“डोह”

Submitted by Charudutt Ramti... on 15 May, 2015 - 01:34

“डोह”

ऊन विचारांचे वरती,
त्याची लागत राहते झळ…
डोह मनाचा खोल खाली,
त्याचा सापडत नाही तळ…
भावन्नान्चे वाढते अशक्त डिंबक,
किनारी, त्यांना नाही कसले बळ…
तितक्यात भुकेल्या जलचरास,
भेटतो लोभाचा खुनशी गळ…
विषयाची जलपर्णी नितांत उत्सुक,
ऐकण्या सापांची सळसळ…
जगण्याची होती करत धडपड,
कापली पुजेस ती ही करदळ…
ऊन विचारांचे वरती,
त्याची लागत राहते झळ…

चारूदत्त रामतीर्थकर
पुणे 15 मे 2015

Group content visibility: 
Public - accessible to all site users