नभनाट्याचा थरार

Submitted by bnlele on 4 May, 2015 - 01:04

नभनाट्याचा थरार ...

काल विश्वात शुक्र आणि सूर्यानी घडवला तो थरार प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही.
नासानी केली भरपाई आणि टीव्हीवर दाखविलेल्या फिति बघता आल्या.
जगातल्या विभिन्न देशांमधे वेगवेगळ्या रंगाचा सूर्य दिसला- कुठे हिरवा तर कुठे लाल,
शेंदरी,धुरकट पांढरा, निळा,पिवळा असे अनेक रंग !
कुठे तो लाल-काळ्या चट्ट्यांनी वेढलेलाही दिसला, किंवा त्य्यावर काळे डाग दिसले.
भरतात मात्र काहीच जागी ढगांतून डोकावला- ढुअरकट आणि काळा डाग असलेला.
ती दृष्य बघताना विविध रंग आपल्याकडे दिसले नाहीत याची खंत होती-- पण ...
एका क्षणात, कां घडल असं याचा खुलासा पण चमकला.
प्रगत देशात हिरवा/पिवळा, सामाजिक-राजकीय अस्थैर्य असलेल्या देशात लाल-काळ्या वेष्टणात.
कुणा देशाला विश्वाच कुरण, कुणाला चैतन्न्याचा बहर असे भविष्याचे संमिश्र संकेत असावेत असे.
आपल्याकडे दिसला --निस्तेज-धुरकट आणि भ्रष्टाचाराचे काळेकुट्ट डाग !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users