मी

Submitted by धनुर्धर on 17 April, 2015 - 02:25

डोळ्यात पापण्यांमागे अश्रूना आडवीत गेलो
मी हसर् या चेहऱ्यावरती दुखाःना दडवीत गेलो

अडखळली जागोजागी ती पाउले माझी ही
ती वाट मळलेली मी तशीच तुडवीत गेलो

उत्तरांनी मांडले होते माझ्या शीच दावे
पडणार् या प्रश्नांना मी तसाच सोडवीत गेलो

निघून गेले होते हातातून बळ सारे
गंजलेल्या तलवारींना मी उगाच लढवीत गेलो

सुकून गेले होते फुलांचे ताटवेही
मखर आयुष्याचे मी तसाच मढवीत गेलो

विरुन गेले होते स्वप्नांचे धागे तरीही
रंग जगण्याचा मी फिकाच उडवित गेलो

Group content visibility: 
Public - accessible to all site users