साधकाने..............

Submitted by विनायक. दि.पत्की. on 25 April, 2015 - 04:20

साधकाने ..........

साधनेच्या मार्गावर कधी,थांबू नये
सहज होणारी गोष्ट कधी,लांबू नये

मृगजळाच्या मागे कधी,पळू नये
सरळ रस्त्यात मधेच कधी,वळू नये

स्वार्था पोटी स्वाभिमान,विकू नये
विषयाच्या गर्मीने नाहक ,पिकू नये

चुका शोधणाऱ्याना सहसा,दिसू नये
नको त्या लोकात राहून,नासू नये

मनातून उतरतोल असे कधी,वागू नये
सर्व काही करून कलंक कधी,लागू नये

समस्यांच्या संखेने कधी,पिचू नये
अपमानाच्या घटनेने कधी,खचू नये

दान दिल्याने उदारता कधी,घटू नये
ठाम निश्चया पासून कधी ,हटू नये

फुकटच्या अभिमानाने कधी,नटू नये
आळशी लोकांशी आपले,पटू नये

जवळ असलेले दुसऱ्याला,मागू नये
गरजेपेक्षा जास्त कधी,जागू नये

गरज नसताना कोणावर,कोपु नये
आवशकतेपेक्षा जास्त कधी,झोपू नये

सतत गाऱ्हाणे ऐकून सुद्धा,विटू नये
कर्म फळे भोगताना कंठ कधी,दाटू नये

विनाकारण रागाने मधेच, पेटू नये
जेवताना पोट भरल्या शिवाय, उठू नये

गरजे शिवाय हत्यार कधी,तासू नये
बोलताना पूर्ण झाल्या शिवाय, बसू नये

कोणाच्याही अपमानाला कधी,हसू नये
मोडेल पण वाकणार नाही असे,असू नये

विनायक .दि.पत्की

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म