ती एकरुप झाली

Submitted by देवनिनाद on 22 May, 2015 - 08:21

ही चाहूल म्हणावी की,
तू कवेत असण्याची
गर्द सावली स्वप्नातली

कधी भास देई हूल
वेड्या मनास जणू भूल

कळेना काय वाटते या क्षणाला
थांब, जरा धर थारा समजावले वेड्या मनाला,

अखेर उसळली, एक मालिकाच उष्म श्वासांची,
वाटले नको लागो सवय या ञासाची

सैरभर मन झाले, शान्त एका क्षणात
नव्हती चाहूल, नव्हते भास तीच उभी समोर साक्षात

थेट येऊनी कवेत शिरली, विरले स्वप्न
तन-मनासह ती एकरुप झाली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users