चटकदार मसाला पापड

Submitted by CutePari on 2 April, 2015 - 02:40

चटकदार मसाला पापड
साहित्य
१. पापड
२. चीज
३. १ लिंबू
४. १ कैरी
५. १ कांदा
६. १ काकडी
७. १ टोम्याटो
८. बारीक शेव
९. कोथिंबीर
१०. १ चमचा चाट मसाला
११. १ चमचा लाल तिखट
१२. पिठी साखर चवीप्रमाणे
१३. मीठ चवीप्रमाणे

कृती
प्रथम पापड (मोठा) तळून घ्यावा. कैरी. कांदा, काकडी टोम्याटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. चीज किसून घ्यावे. तळलेला पापड एका पसरट प्लेट मध्ये ठेवा. त्यावर बारीक चिरलेले कैरी. कांदा, काकडी टोम्याटो, कोथिंबीर व किसलेले चीज घाला. त्यावर चवीप्रमाणे चाट मसाला पिठीसाखर,लाल तिखट, मीठ घाला व बारीक शेव पसरा. हवे असल्यास वरून लिंबू पीळा.असा हा चटपटीत मसाला पापड लगेच खायला घ्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मसाला पापड खायला खुप मजा येते मला खुप आवडतो. चीझ आणि कैरी सोडून बाकी सर्व असतं नॉर्मली, आता तुम्ही दिलेल्या पध्दतीने ट्राय करून बघतो.

Mast...

आपल्या सभासदांपैकी कुणी शांघाय च्या जवळपास राहतात का. मला ग्वांगझौ बद्दल माहिती हवी आहे