कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या

Submitted by मिलिंद on 1 April, 2015 - 08:38

कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
झाडते आहे तरी कविता दुगाण्या

भेटतो तो आपल्या दु:खात असतो
ऐकवाव्या मी कुणाला रडकहाण्या

कूस केव्हा बदलली ह्या जीवनाने?
युगुलगीतांच्या कधी झाल्या विराण्या?

युद्धभूमी पाहुनी अवसान गळले
अन्‌ तुतार्‍या कालच्या झाल्या पिपाण्या

हे किती शोकांतिकांचे मूळ असते
एक राजा आणि त्याच्या दोन राण्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेस्टच !! जमीन छान आणि खयालांनी जमीनीला चांगला न्याय दिला असे वाटले
धन्यवाद व शुभेच्छा मिलिंदराव

भेटतो तो आपल्या दु:खात असतो
ऐकवाव्या मी कुणाला रडकहाण्या

कूस केव्हा बदलली ह्या जीवनाने?
युगुलगीतांच्या कधी झाल्या विराण्या?

युद्धभूमी पाहुनी अवसान गळले
अन्‌ तुतार्‍या कालच्या झाल्या पिपाण्या>>>>> खरे तर अख्खी गझलच मस्तय, पण हे तीन मानाचे मुजरे वाटले

हे किती शोकांतिकांचे मूळ असते
एक राजा आणि त्याच्या दोन राण्या >>> भीषण सुंदोर!

ह्या.. एंडिंग लँडिंगला २०० मार्कं हो आमच्याकडून