कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

Submitted by निमिष_सोनार on 20 April, 2015 - 04:42

माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ!
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ!!
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ!
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users