मला दिसलास उडताना

Submitted by जयदीप. on 23 April, 2015 - 23:43

मला दिसलास उडताना
मना, शुष्कावल्या पाना!

कुणाला द्यायची शिक्षा
कुणाची चूक नसताना

तुला होते बघितले मी
मला चोरून बघताना

कमी कर वेग आयुष्या
उभ्या घाटात वळताना

उद्या सोडून गेल्यावर
कुठे असशील एव्हाना

किती मी फोडला टाहो
तुला विसरून जाताना

..... जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या सोडून गेल्यावर
कुठे असशील एव्हाना<<< शेर मस्त! (मी एव्हाना ऐवजी 'ह्यावेळी' असे ऐकले होते. एव्हानाचा असा वापर प्रथम पाहिला. आजवर मला एव्हाना म्हणजे 'आत्तापर्यंत' इतकेच माहीत होते).

किती मी फोडला टाहो
तुला विसरून जाताना<<< वा वा

शिक्षा शेरही आवडला.

मी एव्हाना ऐवजी 'ह्यावेळी' असे ऐकले होते. एव्हानाचा असा वापर प्रथम पाहिला. आजवर मला एव्हाना म्हणजे 'आत्तापर्यंत' इतकेच माहीत होते << +१
मलासुद्धा हेच वाटून गेले होते

इंद्रा, बेफिजी , " उद्या एव्हाना कुठे असू आपण " अशी वाक्यरचना आमच्याकडे , आसपास , डोंबिवली - ठाणे तसेच दापोली वगैरे कोकणात सुद्धा ऎकलि आहे.
एव्हाना चा अर्थ ह्यावेळी असाच आहे