खुशाल भुसके

Submitted by संतोष वाटपाडे on 22 April, 2015 - 00:36

एका एका दिवसाला
दहा दहा कवितेसारखे दिसणारे
लेखन करुन...आम्हाला पिडून...छळून
काय मिळत असेल बरे तुम्हाला....

लाज वाटायला हवी थोडी तरी
कि आपल्या या बारीक बारीक
पोहोट्या ओलांडून लोक जात आहेत
कुणी ढुंकुनही पहात नाही...
तरीसुद्धा लेंड्या पाडायचे कुकर्म थांबवले नाहीत आपण......

मायबोलीवर सकस लेखन उत्कृष्ट
साहित्य वाचायला मिळते...
म्हणून आम्ही इथे येतो
दिवसभर पहिल्या पानावर
तुम्ही ओघळ मारुन ठेवलेले असतात...

डोकं आपटून घ्यावे का आम्ही??????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users