ग्राफिटी

Submitted by CutePari on 30 March, 2015 - 08:46

प्रिय वाचक,

मी आज मौजमजेच्या भागामध्ये तुम्ही कधीतरी पेपरमध्ये किंवा इंटरनेटवर वाचलेली किंवा न वाचलेली ग्राफिटी टाकून मनोरंजनाचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला हा प्रयत्न आवडेल अशी अपेक्षा.

१. भांडखोर नसल्याच्या मुद्यावरून
मी अनेकांशी वाद घातला.

२.झोपेच्या बाबतीत मी कायम
जागरूक असते.

३.पेट्रोल आणि सुंदर मुली
यांचा भाव कधीच उतरत नाही.

४. आळशी माणूस हा
कामाच्या विचारानेही थकतो.

५.तुमची बायको ड्रायविंग शिकत असेल तर
तिच्या मार्गात आडवे येऊ नका.

६.नजरेला नजर भिडवताना दूरदृष्टी
बाळगावी लागत नाही.

७.ऑफिसात चहा कॉफी अजिबात घेऊ नका
झोप उडते.

८. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे
लक्षण.

९. 'मेमो' म्हणजे ऑफिसने आपल्या कामाची
घेतलेली दाखल.

१०. इतिहास बदलता येत नसेल तर
निमुटपणे अभ्यास करून पास व्हा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कबीर.,

>> गाम्या जिकडेतिकडे स्वत: लायकी दाखवू नये

मग काय तुमची लायकी दाखवू म्हणता? ठीकाय! पप्पूचं काढून तुमचं नाव टाकूया.

स्वत:ची लायकी शोधायला कबीर (माबोसदस्य) जो गेला तो परतून आलाच नाही! Biggrin

हे वाक्य कसं ग्राफिटी म्हणून जाम चपखल आहे, नाहीका? Lol

आ.न.,
-गा.पै.