विनिमय

Submitted by जयदीप. on 29 April, 2015 - 14:02

जर तुला विनिमय हवा
तर तसा संचय हवा

सारखी चर्चा नको
जर तुला निर्णय हवा

जग भरवसा ठेवते
चांगला अभिनय हवा

शेर लिहितो चांगला
पण तसा आशय हवा

मागणे भलते तुझे !
रागही सविनय हवा ????

आंधळा नाहीस तू..
पण तुला संजय हवा !

मीच माझ्यासारखा
सांग ना, जर जय हवा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users