टी आर पी
प्रतिष्ठित लेखकू |
वाहिन्यासी आधारू |
मालिकांचा प्रसवू |
कर्तव्य योगी ||
रटाळ कथांचा स्वामी |
कल्पना अतिपुरोगामी |
सुचती उचापत्या नामी |
उगा कारणे ॥
आशयाच्या भराऱ्या प्रचंड |
घडवितो नाना कांड |
अंतिमत: ते थोतांड |
सिद्ध होतसे ||
घेउनिया अतिसुंदर तरुणी |
छळवीतसे नानाकारणी |
भलत्याच गेंड्याच्या चरणी |
सोडतसे ||
अत्यंत दुर्गुण संपन्न |
हीनांहूनही हीन |
प्रवेशती एकामागोमाग |
खालनायके ||
कधी नवीनच कथानक आणी |
एक होता चिमणा; पण कावळी 'काणी' |
अन् जुन्याच बाटलीतली जुनीच वारुणी |
वाद जनांचा ||
कधी कथा असे आखूड |
संपते तयातील गूढ |
उपकथानकांचे धूड |
जोडी त्या ||
अति लांबत जाई मूड |
मग नसे तयाला बूड |
प्रेक्षकांवर उगवी सूड |
पूर्वजन्मिचा ||
मग कथा सुटे बेछूट |
मारुतीचे जणू शेपूट |
येउद्या कितीही वीट |
थांबत नसे ||
मग काळ कसा मोजावा |
अन अनंत कुठे जाणावा |
संभ्रमात पडे हा मनवा |
आईनस्टाइनचाही ||
कुंकू असो वा पाउल |
एकाच जन्माची चाहूल |
यमलोकालाही हूल |
देतसे ||
जन म्हणती हा तर वेडा |
पण याचाच पडे तो बेडा |
देवहो यातुनी सोडवा |
आम्हालागी ||
देवांनाही मग चिंता |
कोणी सोडवाल का गुंता |
हैराण झाली हो जंता |
याच्या कारणे ||
मग एके सायंकाळी |
रिमोट घेउनी जवळी |
बदलली च्यानल ची कळी |
लगोलग ||
अशी आईडीयाची कल्पना |
तरीही समजे ना या जना |
उगा करिती ठणाणा |
मालिकांच्या नावे ||
असंतोष सराफ
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
मस्तच बरका ! आवडली आपल्याला
मस्तच बरका ! आवडली आपल्याला !! _/\_
धन्स प्रतिक, धन्स अपर्णा
धन्स प्रतिक, धन्स अपर्णा
मस्तच लिहिलेय, खुप आवडलं.
मस्तच लिहिलेय, खुप आवडलं.
जमलंय! एक नंबर
जमलंय! एक नंबर
दहा नंबरी!
दहा नंबरी!
मस्तच
मस्तच
वाह!
वाह!