुंडल्कारांना असं वाटून त्यानी लेख लिहिला आहे का नाही माहित नाही.>>>>>>> अमित, त्यांनी तोच उद्देश डोक्यात ठेवून लिहिला नसला तरी मला बर्‍याच मजकूरांमध्ये तो पर्स्पेक्टिवच दिसतो. काल नताशानी पारल्यात लिहिलं तसं काहीसं, हा काही रिसर्च पेपर नाहीये बॅलन्स्ड लिहायला, हा एक पर्स्पेक्टिव आहे.त्यात आपण दुसर्‍या जोडीदाराची भरड, न्या अन्याय घालून त्याचा एकताकपुरीय गोपालकाला न केलेलाच बरा.

हे मला काही कळत नाही. एखाद्याने असे एकांगी मत लिहिले तर इतरांनी काय करणे अपेक्षित आहे ? (प्रतिक्रियांमधे ) ते मांडणारच ना दुसरी बाजू , किंवा समोरच्याची खोडून काढणार हेही आलेच!!
लेख दोन्ही बाजूने, बॅलन्स्डच लिहावा ही अपेक्षा नसावी हे ठीक वाटते.

बुवा,
तुम्ही ज्या परिप्रेक्ष्यातून (व्ह्यूपॉइंट/पर्स्पेक्टिव्ह) पोस्टी टाकत आहात, एक्झॅक्टली त्याचसाठी असले लेख प्रिंट मेडियातच असलेले चांगले. तिथे "चर्चा" होऊ शकत नाही.
अशा दृष्टीकोणात्मक लेखनावर चर्चा करण्यात काही पॉइंटही नाही. फारतर प्रत्येकाने आपला स्वत:चा पर्स्पेक्टिव्ह लिहावा इतकेच.
पण जर चर्चा होणारच असेल, तर मोनोगॅमी, विवाहातील नात्याची "पवित्रता" इ.बद्दलचा पॉप्युलर व्ह्यूपॉइंट कसा फोल आहे, हे सांगण्यातही काहीच हशील नाही. फॉर द सिंपल रिझन, इट्स पॉप्युलर. तो सूर येणारच.

बी ने युरप अमेरिकेबद्दल पाजळलेले ज्ञान महान आहे. अन वर इथे अनेक वर्षे राहिलेले लोक सांगत आहेत ते चूक अन तात्पुरती बिझिनेस किंवा टूरिस्ट व्हिजिट देऊन जगाबद्दल सर्व ज्ञान मिळवलंय तेच कसं खरं आहे हा टोन संतापजनक वाटला. असो.>>

मैत्रेयी माझ्याकडे इतके ज्ञान नाहीच की माझे ज्ञान पा़जळणार. मी खूप कमी बीबींवर लिहितो. मान्य आहे तुझे टण्यावर फार निस्सिम प्रेम आहे पण मग ही प्रतिक्रिया फक्त एकाच व्यक्तिपुरती लिहायची असती. कारण फक्त त्याच्या एकाच्या प्रतिक्रियावर मी विरोध दर्शवला आहे.

आणि वर हे तुच म्हणते आहेस हे विसरु नकोस : "हे मला काही कळत नाही. एखाद्याने असे एकांगी मत लिहिले तर इतरांनी काय करणे अपेक्षित आहे ? (प्रतिक्रियांमधे ) ते मांडणारच ना दुसरी बाजू , किंवा समोरच्याची खोडून काढणार हेही आलेच!!"

You are talking about what is right and what is wrong whereas the writer is more talking about the reality of what goes on in the minds of the people who are in such unfulfilled relationships and how some people deal with it.>>

हे असे मलाही जाणवल लेख वाचताना.

इंटरेस्टिंग चालू आहे चर्चा Happy

चिनूक्स, हा लेख रंगीबेरंगीवर टाकला आहेस आणि ह्या लेखावर तुला चर्चा घडवून आणायची आहे हे माहीत आहे. नंतरच्या चर्चेत परतपरत भाग न घेणे समजू शकते पण ह्या लेखाबद्दल तुझे काय मत आहे ह्याबद्दल एकही पोस्ट तू लिहिली नाहीस असे का ? म्हणजे जनरली बरेचदा लिहित नाहीस असे निरीक्षण आहे. आज विचारले एवढेच Happy

हा काही रिसर्च पेपर नाहीये बॅलन्स्ड लिहायला, हा एक पर्स्पेक्टिव आहे.त्यात आपण दुसर्‍या जोडीदाराची भरड, न्या अन्याय घालून त्याचा एकताकपुरीय गोपालकाला न केलेलाच बरा.>>>>> आपण गोपालकाला केला नाही तरी या गोष्टी अपरिहार्य, वेगळ्या न करता येणार्‍या आहेत त्यामुळे गोपालकाला व्ह्यायचा रहात नाही. कुंडलकरांनी 'प्रेम करत रहा, प्रेमातली गंमत अनुभवा' सांगितले, पण ते सोयीनुसार असं सांगायला विसरले वाटतं.
कुंडलकरांना 'प्रेम' हे शारीरीक जवळकीच्या अनुषंगाने अभिप्रेत आहे हे गृहीत धरून पुढे लिहीलं आहे. अन्यथा प्रेमाची व्याख्या इतकी तोकडी नाही.
प्रेमात पडल्यानंतरची मानसिक अवस्था, अनुभवायला येणार्‍या वेगवेगळ्या भावना, 'त्या' व्यक्तीबद्दल वाटणारी भावना (प्रेम?) हे सगळं सगळं एकाच मितीवर तोलत आहेत. पण आधी ज्या व्यक्तीबरोबर हे सगळं अनुभवलं आहे, त्या व्यक्तीबद्दल अजूनही ह्याच भावना आहेत, ती व्यक्ती अजूनही आपल्या आयुष्यात आहे त्या व्यक्तीला असं सहज मानसिकरीत्या वेगळं करू शकतो का? आणि असं वेगळं न करताही तीच गंमत, त्या सुंदर भावना वगैरे नवीन व्यक्तीबरोबर अनुभवू शकतो का? प्रेम ही जाता जाता सहज करायची गोष्ट नाही किंवा ठरवून प्रेमात पडता येत नाही. त्याबरोबरीने येणार्‍या गुंतागुंती अपरीहार्य आहेत (आणि पर्यायानं येणारं दु:खही), ज्यामुळे ही भावना त्रासदायक होऊ शकते, होते. इतक्या सहजपणे असं एका एका खोलीतून दुसर्‍या खोलीत गेल्यासारखं एका नात्यातून दुसर्‍या नात्यात जाता येत नाही हो. 'शारीरीक जवळीक' हा शब्द आला की अनेक गोष्टींचे संदर्भ बदलतात. इथे बरोबर किंवा चूकचा प्रश्न नाही किंवा त्याबद्दल टॅबूही लावत नाहीये. Human mind हा अतिशय कॉम्प्लेक्स विषय आहे, त्याचा थांग लागणं - तेही प्रेमासारख्या विषयावर -आत्तातरी अवघडच आहे. त्या दुसर्‍या व्यक्तीबद्दल न्याय, अन्याय वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या तरी माझ्यामते असं सहजपणे जाता जाता प्रेमात पडता येत नाही. उठसूठ असं कुणाच्या प्रेमात पडण्याइतकं प्रेम 'सहज' (मी दुसरा शब्द वापरणार होते, पण राहू दे) नसावं. प्रेम आणि प्रकरण यात कुंडलकरांसारख्या 'अनुभवी' माणसानं गल्लत करावी याचं नवल वाटतं. प्रकरण सवंग वाटतं, प्रेम सवंग असतं का?
असो. मी काही 'ओल्डफॅशन' वगैरे नाही, पण लेख अतिशय एकांगी, वर वरचा, उगाच कवीतेसारखा लिहीण्याचा प्रयत्न वाटला.

अंजली खूप छान मनोगत मांडलेस. पण प्रेम इतक्या सहजासहजी होत नाही कुणावर. इतक्या धडाधड प्रेमच काय पण साधेसुधे क्रश सुद्धा होत नाही कुणावर.

ती व्यक्ती अजूनही आपल्या आयुष्यात आहे त्या व्यक्तीला असं सहज मानसिकरीत्या वेगळं करू शकतो का? आणि असं वेगळं न करताही तीच गंमत, त्या सुंदर भावना वगैरे नवीन व्यक्तीबरोबर अनुभवू शकतो का?>>>>>> जे लोकं इतर व्यक्तींकडे बघतात्/जातात ह्या गोष्टींकरता त्यांनी हा प्रयत्न कधीच केला नसेल असं आपण गृहित धरु शकतो का? म्हणूनच मी म्हंटलो की कधी कधी ते शक्य नसतं (प्रयत्न करुन सुद्धा).
ह्याची उलट बाजू म्हणजे उद्या जर कुंडलकर एखाद्या व्यक्तीला, जी आपल्या समाजमान्य नात्यात अगदी खरोखरच सुखी आहे अशा माणसाला जर बोरिंग म्हंटले तर मग ते स्वतः आता "जज" करत असतील आणि स्वतःच्याच ओपन आउटलूक/विचारसरणीशी ते प्रतारणा करतील.

जे लोकं इतर व्यक्तींकडे बघतात्/जातात ह्या गोष्टींकरता त्यांनी हा प्रयत्न कधीच केला नसेल असं आपण गृहित धरु शकतो का?>>> म्हणजे कसला प्रयत्न? मानसिकरीत्या वेगळं करण्याचा? असं असेल तर फारच पावरबाज मन पाहिजे हो - स्विच ऑन ऑफ केल्यासारखं प्रेम वाटणे अथवा न वाटणे अशा भावना वाटायला.

Pages