प्राक्तनाची गति

Submitted by vilasrao on 22 May, 2015 - 08:54

अनुभव जणू कठोर मजकूर रुजले मनात आता
सांत्वने शिंपताच येथे काटेच उगतात आता !

मानवतेच्या पाऊलखुणा पुसल्या अशाही गेल्या
पाऊस स्वार्थाचा कोसळतो रोज गावात आता!

आत्मा कसा गुंतला पाहता कावळे ओशाळले
स्पर्शन्या पिंडास जमले होते स्मशानात आता !

रंगली सुंदर मूर्ति नेहमी होती मनात माझ्या
आज रंग फिका आळवितो दगडा राउळात आता!

प्रारब्धाची सहल प्राक्तनाची गति अनामिक भिती
गुंफून कुंपन मायावी वंचित मी जगात आता !

Group content visibility: 
Public - accessible to all site users