फोटो

Submitted by जयदीप. on 3 April, 2015 - 13:05

बास कर कंटाळणे आता, जरासा रम
न्यायला आत्ता तुला नाही रिकामा यम

एकही फोटो तुझा मी पाहिला नाही
तू खरा आहेस की आहेस नुसता भ्रम

जन्मल्यावर काळजाने पकडला ठेका
दूर होती वाटली, पण.... जवळ आली सम

मोडलेल्या छप्परावर वादळे बसली
या घराला तोडताना लागलेला दम

काय घडले ते कधीही विसरलो नाही!
आठवत नाही जराही फक्त घटनाक्रम!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users