मोगरा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 January, 2009 - 02:23

काल सवडीने रमत गमत बाजारात फिरत होते. फिरता फिरता फुल मंडई लागली आणि त्या मोगर्‍याच्या सुगंधाने मला ओळख दिली. लहान पणा पासुन आवडीचे फुल म्हणजे मोगरा. त्याला मिळालेल सुगंधाच वरदान हे त्याच्या आवडीचे गुपित.

लहानपणी ह्या मोगर्‍याची आणि माझी खुप घनिष्ठ मैत्री होती. मोगर्‍याचा वेल माझ्या दारातच होता. एप्रिल मे आणि जुलै ह्या महिन्यांमधे आमचा हा मोगर्‍याचा वेल बहरुन येत असे. मग रोज संध्याकाळ झाली की कळ्या काढायच्या आणि देवाला थोडी फुल बाजुला ठेउन गजरे करायचे. हा नित्यक्रम असायचा. त्या अर्धवट फुललेल्या फुलांसोबत संध्याकाळ अगदी शांत, प्रसन्न वाटत असे.

पावसाळ्यात त्या ओल्या कळ्या रिमझिम पावसात काढतानाचा त्यांचा स्पर्श काही वेगळाच आनंद देत असे. त्यामुळे हा वास पावसाची पण आठवण ओली करतो.

माझ्या सारखा अनेक जणांना हा वास काही ना काही आठवणी देउन जात असेल. कारण बहुतेक सण समारंभात फुलांच्या उपस्थितीत ह्यांचा अध्यक्षी मान असतो. लहान बाळाच्या बारश्यात हा मोगरा बाळाच्या पाळण्यासोबत नटुन बाळाला पाळणा गित गात असतो. कुणाकडे पुजा असेल तर परडी भरुन हा पुजेत मग्न असतो. साखरपुड्यात वधु सोबत हा नविन नाते जुळवतो. लग्नात हा सगळ्या महीला वर्गाच्या केशभुषा मिरवण्यात दंग असतो.

नवरी मुलीला तर ह्याची सोबत कायमची आठवणीत राहते. कारण हाच मोगर्‍याचा सुगंध तिच्या जिवनसाथीच्या स्विकारासाठी आतुर करत असतो आणि हाच सुगंध तिच्या माहेरच्या माणसांना निरोप देताना संवेदनाशिल आधार देत असतो.

मधुमिलनाच्या प्रसंगी तर हा सुगंध अवखळ होउन दोघांनाही धुंदी चढवत असतो. नवी नवरीची सोबत करुन तो तिला नविन आयुष्याच्या स्वप्नांची उधळणच करत असतो.

असा हा मोगर्‍याचा सुगंध बर्‍याच सुख, दुखः, प्रसन्न, अवखळ, शांत प्रसंगांची आठवण आपल्या सुगंधातुन दरवळवत असतो.

गुलमोहर: 

अगदी सुगंधी आठवणी.. Happy आमच्या घरी पण मोगर्‍याचा वेल होता.. उन्हाळ्यात गच्चीवर झोपायला गेलं की सुवास दरवळायचा.. रात्री पाणी प्यायला खाली आलं की सुगंधी झुळका यायच्या.. खूप आठवणी निगडित आहेत मोगर्‍याशी.. धन्यवाद जागू त्यांना उजाळा मिळाला तुझ्या लेखाने.. Happy

सोलापुरच्या माझ्या घरी ,आईने परसात सगळा मोगराच लावला आहे. जवळ जवळ १४ रोपं / वेली आहेत.
असा दरवळतो म्हणुन सांगु........
त्याची आठवण करुन दिलीस...६-७ महिने झाले घरी जावुन. आता पुढच्या महिन्यात सुट्टी काढुन जाईन पुन्हा. आभारी आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

मोगरा 'जगू'ला.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

मस्तच गं जागु, एकदम छान लिहिलं आहेस... मोगरा माझाही आवडता आहे. आता ही दोन रोपं आहेत, नुकत्याच क़ळ्या येताहेत ह्या सिजनच्या.. Happy माझा मोगरा एकदम स्पेशल आहे. फुलतो तेव्हा एकदम मिनिएचर कमळ वाटते.. भरपुर पाकळ्या आहेत त्याला...
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

जागु, एकदम आवडल.
मलाही मोगरा खुप आवडतो. मी पण कालच गजरेवाल्याला विचारले की मोगर्‍याचा गजरा आहे का ते.
माझ्या आईकडे असा जाईचा वेल होता. खुप फुले यायची, त्या कळ्या असतानाच तोडुन त्याचे गजरे करायचो मी आणि आई. कायम आमच्या दोघींच्या डोक्यात गजरा असायचा. घरी आलेल्या प्रत्येक बाईला आही हळदी-कुंकु लावायची त्याबरोबर एक गजराही द्यायची, त्यासाठी भरपुर पिनांची पाकिटही आणुन ठेवायची.

जागु, मस्तच लिहिलय गं. किती आठवणी जाग्या केल्यास?
-------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

जागु... मस्तच आहे 'मोगरा'... वाचत असतानाच आपोआप मनात 'फुलला'

पल्लवी

जागु, मस्त लिहीलं आहेस,
मोगर्‍याचा सुगंध मनात दरवळला....