कंटाळा

Submitted by नीधप on 23 April, 2015 - 10:25

कंटाळा
अस्वस्थ कंटाळा
इथून तिथून, तुला मला,
आतून बाहेरून, मुळापासून
खच्ची करत जाणारा
कं टा ळा

स्वस्त, भडक, टिपटिप
गळत राहतो कंटाळा
पिरपिर, मचमच, कुरकुर
गडद गडद गडद कंटाळा

एक जिवंतपणाची खूण दिसावी
वाट बघत राहतो कंटाळा.

- नी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंटाळ्यांचे ऋतू कुसही पलटत नाहीत. मुक्कामालाच येतात. कविता पोचली त्यामुळे अगदी.

स्वस्त, भडक, टिपटिप
गळत राहतो कंटाळा
पिरपिर, मचमच, कुरकुर
गडद गडद गडद कंटाळा >>>

मस्त.

एक जिवंतपणाची खूण दिसावी
वाट बघत राहतो कंटाळा.>>

अगदी खरे आहे. मस्त जमली आहे कविता आणि शब्दांचा बाज मस्त रंगला आहे.

सर्वांचे आभार.

कंटाळ्यांचे ऋतू कुसही पलटत नाहीत. मुक्कामालाच येतात. <<
खरंय गं..

काल जिथे होते तिथे सगळे इंटरेस्टिंग/ महत्वाचे वगैरे लोक प्रत्यक्ष कामात बिझी होते. माझे काम आधी झालेले असते त्यामुळे मला फक्त तिथे हजर असणे गरजेचे होते. त्यातून त्या सगळ्याशी मी आत्यंतिक डिसकनेक्टेड होते आणि जिथे बसून राह्यले होते तिथे काही लोक सतत निर्बुद्ध बडबड करत होते.
सगळं मिळून कंटाळा रेज्ड टू एन झालं होतं.

आवडली.

गळत राहतो कंटाळा
पिरपिर, मचमच, कुरकुर
गडद गडद गडद कंटाळा

माझंही असंच झालंय अगदी... थेंब थेंब गळतोय, एकदाचा पुर्ण गळून वाहुनही जात नाहीये.

<< माझंही असंच झालंय अगदी... थेंब थेंब गळतोय, एकदाचा पुर्ण गळून वाहुनही जात नाहीये. >>
मग उद्या गटग करताय की नाही?