आई

Submitted by bnlele on 28 March, 2015 - 10:19

लेखणी आहे हातात, पण मन नाहीच कशात
विचारणारे विचारतात, नवीन काही नाही का डोक्यात?
काय सांगू होत नाही साकार, कल्पना बुडतात शून्यात.
बर्मूडाच आहे ते शून्य - विचार त्यात गुडुप्प होतात.
लिहिलेली पानं व्याकूळ होऊन फ़डफ़डतात,
कोपरा दुमडलेला - आज एक अचानक हातात?
दशकं तीन आणि वर वर्ष सात लोटली -
आईची प्रतिमा-माया त्या शून्न्यात लपली.
आठवत बालपण,धरून हात तिनीच गिरवला-श्रीगणेश,
तेंव्हाच म्हणाली तुझ्या आजोबांच नाव पण गणेश.
ओसरी समोर कोवळ्या उन्हात आसन असायच दोघांच,अ‌न्‌
कुंपणावरच्या विलायती चिंचांचा, मोह कठिण आवरायचा.
वडिलांच नाव नीळकंठ- सामर्थ्य त्यात दोष गिळण्याच!
त्याच पावलांवर चालाव तू, मी देईन सदैव बळ--
मायेची पाखरण करून .... !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ काका... आज इतक्या वर्षांनी लिहिलंस..आई वर..

अजून लिही.... काकू च्या आठवणींनी आमचं बालपण गच्च भरलेलंय...सगळ्याच प्रेमाने ओथंबलेल्या.. एक्क ही कडू नाही, अगदी औषधाला सुद्धा Happy