शेत

Submitted by धनुर्धर on 3 May, 2015 - 22:04

आभाळाच्या सावलीत
हाये माझं शेत
पोटाच्या भाकरीला
राबत्यात हात

मातीच्या ढीकळात
बीयाणं पेरल
मनाच्या कोपर्यात
पीक तरारलं

ऊनपावसात त्याला
किती रे झपलं
पीक न्हव ते
जणू पोरच आपलं

पाटामधून पाणी
त्याला मी पाजलं
उभं हिरवगार पीक
माझ्या डोळ्यात सजल

ऐन सुगीच्या दिसात
पिक काढणीला आली
केलेल्या वरताची
जणू सांगताच झाली

माझ्या ह्या घरात
धान्याला नाही माप
शेत नव्ह ते नुसतं
हाये माझं मायबाप

. . . . . धनंजय . . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users