काळोखात

Submitted by धनुर्धर on 26 April, 2015 - 12:51

काळोखात कधी कधी
भेटतात काही प्रकाशकण
अंधार भरल्या राञीचे
उजळून टाकतात थोडे क्षण

पापण्या आड डोळे
स्वप्न पाहतात नवे
मनातल्या मनात
फुलून येतात ताटव

कुठून तरी झुळूक
सुगंध घेऊन येते
विखूरल्या शब्दांचे
जुळून येते गाणे

सुरकतल्या आशेला
फुटतात नवे पंख
जुन्या खेळामध्ये
पुन्हा नवा अंक

Group content visibility: 
Public - accessible to all site users