खण

Submitted by जयदीप. on 1 April, 2015 - 10:21

उघडला मी अडगळीचा एक खण
त्यात दिसले.... हरवलेले बालपण

काळ जखमांना भरत गेला तुझ्या
राहिला आहे तरी प्रत्येक व्रण

चार चाैघांसारखा दिसतोस तू
चार चाैघांसारखा नाहीस पण

सजवले आहे शहर कोणीतरी
आज कोणाचा तरी असणार सण

लक्ष दे आता तुझ्या शेताकडे
अन्यथा उगवायचे नुसतेच तण

देव, राक्षस, माणसा मधलाच तू!
सांगतो कुठला तुझा असणार गण!

माहिती आहे मला मी कोण ते
चांगला म्हण वा मला वाईट म्हण

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ.कैलास गायकवाड | 1 April, 2015 - 23:57 नवीन
पहिले दोन शेर आवडले नाहीत. बाकीचे सगळेच शेर..... वाहवा... >>> +१