टाईम वसूल! पैसा वसूल! टाईमपास टू वसूल!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 May, 2015 - 04:35

ही पोरी नाजूक लेल्यांऽऽची, तिला परबाचा लागलाऽय नाद ..
या नोटवर संपलेला टाईमपास-वन तेव्हा मनात बरेच प्रश्न सोडून गेलेला.
अमीर-गरीब लव्हस्टोरी बॉलीवूडी चित्रपटांना काही नवीन नाही, ना तो फॉर्म्युला कधी जुना होणार. ज्याच्या आधारावर हिरोईन सार्‍या जगाशी पंगा घेणार तो हिरोच जर आर्थिकद्रुष्ट्या कमकुवत दाखवला तर त्यांच्या प्रेमापुढे तेच एक आव्हान ठरते आणि सारे कथानक त्याभोवतीच फिरत राहते.

टाईमपास-वन हा चित्रपट देखील अश्याच पठडीतील एक असला तरी यात दोन वेगळेपण होते. एक म्हणजे पौगंडावस्थेतील प्रेमकथा आणि दुसरे म्हणजे प्रेमी युगुलांमध्ये निव्वळ आर्थिक दरी नसून दोघांच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणात दाखवलेली तफावत, नव्हे यांवरच हा चित्रपट बेतला होता.
या पहिल्या भागाचा शेवट दोघांची प्रेमकथा अर्ध्यावरच सोडून केला होता. ती कथेची मागणी असो वा दुसर्‍या भागाची सोय, पण लॉजिकली तेच पटणारे होते.

आणि तरीही तो चित्रपट मनात बरेच प्रश्न सोडून गेलेला. पैकी रेंगाळणारा एक असा - या चित्रपटाचे समाजमनावर काही पडसाद तर उमटणार नाहीत ना? यानंतर सुसंस्कृत मध्यमवर्गातील मुलींच्या पालकांना चित्रपटाच्या प्रभावाखाली आलेल्या एखाद्या दगडूपासून आपली मुलगी सांभाळावी तर लागणार नाही ना?
आणि म्हणूनच पहिला भाग पुरेसा आवडूनही मी या दुसर्‍या भागाबद्दल फारसे अनुकूल मत बनवून नव्हतो. ना या भागाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत होतो.

पण आज दुसरा भाग पाहिला आणि तो या प्रश्नांची उकल करण्यास गरजेचा होता असे वाटले.

पहिल्या भागाची लिंक पकडून येणार्‍या दुसर्‍या भागातील कथा मात्र नेहमीचा फॉर्म्युला वापरतच पुढे सरकते. शिक्षणात कमी असलेल्या दगडूचे मेहनतीने अन सचोटीने मोठा माणूस बनणे. त्याचे प्राजक्तावरचे प्रेम तसूभरही कमी न होणे. तेच दुसरीकडे प्राजक्तादेखील अजूनही दगडूच्याच आठवणीत त्याचीच वाट बघत असणे. त्यांच्या या प्रेमकहाणीत त्यांच्या प्रेमाचे दुश्मन, प्राजक्ताचे वडील शाकाल उर्फ वैभव मांगले यांचाच काय तो एकमेव अडसर. बस्स एक त्यांची परवानगी मिळवली की हॅपी एण्डींग. चित्रपटाची स्टोरी सेट आहे हे समजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. काय होणार आहे हे ठाऊक असते. जसे घडत जाते तसे अंदाज येत जातो. पण ते घडते मात्र फार रंगतदार पद्धतीने.

वॅंऊऽ वॅंऊऽ वॅंअऊ वॅं.. वॅंऊऽ वॅंऊऽ वॅंअऊऽ वॅं....
अ‍ॅम्बुलन्स सायरनची थीम उचलून बनवलेले गाणे हिरोची एंट्री घेते आणि ते काय अतरंगी कॅरेक्टर आहे हे पाचच मिनिटांत समजून जाते. या आधी चित्रपटाचे प्रोमोज पाहिले होते, तेव्हा हे प्रकरण हिरो म्हणून आपल्याला काही झेपणार नाही, असेच वाटले होते. मात्र चित्रपट संपता संपता माझे माझ्याही नकळत मतपरीवर्तन झाले होते. एखाददुसर्‍या जागी भुमिकेचे बेअरींग पकडायच्या नादात थोडीफार ओव्हरअ‍ॅक्टींग होते. पण मुळात त्याचा प्लस पॉईंट हा आहे की तो चांगली अ‍ॅक्टींग करतो. पहिल्या भागाच्या तुलनेत या भागातील काही द्रुश्ये डोळ्यातून पाणी काढतात. याचाच आणखी एक अर्थ असाही होतो की आपण त्या हिरोला (किमान या चित्रपटापुरते) स्विकारले आहे आणि त्यांच्या प्रेम कहाणीशी रिलेट करू शकलो आहोत.

प्रिया बापट ही अभिनेत्री दिसायला प्रचंड गोड आहे यात दुमत नसावे, पण तरीही का माहीत नाही मला तिच्यात हिरोईन मटेरीअल नेहमीच मिसिंग वाटत आले आहे. आता ते नेमके काय हे मलाही सांगता येणार नाही, पण यात मात्र ते मला गवसले. हिरो म्हणून दगडू सर्व फोकस स्वतावर घेत सिनेमा खायला समोर उभा असताना प्रिया बापट तिच्यावरही तेवढेच लक्ष द्यायला आपल्याला भाग पाडते. तिची चित्रपटातील एंट्री "मी बावरू की सावरू, माझे मला ना कळे... प्राऽजू प्राऽजू" या गाण्यांतून तितकीच दमदार होते. बरेच दिवसांनी एखाद्या मराठी सिनेमात हिरो हिरोईनच्या अश्या कॅरेक्टर उभ्या करणार्‍या एंट्रया बघायला मिळाल्यात.

अर्थात यात वाटा गाण्यांचाही आहेच. या एंट्रीच्या दोन गाण्यांबरोबर "दगडूऽऽ सावधान" हे गाणेही चित्रपटात छान वाटते तर शेवटचे सॅड सॉंग "सुन्या सुन्या मनामध्ये" देखील आपण आठवणीने घरी आल्यावर डाऊनलोड करतो. थोडक्यात टाईमपास-वनच्या म्युझिक अल्बमने वाढवलेल्या अपेक्षा टा-टू मध्ये पुर्ण होतात.

सहकलाकार - शाकाल उर्फ वैभव मांगले बेस्टच. सहकलाकार हा शब्द चुकीचा ठरावा इतके हिरो-हिरोईन एवढीच महत्वाची भुमिका या कॅरेक्टरची आहे. मुन्नाभाई चित्रपटामधील मधील बोमन इराणी यांनी साकारलेल्या डॉं अस्थानाच्या भुमिकेशी तुलना करायचा मोह व्हावा असे कॅरेक्टर आपल्या देहबोलीतून उभे करतात मांगले. पहिल्या भागातीलच बेअरींग इथेही पकडतात पण यात त्या पात्राच्या स्वभावातील आणखी काही पैलूंचे दर्शन घडते. चित्रपटात एके ठिकाणी हिरो त्यांना काटेरी फणस म्हणतो. त्यातील काटेरी भाग आणि आतला गोड गरा असे दोन्ही पैलू जेव्हा दाखवतात तेव्हा ते दोन्ही विश्वासार्ह वाटते, त्या त्या वेळी हेच यांचे खरे रूप आहे असेच वाटते. त्यामुळे त्यांचे वेळप्रसंगी चिडणेही योग्य वाटते आणि शेवटी घडलेले मतपरीवर्तनही तितकेच सहज वाटते.

भाऊ कदम यांची भुमिका तर त्यांच्यासाठी घरचे मैदान आहे. सहज निभावून नेतात. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या भुमिका बघायला आवडतील. इथे त्यांना मिळणार्‍या फुल्ल मार्क्स बरोबर त्यांना कास्ट करणार्‍याला देखील फुल्ल मार्क्स द्यावे लागतील.

दगडूच्या मित्रांना आपापली एकेक लकब दिली आहे आणि पैकी कोणीही कुठेही चित्रपटातील मनोरंजन कोशंटचा तोल ढळू देत नाहीत.

सर्वांच्याच तोंडी असलेले चुरचुरीत संवाद हा या भागाचाही प्लस पॉईंट. विनोदनिर्मिती मुख्यत्वे यातूनच होते. मात्र कुठेही ओढूनताणून विनोद केलेला आढळत नाही.

नाही म्हणायला मध्यांतरानंतर एके ठिकाणी सिनेमा थोडासा रेंगाळल्यासारखे होते, पण हे पाचदहा मिनिटांचेच आणि गरजेचे आहे म्हणून दाखवलेय असे म्हणत आपण पुढच्या भागाची वाट बघतो.

तांत्रिकद्रुष्ट्या हल्ली मराठी चित्रपटांबद्दलच्या वाढलेल्या अपेक्षा हा सहजी पुर्ण करतो.
पण चित्रीकरणात विशेष लक्षात राहते ते कोकणचे सौंदर्य!
प्रिया बापटच्या सोबतीने ते आणखी खुलून दिसते. मुद्दाम दाखवायचा अट्टाहास न करताही विलक्षण सुंदर दिसते. दिवेलागणीच्या वेळेस, अंधारलेल्या कौलारू घरांमध्येही ते जाणवत राहते. त्या सौंदर्यात दडलेली सात्विकता भजनांमधून उमटत राहाते. हे सारे टाईमपास टू मध्ये दिसणे हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.

या आणि अश्या काही अंगाने हा चित्रपट मला स्वत:ला पहिल्यापेक्षा उजवा वाटला. जर तुम्हाला पहिला भाग थोडाफार जरी आवडला असेल, तर हा नक्की बघा. जर पहिल्यात काही खटकले असेल, तरी एक चान्स द्यायला हरकत नाही. कदाचित जे पहिल्या भागात खटकले ते खटकने दूर होण्यासाठी याची मदत होईल.

रेटींग - ती ज्याची त्याची वैयक्तिक असल्याने मी देत नाही.
पण चित्रपटाने मनावर गारूड केले की मी एखाददुसरा दिवस त्याच नशेत असतो. तुर्तास, "वॅंऊऽ वॅंऊऽ वॅंअऊ वॅं.." गाणे गुणगुणत त्यावर हॉर्न वाजवल्यासारखी सिग्नेचर स्टेप करत नाचणे चालू आहे.

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला टाईमपास-वन देखील लोकांना एवढा का आवडला कळले नाही. काय ते डायलॉग्स Sad ... हम गरीब हुए तो क्या हुआ वैगरे ...हे सगळीकडेच एवढे अती झाले होते की तो सिनेमा बघायची इच्च्।आ झाली नाही. एकदा केबलवर पिक्चर मधील एक सीन बघितला आणि पुढे पहावला नाही. कितीतरी ओळखीचे लोग 'अग तू टीपी नाही बघितलास 'हे जसा किती मोठा गुन्हा केला या टोन मधे विचारत होते.
घरी आलेल्या पाहूण्यांचा ६ वर्षाचा मुलगा त्यातील डायलॉग्स म्हणून दाखवत होता आणि आई वडी लांना जाम कौतूक वाटत होते. it was irritating.

सिक्स प्याक = बरगडी ?????

लोकांना शरीर सौष्ठव असलेला नायक आवडतो. आहेच ती मागणी.
सिक्स प्याक बनवायला घाम गाळावा लागतो.
मेहनत करून शरीर कमावल्यावर, दाखवायला का लाजायचं?

काही द्रुष्यामंध्ये तो पाठीला बाक देऊन उभा राहतो आणि त्याच पोट बाहेर आलेलं दिसत. दिग्दर्शकाच्या नजरेतून सुटल बहुतेक.पोट लपवण्यासाठी स्वप्नील जोशीची शिकवणी लावायला हवी होती, कदाचित बजेट मध्ये बसल नसेल.

पोट लपवण्यासाठी स्वप्नील जोशीची शिकवणी लावायला हवी होती>>> Rofl

त्यालाही ते जमतं असं नाही, पण तो ओव्हरॉल लोद्या असल्याने पोटाचा आकार बाकी शरीराबरोबर कंपॅटिबल वाटल्याने ते खपून जातं. Proud

>>> मेहनत करून शरीर कमावल्यावर, दाखवायला का लाजायचं? <<< अज्जिबात नै लाजायच.
पण ह्ये बेणं मेहनत न करताच काडीपैलवानागत असलेल काटकुळ शरीर "न लाजता" दाखवतय त्याच काय करायचे? आपणच डोळे झाकुन घ्यायचे न काय.....
अस वाटतय की चौका चौकात नै का अपंग/व्यंग असलेले शरीराचे भाग दाखवीत दाखवित पैशाच्या भीका मागत असतात? तस्सच हे बेणं आपलं काटकुळ अंग उघड टाकून प्रेमाच्या भीका मागतय की काय..... Sad श्शी.....
"दिग्दर्शकाने" सांगितल्यापेक्षा वेगळे तो तरी बिचारा काय करणार म्हणा? अन "लेखाकाने" लिहिलेल्यापेक्षा एक अक्षरतरी वेगळे बोलू शकेल काय?

दर्शन एक मेहनती आणि हुशार कलाकार आहे, उत्तम रायटर ही आहे, त्याचे फु बाइ फु चे काही प्रवेश आवडाले होते...
टिपी १ मला त्यातल्या पात्र निवडि साठि आणि गाण्यासाठी आवडला होता.. मोठा झालेला दगडु म्हणुन दर्शन सुट होतोय बाकी गोश्ती मुब्व्ही बघितल्यावरच.. (सोनाली ने त्यात एक गाण केलय .. (इतक चिप गाण मी अजुन तरी मराठित पाहिल नाही)

शी बै,
स्वप्नील आणी बाकीच्यांबरोबर, सईच्या पोटाबद्दल कोणी काही बोलु नका बरें !

>>>> स्वप्नील आणी बाकीच्यांबरोबर, सईच्या पोटाबद्दल कोणी काही बोलु नका बरें ! <<<< का ? का?
का नये बोलू? त्यांनीही त्यांची छाती अन पोटे उघडी टाकली अन ती शोभुन दिसत नसतील/बेंगरूळ दिसत असतील तर बोलायला हवेच की... नै का? Wink

<< भाऊ, त्या डेलीसोप मालिकाच मुळात प्रेक्षकांना गृहीत धरून पाणी घालत चालू असतात. त्यामुळे त्याच्या प्रेक्षकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय वगैरे होतो हे मला पटत नाही. >> वरणात पाणी घालून वाढवणं व त्यांत भेंडी घालून तें वरणच म्हणून वाढणं यांतच खरा फरक आहे ! Wink

वरणात पाणी घालून वाढवणं व त्यांत भेंडी घालून तें वरणच म्हणून वाढणं यांतच खरा फरक आहे !
>>>>>
वरणच म्हणून वाढणं ..... हे करत असतील तर त्यावर आक्षेप घेऊ शकता. पण ते तसे करत नाहीयेत. ते प्रमोशन करायलाच येतात हे प्रेक्षकांनाही ठाऊक असते.

स्वजो आला . मग शाखा येईल आणि ऋन्मेऽऽष धागा सुफळसंपूर्ण होइल.
>>>>>>
पण यातले मी काही आणले नाहीये ना आणा अशी हिंट दिलीय.
कोणाला स्वजोच्या पोटाचा उल्लेख इथे करावासा वाटला तर मी मला स्वजो आवडतो म्हणून त्यांना नाही म्हणू शकत नाही ना.
आणि आता शाखाही इथे यावा अशी हिंट तर आपणच स्वता देत आहात याचा काय अर्थ काढावा?

सूनटून्या,
सहमत,
त्या हिरोला उगाचच्या उगाच उघडे दाखवत होते. तसेही तो काही देखणा दिवा नाही ना पीळदार शरीरयष्टी. तर ते अजागळच दिसत होते. किंवा कदाचित तोच दिग्दर्शकाचा हेतू असावा. पण तो देखील फार स्तुत्य नव्हता.

पण ती सिनेमा मध्ये दुय्यम नर्तकीच्या भूमिका का स्विकारते, ते काही कळले नाही.
>>>>
तिने सांगितले आहे त्याचे कारण.
ती फक्त जिची रूममेट असते ती डान्सर असते. म्हणून ही एकदा सहज म्हणून वा अनुभव म्हणून ते एकदाच नाचते असे ती दगडूला बोलताना दाखवलीय.
तसेच बाबांनाही बोलते की तुमची फक्त मला भेटायची वेळ चुकली. म्हणजे तुम्ही नेमके तेव्हाच कडमडलात आणि मी तेच करतेय असा गैरसमज करून घेतलात.

मला टाईमपास-वन देखील लोकांना एवढा का आवडला कळले नाही.
>>>
जर मी चुकत नसेल तर आपल्याला दुनियादारी देखील आवडला नव्हता. तो तर टीपी वन पेक्षा सुपरहिट होता. याचाच अर्थ बरेच लोकांना आवडलेला.
प्रत्येकाची एकेक आवड असते, मलाही आजवर लोकांना भेंडी-वांगे-कारले-पडवळ-भोपळा हे कसे आवडते समजत नाही Happy
पण येस्स, मी त्याची चव घेऊन ठरवलेय की ते मला आवडत नाहीत, आपल्या प्रतिसादात लिहिलेय की आपण तो चित्रपट पाहिलाही नाही. एखाद्या डायलॉग वा सीनवरून पुर्ण चित्रपटाचे मूल्यमापन करू नका प्लीज. निदान मराठी चित्रपटाबाबत तरी इतक्या घाईने नकारात्मक निष्कर्श काढू नका.

(सोनाली ने त्यात एक गाण केलय .. (इतक चिप गाण मी अजुन तरी मराठित पाहिल नाही)
>>>>
हो खरेय, चित्रपटात तेच एक सर्वार्थाने फालतू गाणे आहे, म्हणूनच मी देखील उल्लेख टाळला. तसेही ती सोनाली मला आवडतच नाही फारशी हे मी क्लासमेटच्या परीक्षणातही लिहिलेले.

विष घेतल्यावर माणूस मरतो हे सांगायला अनुभव लागत नाही.
>>>>>
अप्पाकाका इथे उदाहरण चुकलेय. विष पिऊन जगण्यामरण्याचे नाही, तर एखाद्या पेयाला तुम्ही विष ठरवत आहात त्याबद्दल काहीही माहीत नसताना. ते एखादे उत्साहवर्धक पेयही असू शकते.

बीपी हा रवि जाधवांच्या आजवरच्या सर्व सिनेम्यातील उत्तम सिनेमा होता.
टिपी वन ओके होता.
हा हि नक्कीच ओके मुव्ही असणार. घरची मन्डळी बघुन आलीत. त्यांनी एन्जॉय केला.
व्यावसायिक गणिते रवि जाधव लवकर शिकलेत अस म्हणायला हरकत नाही.

सामी + १००००००००० .

मला टाईमपास-वन देखील लोकांना एवढा का आवडला कळले नाही. काय ते डायलॉग्स अरेरे ... हम गरीब हुए तो क्या हुआ वैगरे ...हे सगळीकडेच एवढे अती झाले होते की तो सिनेमा बघायची इच्च्।आ झाली नाही. एकदा केबलवर पिक्चर मधील एक सीन बघितला आणि पुढे पहावला नाही. कितीतरी ओळखीचे लोग 'अग तू टीपी नाही बघितलास 'हे जसा किती मोठा गुन्हा केला या टोन मधे विचारत होते.>>>>>> + १००००००००००००००००००००

>>>> काय ते डायलॉग्स अरेरे ... हम गरीब हुए तो क्या हुआ वैगरे ...हे सगळीकडेच एवढे अती झाले होते <<<<<
अहो हिंदी सिनेमांची हिंदी सिनेमे बनायला लागल्यापासून थोडक्याच काळात सुरु झाली ती तीसपस्तिस वर्षांपूर्वी ऐन भरात असलेली अमीरगरीबची भट्टी, तेव्हाही मराठि लोकान्नी इमानेइतबारे डोक्यावर थापून घेतली, अन आता इतक्या उशीरा मराठीमधे ती भट्टी (भट्टी कुठली? शेगडी/चूलही म्हणवत नाही) पेटवलीये, तर इथेही मराठीजन त्याची नव्याने उब घेत बसलेत..... !

हा हि नक्कीच ओके मुव्ही असणार. घरची मन्डळी बघुन आलीत. त्यांनी एन्जॉय केला.
व्यावसायिक गणिते रवि जाधव लवकर शिकलेत अस म्हणायला हरकत नाही.
>>

माझ्याही ओळखीतले जे बघून आले त्यांनी एंजॉयच केला. पार्ट वन तर कित्येक हिंदी भाषिकांनी (थोडेफार मराठी समजणार्‍यांनी) देखील पाहिला. त्यातल्या काही जणांनी तर "क्या नया है वह" हे जाणून घ्यायला म्हणून पाहिला.

दगडु आणि प्राजु दिदोदु मध्ये पप्रमोशन साठी गेले होते?
नशिब आमचे नाहीतर जय मल्हार मध्ये बानुच्या लग्नाला हे दोगे आहेर द्यायला आले असते Happy

>>>>नशिब आमचे नाहीतर जय मल्हार मध्ये बानुच्या लग्नाला हे दोगे आहेर द्यायला आले असते>>>><<<<
>>>> राहुल, डोन्ट गिव्ह देम आयडीयाज <<<<
Rofl

राहुल१२३ | 14 May, 2015 - 16:59
दगडु आणि प्राजु दिदोदु मध्ये पप्रमोशन साठी गेले होते?
नशिब आमचे नाहीतर जय मल्हार मध्ये बानुच्या लग्नाला हे दोगे आहेर द्यायला आले असते>>>>>>>> Happy Happy Happy Happy १ number.

ते आपन हिथ पेरेझेन्ट आन इशेश देआयला आलो हाय. बानुबाय आन देवा आपली तुमाला काय हेल्प लागल तर कलवा. आपन हायच हजर कवाबी.:खोखो:

अप्पा रागवताय कशाला?:फिदी: मला खरच हसू आल ही कल्पना करुन की या बोअर झी वाल्यानी जर काळावेळाचेही भान न ठेवता, जर दगडुला जय मल्हार मध्ये आणल असत तर काय झाल असत. नशीब असला आचरटपणा त्यानी केला नाही.

माझ्या एका मित्राने फ्री पासेस मिळाले म्हणून बघितला, पण नंतर दोन तीन दिवस आजारीच पडला होता म्हणे ?

Pages