मी दिशाभूल झालोय अथवा

Submitted by उगले इंद्रजित. on 24 March, 2015 - 05:14

मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा

काय तो ठाम घ्या आज निर्णय
काय ते आजच्या आज कळवा

दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा

सारखे वाटते मरुन जावे..
हा असा काय आलाय थकवा?

निघुन जाईल हा 'आज' सुद्धा..
काय घडले तरी काल, परवा?

'देव' ही त्यातली एक आहे,
अन अशा खूप आहेत अफवा

-उगले इंद्रजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीरजी, अरविंद काका

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मस्त गझल!

मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा<<< सुरेख मतला

काय तो ठाम घ्या आज निर्णय
काय ते आजच्या आज कळवा<<< व्वा व्वा

दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा<<< मस्त शेर! (मागे एक 'शब्दाचे नैसर्गीक वजन' ह्य विषयावर चर्चा झाली होती ती आठवली. सहसा नैसर्गीक वजनानुसार वापर झाला की अधिक मजा येते.)

सारखे वाटते मरुन जावे..
हा असा काय आलाय थकवा?<<< मस्तच! विशेषतः दुसरी ओळ!

निघुण जाईल हा 'आज' सुद्धा..
काय घडले तरी काल, परवा?<<< निघु असे करावेत. चांगला शेर! (येथेही नैसर्गीक वजनाचा मुद्दा)

'देव' ही त्यातली एक आहे,
अन अशा खूप आहेत अफवा <<< वा वा

'शब्दाचे नैसर्गीक वजन' ह्य विषयावर चर्चा झाली होती ती आठवली. -----

--- चर्चेची लिंक इथे द्याल का? मलाही वाचता येईल

मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा

दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा

वा व्वा इंद्रा.
गझल आवडली भावा. Happy
आणि इकडे स्वागत.

अथ पासून इति पर्यंत स्संपूर्ण गझल आवडली जमीन फार मस्त आहे
आपल्याला माबोवर पाहून आनंद झाला
बेफीजींच्या मुद्द्यावर अवश्य विचार व्हावा

>>>मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा<<<

इंद्रजीत,

मतल्यातील प्रत्येक शब्दाचे नैसर्गीक वजन जसे आहे तसाच तो वापरला गेलेला आहे. अभिनंदन Happy

>>>काय तो ठाम घ्या आज निर्णय
काय ते आजच्या आज कळवा<<< हा शेरही तसाच झाला आहे. Happy

मात्र!

>>>दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा<<<

ह्या शेरात 'दखल' ह्या शब्दाचे नैसर्गीक वजन 'लगा' असे आहे. तुम्ही निवडलेले वृत्त 'गालगा गालगा गालगागा' (म्हणजे भामिनी वृत्त) आहे.

त्याचप्रमाणे 'घेइल' ह्या शब्दात एक तर 'घेईल चे घेइल करणे' ही सूट आहे (जी एकवेळ बाजूला ठेवली जाऊ शकेल) पण त्यातील 'इल' आणि पुढच्या 'स्वतः' ह्या शब्दातील 'स्व' असे मिळून जे 'गालगा' करण्यात आले आहे त्यापैकी 'इल' चे नैसर्गीक वजन 'लल' असे आहे. असेच पुढच्या ओळीतील 'सहज' ह्या शब्दाबाबत झालेले आहे. सहज, ह्या शब्दाचे नैसर्गीक वजन 'लगा' असे आहे व वृत्त भामिनी आहे.

हे सगळे वरवर अती तांत्रिक वाटत असले तरी गझल गायला गेलो तर अडचणी येतात, हा मुद्दा आहे. Happy

बाकी गझल सुंदर आहे ह्यात वादच नाही. Happy

कृ गै न

बेफिजी,

विस्तारीत करुन मांडल्याबद्दल खूप आभार... __/\__

तुमच्या सर्व मतांशी मी सहमत आहे! पटले