कॉल

Submitted by अलका_काटदरे on 20 January, 2009 - 10:57

ब्लंक कॉल केलेस तरी चालेल मला
पावती मिळेल मला तुझ्या भरल्या मनाची

फोनवरून वाद घातलेस तरी चालेल मला
खात्री होईल तुझ्या इनव्हॉल्व्हमेंटची

महिनोंमहिने नाही बोललास तरी चालेल मला
ऊमजेल बोली तुझ्या अबोलतेची

ऊशिरा घरी आलास तरी चालेल मला
समजेल अस्तित्व तुझ्या दुरत्वातील

सगळे काही चालतेय मला, असे मात्र कधी वाटले तुला
तर..
अनंतजन्म वाट पाहावी लागेल तुला-
माझ्या अन तुझ्या स्वरूप एकरुपतेची..

(मोबाईलचा जमाना नविन असतानाची- २००४).

अलकाताई, चालेल बरं, चालेल Biggrin

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

छान