हिमभूल" - काझा ते मनाली व्हाया कुंजुम पास

Submitted by जिप्सी on 17 May, 2015 - 10:26

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

३. "हिमभूल" — छितकुल गाव

४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)

५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)

६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"

७. "हिमभूल" - कि आणि ढंकर मॉनेस्ट्री

८. "हिमभूल" - काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा

९. हिमभूल" - पिन व्हॅली

========================================================================
========================================================================

प्रचि ०१
परतीचा प्रवास
प्रचि ०२

प्रचि ०३
कुंजुम पास- मनालीहुन येताना कुंझुम हे स्पितीचे प्रवेशद्वार मानले जाते. आम्ही काझाहुन लोसर, कुंजुमपास मार्गे मनालीला निघालो. येथुन जाणा-या सर्व गाड्या येथे असलेल्या कुंजुम देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालुनच पुढच्या प्रवासाला निघतात. कुंजुम पासहुन चंद्रा नदी आणि बर्फाच्छादित शिखराचे विलोभनीय दृष्य दिसते. हा पास पार केल्यानंतर खोकसरहुन एक रस्ता हिमाचलमधील एका सुंदर सरोवराकडे चंद्रतालकडे जातो.

प्रचि ०४

प्रचि ०५
कुंजुम देवी
प्रचि ०६

कुंजुमपासच्या पुढे चांद्रताल आणि बातल येथुन मनालीला जाणारा हा सारा परीसर शीत वाळवंट अर्थात कोल्ड डेझर्ट म्हणुन ओळखला जातो. हा सारा परीसर म्हणजे फोटोग्राफर्सना पर्वणीच. हिमाच्छादित शिखरे, खळाळत बेफाम वाहणारी चंद्रा नदी आणि तिच्या तीरातीराने, दगडधोंड्यातील आणि ग्लेशिअरच्या पाण्यातुन जाणारा रस्ता. इथुन पुढे ग्रांफूपर्यंतचा सारा प्रवास हा चंद्रा नदीच्या सोबतीनेच होतो. चंद्रा आणि भागा या दोन नद्या उत्तरेला सूरजतालजवळ बारालाच्याच्या खिंडीतून उगम पावतात. भागा पश्चिमेला पत्तन दरीत तर चंद्रा दक्षिणेला लाहौल दरीत उतरून बातल येथुन पश्चिमेला वळते. पुढे तंडी या गावी या एकमेकात समरस होताता आणि मग जन्म घेते ती "चंद्रभागा". हिच नदी पुढे कश्मिर आणि मग पाकिस्तानात "चिनाब" या नावाने ओळखली जाते.

चंद्रा नदी
प्रचि ०७

प्रचि ०८
चांद्रतालकडे जाणारा रस्ता (फक्त १४ किमी अंतरावर असलेलं स्वप्न भंगल Sad )
चंद्र ताल - हिमलयातील सर्वात सुंदर तलावांपैकी एक चंद्रताल. खरंतर याचेच फोटो पाहुन हि टूर आखली होती. पण Landslide झाल्याने खोकसरहुन तेथे जाणारा रस्ता बंद असल्याने आम्ही एका नितांत सुंदर अनुभवाला मुकलो. Sad कदाचित पुन्हा जायला काहितरी निमित्त पाहिजे ना. Wink

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
मनाली - काझा रस्ता Happy
प्रचि १५

प्रचि १६
बर्फाच्या भिंती
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
विलोभनीय हिमशिखरे
प्रचि २३

प्रचि २४
पुन्हा एकदा चंद्रा नदी
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
धूssssssssssssम
प्रचि २९

प्रचि ३०
ग्लेशिअर वितळुन रस्त्यावर आलेले थंडगार पाणी Happy
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७
ग्लेशिअरचा प्रवाह
प्रचि ३८
ग्लेशिअरच्या पाण्यात अडकलेली गाडी
प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

(पुढील अंतिम भागात "मनमोहक मनाली, रोहतांग पास सहित Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

ह्या भागात लगोर्‍या रचलेल्या खूप दिसतात Wink

सिनेमात बघून बर्फ किती शुभ्र असेल असं वाटतं, पण आम्ही गेलो होतो तेव्हा रोहतांगला खूप मळकं बर्फ पाहिल्यावर सिनेमा टाईप एकमेकांना बर्फाचे गोळे वगैरे मारायचा आचरटपणा करवलाच नव्हता :खोखो:. वरच्या फोटोंमध्येही बर्फाच्या भिंती मळक्याच.

सुंदर..

या भागात कधी जावे हि ईच्छा मरायला लागली रे माझी.. इतके सुंदर तर प्रत्यक्ष मला डोळ्यांनीही दिसणार नाही !!

मस्त मस्त मस्त.

२५ वा खूप आवडला.

रच्याकने त्या नदीचे पाणी खरच एवढे गढूळ आहे की फोटोच्या अँगलमुळे तसे वाटतय?

तुला चांद्रताल ची सफर लवकरात लवकर घडो या साठी शुभेच्छा. >>> आम्हाला चांद्रताल ची सफर लवकरात लवकर घडो या साठी तुला शुभेच्छा. Happy

आम्हाला चांद्रताल ची सफर लवकरात लवकर घडो या साठी तुला शुभेच्छा. >>> +१ Wink

नदीचे पाणी खरच एवढे गढूळ आहे >> माधव.. हिमालयातील बहुतेक नद्यांचे पाणी हे असेच कॉफी सारखे दिसते. कारण तिथली भौगोलीक परिस्थीती. आपल्या कडे पावसाळ्यात जसे चहाचे पाट वाहतात तसे हिमालयात चुनखडी मिश्रीत कॉफीचे पाट वहात असतात.

इंद्रा, माझ्या आठवणीत सोनमर्गच्या आसपास एक छोटा ग्लेशीयर होता. तो बघायला जाताना एक ओहोळ लागला होता. त्याचे पाणी लांबून बघायला हिरवट रंगाचे आणि जवळून बघताना अगदी स्फटीकसाफ ( Happy ) होते. पाण्याची चव पण एकदम मस्त होती (तहान नसताना पेयाची चव आवडली तर ती खरच भारी असते).

तसे पाणी तुमच्या कोणाच्याच फोटोत दिसले नाही. म्हणून विचारले मी.