मनात माझ्या

Submitted by विदेश on 23 May, 2015 - 01:23

सखे घेतला हात तुझा हाती जेव्हा माझ्या
वाटुन गेले जग मी जिंकले मनात माझ्या ..

फुटू लागला प्रीतीचा अंकुर हृदयामधुनी
होता पहिली नजरानजर वाटे मनात माझ्या ..

आकाशाचे मीलन धरतीवर होई जेथे
क्षितिजावर मी रंग उधळले मनात माझ्या ..

फिरू लागलो जोडीने त्या उद्यानामधुनी
उमलु लागली डोलु लागली फुले मनात माझ्या ..

झाडाखाली विश्व विसरलो उन्हात जेव्हा सखये
किती बरसला अवचित पाऊस मनात माझ्या ..

आपण दोघे चांदण्यात त्या निवांत न्हात होतो
चंद्रालाही खूप खिजवले दुरुनी मनात माझ्या ..

जन्म हा केवळ दोघांचा सातही जन्म असावा
मिळुनी घ्यावी शपथ दोघांनी आले मनात माझ्या ..
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users