वावर

Submitted by जयदीप. on 25 March, 2015 - 12:49

करू नको देऊस तिला तू वावर
नकोच देऊ मनात शंकेला घर

प्रश्नाचे प्रश्नात मिळावे उत्तर..
नशीब नव्हते इतकेही बलवत्तर!

गोड बोलतो आहे शत्रू इतका
कडू लागते आहे आता साखर

प्रकाशवर्षे वाटत आहे सध्या
वाढत आहे नात्यांमधले अंतर

माणसात माणूस राहिला नाही
कुठल्या धर्मावरती फोडू खापर?

कडेलोट एका इच्छेचा केला
चुकलो मी, डोळ्यात बघितले नंतर

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आह!

करू नको देऊस तिला तू वावर
नकोच देऊ मनात शंकेला घर<<< छान

प्रश्नाचे प्रश्नात मिळावे उत्तर..
नशीब नव्हते इतकेही बलवत्तर!<<< हा शेर मतला होता होता राहिला बिकॉझ ऑफ अलामत Happy

गोड बोलतो आहे शत्रू इतका
कडू लागते आहे आता साखर<<< वा वा

प्रकाशवर्षे वाटत आहे सध्या
वाढत आहे नात्यांमधले अंतर<<< मस्त

माणसात माणूस राहिला नाही
कुठल्या धर्मावरती फोडू खापर?<<< व्वा व्वा

कडेलोट एका इच्छेचा केला
चुकलो मी, डोळ्यात बघितले नंतर<<< व्वा व्वा व्वा

शेवटचा शेर सुपर्ब!

करू नको देऊस तिला तू वावर
नकोच देऊ मनात शंकेला घर

माणसात माणूस राहिला नाही
कुठल्या धर्मावरती फोडू खापर?

कडेलोट एका इच्छेचा केला
चुकलो मी, डोळ्यात बघितले नंतर <<<

Vvvaa vvvaaa बेहतरीन